ओली बाळंतीण


 ओली बाळंतीण 


काल एक ओली बाळंतीण माझ्या घरी सश्रद्धेने आलीचारच दिवस झाले होतेमी मोठा (?!) असल्याने बाळाच्या आई बापाने विचारकेला असेल - जरा आशीर्वाद तरी घेऊ


मी सहसा बाळ हातात घेत नाहीकारणमला लहान बाळाची मान पकडता येत नाहीबाळ रडायला नको हातात घेतल्या बरोबर ही'अनाहतभीतीपण बापाने बाळ पुढे केल्यावर माझा नाइलाज झाला अन मी बाळ हातात घेतलेवेष्टनात बांधले होतेसॉररीदुपट्यातगुंडाळले होतेउगाचंच हिवासाळ्याचा त्रास नकोपहिलटकरणीचं पोर असल्याने मी कौतुकाला सुरवात केलीनाकीडोळी छान होतंपाय दुपट्यात असल्याने ते बघता आले नाहीपण हात मऊ होतेमला हा स्पर्श खूप आवडतोमी 'कवतिकालाप्रारंभ करताचथांबलोमाय बाप बोलू लागलेअपत्य प्राप्तीसाठी केलेला अट्टाहास जाणवलाआनंदाने चेहरा फुलून गेला होतास्तनाग्रे स्रवू लागली होतीआईचं मन रुपी चोळी किंचित ओली झाली होतीमला 'थांबवतआपण खूप बोललो याची आई बापाला जाणीव झाली असावीबहुदाआईने पदर सावरलास्तन झाकले आणि बोलायचं थांबलीवातावरणात 'प्रेग्नन्ट पॉझआला


मग वातावरण 'मोकळंकरण्यासाठी एक फालतू प्रश्न विचारलादवाखाना कोणतायातना झाल्या काखर्च कीती आलातर - उत्तरंअशीलखनौ येथील दवाखाना - यातना रहित बाळंतपण झालं आणि खर्च रुपये ७५०० फक्त - नगद


बाळाशी थोडं खेळल्यावर जाणवलं की बाळ 'एक पेशीयआहेअवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं ते प्रतिबिंब आहेचार प्रकारचा आवेगआहेअमिबा सारखं गर्भाशयात वाढलंयएक पेशीय असल्याने - आई अन बाप एकचकिंबहुना अवती भोवती बघितल्यावर संवेदनशीलमन जागृत होतं - मनाचा मनाशी संभोग होतो आणि कविता प्रसवतेएल्गार म्हणता येईल का यालामग मी आईला विचारलं - की - कविता करण्यास कोठून प्रेरणा मिळालीतर आई उत्तरली की 'पहिल्यापासून आवड ! लिहीत गेलोलोकांना कविता पाठवल्यालोकछान छान म्हणत गेलेमग वाटलं - का नाही कविता संग्रह करायचामग चौकशी केली आणि कमीत कमी खर्चात 'प्रकाशक मिळवला'. त्याने ७५०० रुपये खर्च सांगितला अन पन्नास प्रति फुकट दिल्या. .... किंडलअमेझॉनफ्लिपकार्ड वैगरे वैगरे ....मानकर साहेब - हौशीला मोल नाही ' मग कवीने ऑफिसात कसा सन्मान झाला हे सांगितलं२५ प्रती विकल्या गेल्या असं सांगितलं. (माझ्याहाताखालच्या लोकांनी प्रती घेतल्या हे ही सांगितलंमला गंमत वाटलीकवी खूप प्रामाणिक आणि हळवा वाटला.)


एकदिड तास कसा गेला हे कळलं नाहीमी मधेच पुस्तक चाळलेकविता छान होत्यामी कवीला पुढील अपत्यासाठी शुभेच्छा दिल्यासेल्फी घेतला अन .... कवी आनंदाने घरी गेले - कृतकृतार्थ होऊन


ते गेल्यावर मी विचार करू लागलोशब्द ... शब्दांचा शोध ... शब्दांवरचा आपला लोभ ... स्वान्त सुखाय नंतरची ओढ - शब्द छापूनआणण्याची ... इतरांपर्यंत पोहचण्याची .. काही (तरीसांगायचीखूप आनंद आहे का हो यातबऱ्याच वेळा फुकट वाटलेली पुस्तकेकपाटात 'समाधिस्तहोतात हे बघितलंयमी गेली दोन वर्षे विचार करतोय की लिहिलेलं पुस्तक छापायचं की नाहीआणि इकडेअविनाश पुस्तक छापून 'मोकळासुद्धा झालामीच पहिलटकरणीसाठी 'अडूनबसलोयकारण कधी कधी मला 'हा शब्द छापण्याचाअट्टाहासनिरर्थक वाटतोमाझ्या शब्दांची 'अवतिभोवतीच्या समाजमनाला अजिबात गरज नाहीत्यांना 'वाचतासुद्धा येत नाहीसमजणं तर दूर राहिलं! '. 


तिकडे पुस्तक छापून सुखानं झोपलेला अविनाश अन इकडे मी तळमळत ..... झोप कधी लागलीकळलंच नाहीअविनाश 'अवतीहेनाव वापरून साहित्य सेवा करतोकविता संग्रहाचेएक पेशीय बाळाचं नाव आहे - *अवतिगंध*. तुम्हांला बाळाला आंतरजालावर सुद्धाभेटता येईल. (https://www.flipkart.com/avatigandh/p/itmb89869cea89d3?pid=9789355092755&lid=LSTBOK9789355092755CWT7N0&marketplace=FLIPKART&cmpid=content_book_8965229628_gmc)


मला आवडलेली एक कविता उल्का वाचत आहेऐका तर 'अवतीकाय म्हणतात ते

1/Post a Comment/Comments

Post a Comment