भाची माझी पंचामृती भाची 


'मामामामीसाठी डबा कधी पाठवू हे सांगाअसा व्हॉटसअप वरचा उमाचा 'प्रतिसादवाचून मी लगेच उत्तर दिले 'सांगतो मी'. चारदिवसांपूर्वी जेंव्हा मी 'उल्काला बरे नाहीया आशयाचा ब्लॉग पाठवला त्यांस माझ्या भाचीकडून आलेला हा 'प्रतिसादहोताही सादपंचामृती होती कारण पाच गोष्टी एकत्र आल्याशिवाय अशी 'प्रतिक्रियाउमटत नाहीहे एक धाडसाचे काम असते - धाडस हा शब्दयाकरिता वापरतो कारण या 'स्वकेंद्रितजगात माणूस आकंठ बुडालेला आहे आणि दुसऱ्याला 'डब्बादेणं हे मानसिक आणि शाररिक'आव्हानआहेहा माझाही 'स्वानुभवआहे - काळजी नसावीआणि हो 'तुम्हीं सुद्धा लगेच स्वपरीक्षण वैगरे करू नका'. पण 'विचारकरा


कोणत्या आहे या पाच गोष्टी?

 *रुग्णाविषयीची संवेदना* - 'उल्का आजारी आहेहे कळल्यावर 'तिला मी मदत केलीच पाहिजेअसं आत्यंतिक पोटतिडकीने वाटलेतरच मदतीचा 'निर्धारी,दृढनिश्चयीनिग्रहीउद्गार बाहेर पडतोमी डब्बा पाठवणारंचकेव्हां ते सांगा - असं उमा म्हणत होती

 *सहवेदना* - 'मामी मला तुझ्या भावना समजत आहे कारण कधी काळी मी सुद्धा आजारी होतेअसच उमा सांगत असावीआम्हांलाडब्बा देऊन उमा कृतीतून आमच्या पर्यंत पोहचू पाहत होतीम्हणजे 'एम्पथी'! सहवेदनासहभावसहअनुभूतीतद्अनुभूती

 *सक्षम* - उमा स्वतः सक्षम आहेडब्बा करण्यापासून ते डब्बा पोहचवण्यापर्यंत ती कोणावरही अवलंबून नाहीसर्व 'अधिकार प्राप्तअसलेली ही माझी भाची खूप व्यस्त असते ... पण तिची इच्छाशक्ती दांडगी आहे

 *स्वानंद* - 'दुसऱ्याला मदत करून मला आनंद मिळणार आहे हा स्वानुभवउमाने घेतला असावामग 'स्वानंदासाठी माणूस काहीहीकरतोअसं दिसतंतिनंच मेनू ठरवला - खूप काही फालतू चर्चा  करता - कारण 'मामीला नेमकंकाय हवं आहे हे तिला माहित आहे

 *तत्काळ* - मदत करतांना ती तत्काळविनाविलंब केली पाहिजे याचं भान उमाला आहेडबा 'आजहवा आहे, 'उद्यानाही - हे उमालासमजलं आहेउद्या मामी 'उभीराहिल्यावर करेलच ती तिचा डब्बाआज ती 'आडवीहे मी समजून घेतलं पाहिजेझटकन काहीतरीकेलंच पाहिजे असं वाटणं महत्वाचंउशिरा केलेल्या मदतीला काही 'अर्थनाही


ह्या पाचही गोष्टी उमाच्या 'डोक्यातअसल्याने उमाने तत्काळ लिहिलं आणि मीही सकारात्मक उत्तर पाठवलंउल्काला मी 'हो सांगू किनाही सांगूअसं विचारलं नाही - कारण मलाही जेवणात 'विविधताहवी होती


काल तिला सांगितले 'बुधवारीडब्बा पाठव आणि आज बरोबर बारा वाजता डब्बा आलाडब्बा 'सायसंगीतआहेअति विविधता त्यातठासून भरली आहेमी मला आवडल्या प्रमाणे पहिले पाच पदार्थ सांगतोकारण हे सांगितल्या शिवाय तुम्हांला आमच्या 'डब्याचीचवकळणार नाही


 मेथीची भाजी - किंचित कडवटपणा कायम ठेवण्यात यशस्वी झालेली उमाची भाजी लसणाचा स्वाद आणि वास मेंदूला आनंद देतहोतीउल्काने मला सांगितलं - सगळी खाऊ नकोमला संध्याकाळी हवी आहे ?!

 अळिवाचे थंडीचे लाडू - कदाचित 'मुखशुद्धीलापाठवले असतीलपण मी ते 'सुरवातीलाखाल्ले

 बोन्ड - सुशिक्षित लोक या प्रकाराला 'भजीम्हणतातपण भजी आणि बोन्ड हे वेगळेमला माझी वणीची काकू आठवली

 दलिया - गुळाचा दलिया मला 'मधुमेहअसूनही खाल्लाभन्नाट झाला होता

 फ्लॉवरची भाजी - अहाहा ....


पोळ्याभाकरीवरणभात वैगरे अप्रतिम


एकंदरीत 'मज्जाआली आम्हांलाउमालाही आली असेलउमा तुला मामा आशीर्वाद देतो. *आपण दुसर्‍याचें अन्न खाल्लें असतां त्याससुख चिंतावें. ‘ अन्नदातेचि दिसती सर्व  कवणा म्हणावें सुखी भव  ’ - असं म्हणतात.*


तू खूप सुखी होआनंदी तर आहेच

1/Post a Comment/Comments

  1. Best Slots for Android - Mapyro
    Find the best casinos to 용인 출장샵 play Slots 계룡 출장샵 games for Free or Real 구미 출장안마 Money. 도레미시디 출장샵 Best Slot Sites. Best Casino Apps. Best 영천 출장마사지 Slots. 5D Casinos. Slots. Best Live Casino

    ReplyDelete

Post a Comment