सकाळी सकाळी - निघा


सकाळी सकाळी - 'निघा


*शनिवार - रात्र - अकरा वाजता*

आम्हीं 'मांगीतुंगीयेथील जैन मंदिर धर्मशाळेत विसावणार होतोपण त्या आधी उद्या सकाळी कधी निघायचे यावर मतमतांतरे चर्चेतहोतीशेवटी संजीवनीने सांगितल्या प्रमाणे साडेपाच वाजता निघायचे ठरलेमला रात्रभर झोप लागली नाहीउल्काचं घोरणं रात्रभरऐकावं लागलं


*रविवार - सकाळ - पाच वाजता*

शेखरने दरवाजा खटखटावला आणि चहाचं पाणी गरम करण्याची इलेक्ट्रिक किटली मागितलीमी भुवया वर करून 'कशाला?' असंविचारलं तर म्हणे 'संजीवनीला अंघोळीसाठी गरम पाणी हवं आहे !'. आम्हीं दोघंही मनातल्या मनात हसलोदिवसाची सुरवात प्रसन्नतेतझाली


बरोबर साडेपाच वाजता आम्हीं गाडीत बसलो आणि गाडी साल्हेर किल्ल्याकडे वळवलीअंतर तीस पस्तीस कि मी होतं पण रस्ताअनोळखीनिर्मनुष्य आणि खराब होतापण याच कारणामुळे सूर्योदय होई पर्यंत मज्जा आलीपहाट सुखद अनुभव देत होतीसूर्योदयझाल्यावर निसर्गाचे जे दर्शन झालं ते शब्दात वर्णन करणे - अशक्यकिंचित अनुभव तुम्हांला व्हीडिओ बघून येईल - दहा टक्के फक्तकारण व्हिडीओ बघून थंडी थोडीच वाजणार आहेस्वर्गात स्वतःलाच जावं लागतं😷


महाराष्ट्र - गुजरात सीमेवर साल्हेर किल्ला आहेहा डोंगर उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेयेथून गुजरात सीमा दोन कि मी वरआहेदोन राज्यांच्या मध्ये एक प्रचंड दरी आहेकाल रोहित जाधव ( सटाणा येथील गड सेवक ) सांगत होता की - * बागलाण म्हणजेमहाराष्ट्रातील सर्वोच्च पठार

सह्याद्रीचे उत्तर टोक म्हणजे साल्हेरसह्याद्री पर्वत रांगेची सुरवात महाराष्ट्रगुजरात सीमेवरील साल्हेर ह्या किल्ल्यापासून होऊन ४४००किमीवरील केरलतमिळनाडूतील मदाइ डोंगर रांगे पर्यंत पसरली आहे.* आज आम्हीं बऱ्याच लोकांना अज्ञात असलेला भूभाग अनुभवतहोतोत्याचा सकाळी सकाळी अनुभव घेत होतो


आम्हीं जर उशिरा निघालो असतो तर निसर्गाच्या सकाळच्या आविष्काराला मुकलो असतोठगांचा प्रवास दिसला नसताछोट्या छोट्याझऱ्यांचा आवाज नीट ऐकू शकलो नसतोगुलाबी थंडी - हवीशी वाटणारी - उपभोगता नसती आलीनिर्मनुष्य रस्तेही आणि झोपड्याहीसुंदर असतात हे कळलं नसतंमनात विचार आला कि 'बरं झालं संजीवनीचं ऐकलं'. जाता जाता सहज तिला विचारलं - अंघोळ कशीझालीती म्हणते - गार पाण्याने केलीकिटलचा प्लग पंधरा अँपिअरचा तर स्विच बोर्ड  पाच अँपिअरचा! - शेखर आणि मी परत एकदा(मनःपूर्वकहसलो


३०-३५ कि मी प्रवास दोन तासथांबत थांबत केलाअसोपायथ्याशी -४५ ला पोहचलो आणि पहिला विजय मिळवलावेळेनुसारपोहचलोगड चढायला  वाजता सुरु केला 

0/Post a Comment/Comments