वास्तू - एक प्रश्न




नुकत्याच दोन घटना घडल्या - वास्तू बाबतीत - आणि माणसांच्या अतार्किक वागण्याविषयी प्रश्न माझ्या समोर आलादोन कुटुंबातीलघडलेल्या घटनांमध्ये खूप साधर्म्य आहेअसाच प्रश्न - ज्योतिष या विषयाला धरून - 'अनकहीया सिनेमात मांडला होतासिनेमा बघूनबाहेर पडल्यानंतर 'सशक्त आणि अशक्तमन या विषयावर मी विचार करत होतो आणि आजही करतोज्योतिष शास्त्र तर माणसालाकमकुवत आणि दिशाहीन करतं असं 'माझंठाम मत आहे एक मुलगा आईचा कायम द्वेष करत असतो अन चांगलंही वागत असतोआई विषयी तो कायम द्विधा अवस्थेत असतोत्याला मी सहज विचारलं असं कातितक्याच सहजपणे तो उत्तरला - 'माझ्या कुंडलीततसं लिहिलं आहे , आईशी स्वभाव जमणार नाही ! - मी तरी काय करू ? ' कुंडलीत लिहिलंय याचं समर्थन किती विचित्रपणे हा मुलगाकरत होता - हे पाहून मन 'हललं', मी दिग्मूढ झालोबरं मुलावर काहीही आपत्ती आलेली नव्हतीतरीही तो ...


माणूस दुःखी झाला कि मनानं खचत जातो हे मी समजू शकतोप्राप्त परिस्थितील ही दोनही कुटुंबे साक्षर आहेतआर्थिक परिस्थितीफार चांगली आहेअतिश्रीमंत असं सहज वर्गीकरण करता येईलसारासार विवेक दोनही कुटुंबात आहेया दोनही कुटुंबाच्या नशिबात'कर्क योगआहेकॅन्सर या रोगाने प्रत्येक घरातील महिला ग्रस्त आहेऔषधोपचार सुरु आहेमला खात्री आहे की काही दिवसात यामहिला सामान्य जीवन जगतीलया आप्पती मुळे 'खचून जाणंस्वाभाविक आहेपण 'आपत्ती दोषकोणाला द्यायचा हा प्रश्न आहेमुळातच कशाला तरी दोष द्यायचा आणि पुढे जायचं हा मनुष्य स्वभाव आहेवास्तूला दोष देणं अगदी सहज असतंवास्तूची शांतीकेल्यावर - आपण तर वास्तू 'दोष-मुक्तकरतो नामग मनासारखं नाही झालं कि फोडा खापर 'वास्तूवर'!


काल एका कुटुंबाने सत्यनारायण केलाप्रसाद घेतल्यावर मी चौकशी केली - सत्यनारायणाची पूजा कशासाठीतर यजमान म्हणाले - 'वयामुळे आणि हिच्या आजारपणामुळे बंगल्यात वर खाली करता येत नाहीमग बंगला विकला आणि फ्लॅट घेतलंज्या वास्तूत आम्हींचाळीस वर्षे राहिलो तिचा योग्य तो सन्मान करायचा आणि मगच बाहेर पडायचं - असं ठरलं - म्हणून सत्यनारायण'. मी भोचकपणाकरून विचारलंच 'मला वाटलं की वाहिनींचा हा नवा त्रास म्हणून जागा बदलली की काय ?'. यजमान उत्तरले की ' तसं काही नाहीआहोयाच वास्तूत आमची कित्ती कित्ती भरभराट झालीआणि या कॅन्सर साठी वास्तूला का दोष द्यायचा'. यजमानांचा वास्तूविषयी असलेलाआदर बघून मला समाधान वाटले


याविरुद्ध परवा एक विरुद्ध अनुभव आलामी मित्राच्या वास्तुशांतील गेलो होतोमित्राला सहज विचारलं 'कारे जुनं घर चांगलं होतं तरीहीहे नवं घर ? हा यजमान म्हणाला 'अरे त्या वास्तूत दोष आहे असं ब्राह्मणानं सांगितलेहिला कॅन्सर होण्याचं मुख्य कारण .. वास्तू '.  मीगप्पा बसलोगेल्या आठ दहा वर्षांपासून होणारी आर्थिक उन्नत्ती मी जवळून पाहिली आहेत्यांच्याबरोबर येणारी सर्व काही सुखंमित्राच्या कुटुंबाशी लोळण घालतांना 'दिसतआहेपण या 'कॅन्सर निम्मितानेवास्तूशांती केलेल्या वास्तूला दोष देऊन हे कुटुंब आत्तानव्या वास्तूत जात आहे


दोन दिवस विचार करतोय - वास्तूला दोष देणं कितपत योग्य आहेअतिसुखात असतांना माणसं 'अतार्किकवागतातपण अतिदुःखातही माणसं 'अतार्किकवागतातपहिले कुटुंब मला मानसिकरित्या स्थिरशांत आणि समाधानी वाटलंतर दुसरं कुटुंब - अस्थिर - इथे नाहीतर तिथे प्रयत्न करू


माझा एकच प्रश्न आहे - 'वास्तूला दोष का द्यायचाआपलं मन जर चंचल असेल तर मोठे प्रश्न उद्भवतातकोणत्याही कन्स्लटंन्ट कडेगेलं की तो 'कर्मकांडाच्या खड्डयात आपल्याला पाडणार आणि कर्मकांड झालं की आपण 'फलिताचीवाट बघणारअशक्त मनआणखी अशक्त होणारअस्थिरताअशांतता आणि असमाधान मग ....


ज्योतिष्याच्या भानगडीत पडलं की एक पाय खड्यात जातोवास्तुशास्त्राच्या भानगडीत पडलं की दुसरा पाय खड्यात जातोमग माणूसअडकतोघरात भरपूर हवा आणि उजेड 'खेळत ' असेल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या आणि तुमच्या घराच्या सुखसमृद्धीला वरदान असतेकाय वाटतं तुम्हांला


वास्तुपुरुष नमस्तेऽस्तु भूशय्याभिरत प्रभो। वास्तुपुरुष नमस्तेऽस्तु भूशय्याभिरत प्रभो। 

मद्गृहे धनधान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा।।


अर्थ ? माहित नाहीतुम्हीं शोधा !

 

0/Post a Comment/Comments