मुद्रांकन - Branding
बिपीनची आणि माझी ओळख तशी वर्षाभरापूर्वीची. म्हणजे जुनी नाही. ओळखीचं कारण? तो प्रकाशक आहे, प्रिंटरपण आहे. करोनाच्या अंधाऱ्या काळात मी एक रिकामा उद्योग केला. माझ्या ६६ दिवसांच्या यूरोप प्रवासाचं 'आत्मचरित्र' इंग्रजीत खरडलं - २२८पानं. प्रत्येक लेखकाला जे वाटतं ते मलाही वाटलं आणि मी पुस्तक छापण्याची मनीषा बिपीनला सांगितली. बिपीनने यथासांग यामार्गातील आनंद विरुद्ध खाचखळगे आणि आर्थिक बाजू समजून सांगितली. मी तत्काळ, म्हणजे तेंव्हा, पुस्तक छापण्याचा 'कार्यक्रमकिंवा धाडस' रद्द केले. मला माझे पुस्तक 'फुकट वाटायला' आवडणारे नव्हते. फुकट मिळालेलं पुस्तक फक्त धूळ गोळा करतं. (मी तेबहुदा डिजिटली प्रकाशित करीन.)
अशातऱ्हेने माझ्या पुस्तकाचा गर्भपात झाला असला तरी आमची मैत्री मात्र फुलत गेली. याचं मुख्य कारण म्हणजे आम्हीं दोघंही'मनसोक्त फिरणारे (vagabond म्हणा हवं तर)' आहोत. आमच्या फिरण्याच्या तऱ्हा वेगळ्या आहे पण आमच्याकडे 'गोष्टी- stories’ भरपूर आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात आम्हीं तीन चार वेळा ३/४ तास ठरवून गप्पा मारल्या आहेत. कधी कधी वाटतं बिपीन (म्हणजेजंगल) नावाप्रमाणे अथांग आहे. तो उत्तम छायाचित्रकार आहे. एक चित्रपटाचं - स्टील फोटोग्राफीचं - त्याने कामही केलेलं आहे. तोकॉम्प्युटरवर सुंदर चित्रे काढतो. तो खूप वाचतो. कधी लिहितो. चांगल्या गोष्टींचं दस्तऐवजीकरण करतो. वैगरे वैगरे.
माझी वेबसाईट www.mankar rang.in तयार झाल्यावर मला माझ्या लोगोची, प्रतिमा चित्राची, मानसिक गरज भासू लागली. सर्जनशील बिपीनची मला तत्काळ आठवण झाली. मी फोन केला.
मी - मला लोगो करून हवा आहे. तोही फुकट!
बिपीन - करून दिला असं समजा. कसा हवा?
मी - कसा? ते तू ठरवणार ! मी नाही ! मी तुला कसा दिसतो त्या नुसार तू लोगो कर. बरं तुझी अन माझी खूप जुनी ओळख नसल्यानेतुझा माझ्याबद्दल 'पूर्वग्रह' नाही. (कलाकाराला फ्रिडम द्यावे - उगीच लुडबुड करू नये - हे माझे मत )
बिपीन - मानकर आपण तुमचं 'ब्रॅण्डिंग-मुद्रांकन' करू. तुमची ब्रँड इमेज डेव्हलप करू. तुमची 'छाया-प्रतिमा' बघितली की 'मानकर कायरसायन आहे ' हे समजेल. Done म्हणून समजा.
एक आठवडा गेला. आणि अचानक व्हाट्स अप वर लोगो आला. मग फोन आला. आणि बिपीन बोलू लागला - कारणमीमांसा करूलागला. मी अचंबित झालो. किती प्रचंड विचार केला होता त्याने! बापरे! काय ती सर्जनशीलता! काय तो विचार! काय ते सादरीकरण! तो बोलत होता अन मी 'फक्त' ऐकत होतो.
मी जेंव्हा उत्तर ध्रुवाच्या जवळ होतो, म्हणजे आईसलँडच्या उत्तर टोकावर होतो तेंव्हाचा फोटो बिपीनने निवडला. हा फोटो शून्यतापमानात एका 'passerby'ने, अनोळखी पांथस्ताने, घेतलेला आहे. बिपिनने काहीतरी 'मास्किंग' केले आहे.
पाठीमागे एक फुलपाखरू आहे. ही मोनार्क फुलपाखरे एक अद्भुत स्थलांतर करतात. ते अमेरिका आणि कॅनडापासून मध्य मेक्सिकनजंगलांमध्ये १३०० ते २८०० मैल प्रवास करतात. मोनार्क फुलपाखरू शास्त्रज्ञांनी डॅनॉस प्लेक्सिपस म्हणून ओळखले आहे, ज्याचा ग्रीकभाषेत शाब्दिक अर्थ आहे "निद्रिस्त परिवर्तन." प्रत्येक प्रौढ फुलपाखरू फक्त चार ते पाच आठवडे जगते. चार ते पाच आठवड्यात २/३हजार मैल प्रवास ...
मानकर मला तुम्हीं फुलपाखरासारखे वाटतात. मध गोळा करणारे. मध वाटणारे. आनंद घेणारे आणि आनंद देणारे 'पांथस्थ'. आता तुमचं'ब्रॅण्डिंग' सुरु झालं. म्हंजे -* फोटो आणि फुलपाखरू म्हणजे 'बॅकपॅकिंग'. * तो बरंच बोलत राहिला. मला 'सुखावत' होता. तोथांबल्यावर मी म्हणालो - 'कर फायनल'.
माझ्या 'बॅकपॅकिंग सृष्टीला' त्याने 'आकार' दिला, त्याच्या दृष्टीने. हीच ती किमया - सर्जनशीलता.
मित्रा तुला सलाम. लोगो भिन्न आणि भन्नाट.
Post a Comment