साल्हेर किल्ला - Fort Salher

किल्ल्याची चढण अवघड आहे याची जाणीव मला पहिल्या पाच मिनिटांतच झालीदोन कारणं - पावसाळा ; तीव्र चढ.  एकूणकिल्ल्याची चढाई तीन भागात आहेमी मनोमन ठरवलं होतं कि पहिल्या भागापर्यंत जायचं आणि मग ठरवायचं - पुढे जायचं कि नाहीआता किल्ल्याविषयी माहिती दिली - गड सेवकरोहित जाधव याने - ती अशी . 


*साल्हेरच्या पायथ्याशी जे गाव आहे त्याला पूर्वी सायमुख म्हणायचे जेथे आज हॉटेल्स आहेततेथून थोडे वर गेले की वन विभागाचेगेस्ट हाउस लागते तो सर्व परिसर म्हणजे मगरबारीकारण तेथे तैलाई घाटात मगर मुखी दरवाजा होता जो आता नामशेष झाला आता तेथे एक गणपती मंदिर आहे म्हणुन सुद्धा त्या घाटाला गणपती बारी म्हणतात तेथून थोडे वर आले की त्या भागाला चंदन बारीम्हणतात त्या भागात काही पाणी टाके आहेत त्याच पाठरा वर उत्तरेला एका तलावा नजीक  सूर्याजी काकडे यांची समाधी आहे सूर्याजी काकडे  छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते . 1672 च्या घनघोर मराठा-मुघल लढाई मध्ये ते धारातीर्थी पडलेहोते तेथेच बाजुला एक विहीर आहे तेथून पुढे गेल्यावर आपण साल्हेरच्या प्राचीन केशर बागेत पोहोचतो ह्या बागेत अनेक रावउमरावांचे  घरे होती मोठीच बाजार पेठ खाली होती तेथे अनेक जातीनिहाय गल्ली होत्या पायथ्याला अनेक सुंदर तलाव मंदिरेहोती यांच्या संरक्षणाच्या साठी दुहेरी तटबंदी होती पण दुर्दैवाने आज फक्त कालिका देवी  गणपती गुहा तेवढी दिसते काही भागातमेटाचे अवशेष दिसतात.   तेथून थोडे वर गेले की सोनराळी भागातून दगडी पायरी सुरू होतातत्या 380 पायर्‍या पार केल्या की आपणकमळबारी या पाठरावर पोहोचतो तेथे पायथ्या पासून साधारणपणे 208 मीटर वर 3 दरवाजे लागतातत्यातील पाहिल्या दरवाजातब्राम्ही मधील शिलालेख आहे पुढे त्याच साखळीतील तिसर्‍या दरवाजात मोडी तील शिलालेख आहे येथे फार मोठी तटबंदी फिरवलीआहे.. ती बघणा सारखी आहे दरवाजे पार केले की पुढे पाणी टाके  महादेव या बागूल राजाची समाधी लागतेतेथून पुढे गेले एकालांब पाठारावर लांब पर्यंत तटबंदी आहे या पठारावर अनेक जोते दिसतात तेथून वर जाण्याचा मार्ग आहे तेथे 4 दरवाजे पार केले कीआपण गायकवाडी    मध्ये पोहोचतोते म्हणजे साल्हेर चे 5 वे पठारतेथे तलावटाकेमंदिरे  अनेक मोठ्या वास्तु दिसतात येथूनएक रस्ता मागील बाजूस जातो यावरील गंगासागर तलाबयज्ञकुंड , गुहा छान आहे अभ्याससन्या  सारखे गुहे कडून एक रस्ता वरपरशुराम टेकडी कडे जातो त्यावरील एक टेकडी लागते त्याला इंद्रनीलसूर्यमाल टेकडी लागतेतेथून एक छोटी चिंचोळी वाटपरशुराम मंदिराकडे जाते ती मंदिरवजा छोटी टेकडी म्हणजे सातवे अस्मान.. स्वर्ग सुखाची जागा.. इथून सेलबारीडोलबारी , सातमाळारांग स्पष्ट दिसते तर गुजरात मधील रूपगड स्पष्ट दिसतो.  

-रोहित जाधव गड सेवक*


हा रोहित दर रविवारी किल्ल्यावर असतोकिल्ल्यावर जातांना वाट चुकण्याची शक्यता खूप आहेम्हणून कायम विचारत रहाटोकापर्यंत पोहचायला सामान्य माणसाला साडेतीन तास लागतील असा अंदाजतीन तास परत येण्यासयेतांना खूप काळजी घेणे


पहिला पडाव पठार पार केल्यानंतर ... मोठी उभी सरळ घळई दिसलीघसरडं होतीआम्हीं ताबडतोब निर्णय घेतला - परतायचंजेव्हढीमजा आली तेव्हढी पुरेशी आहेकोणत्याही गोष्टीसाठी अट्टाहास करायचा नाही


खूप मज्जा आलीदिवस अत्यंत आनंदात जात आहे


#Mankar_Rang

#Backpacking_mankar

0/Post a Comment/Comments