'व्यंगमय' - सतीश
सतीशने आणि मी 'सिनेमा कसा पहावा?' या विषयीचे शिक्षण आठ दिवसांच्या कार्यशाळेत घेतले तेंव्हाच मला सतीशचे 'वेगळेपण' जाणवले. बँकेत नौकारी करून आता विश्रांती घेणारे सतीश - कायम लिहीत होते. त्यांनी त्यांच्या कथांचं पुस्तक आणून दिले. १९७०/८०या काळातील कथा मस्त वाटल्या. त्यांचा 'मिश्किल' स्व-भाव मला कथांमध्ये दिसला अन गप्पातही. निरीक्षण शक्ती अतिशय सूक्ष्मअसल्याशिवाय कथा / विनोदी कथा लिहिता येत नाही.
माणसाला वाचायच्या आधी पाहायला येतं. म्हणजेच एखादा लेख वाचण्यापूर्वीच तो एखादं चित्र पाहू शकतो आणि त्याचा अर्थही जाणूशकतो. त्या अर्थानं व्यंगचित्रकला ही लेखनाच्याही आधीची कला आहे, असं म्हणावं लागेल. शिवाय हजार शब्दांचा लेख जे काम करूशकणार नाही, ते एक व्यंगचित्र करू शकतं. व्यंगचित्राची कला म्हणजे विसंगती टिपण्याची कला! यासाठी फार उच्च दर्जाची बुद्धिमत्तालागते. अवतीभोवती काय चाललंय, याचं भान असावं लागतं. विसंगती टिपायची म्हणजे आधी संगती माहिती असावी लागते.
सतीश आजूबाजूचं व्यंग 'पहाते' झाले आणि व्यंगचित्रे रेखाटू लागले. मला पाठवू लागले. मी माझ्या 'सुसंगतीच्या' आकलनाप्रमाणेटिपण्णी करू लागलो. मित्र जवळचा कि दूरचा, मैत्री घट्ट कि पातळ, मैत्र मुलीशी कि मुलाशी असे विचार मनात न आणता, प्रत्येकाला'निरपेक्ष भावाने' अन तत्परतेने - मन मोकळी कंमेंट देतो मी. हातचं काही राखत नाही. कारण मला मित्रातील कलाकार घडवण्यास मदतकरायची असते. उशिरा दिलेला न्याय आणि टिपण्णी - अन्यायकारक अन अर्थहीन असते.
तालिबान प्रकरण सतीशला 'भावलं' व्यंग टिपण्यासाठी. चित्र आणि शब्द यांच्या संयोगातून एक दर्जेदार व्यंगचित्र तयार होऊ शकतं. पण मला आवडलेल्या 'या' चित्रात त्यांनी 'शब्द' न वापरता 'परिणामकारकता' दिली आहे. अवघड काम आहे - शब्दाविण संवाद. एकहीशब्द सोबत नसेल, तरी ते व्यंगचित्र तुमच्याशी बोललं पाहिजे. सतीशची चित्रकला आणि शब्दांवर सारखीच हुकूमत आहे. व्यंगचित्रातचित्र श्रेष्ठ की त्यासोबत लिहिलेले संवाद जास्त श्रेष्ठ, असा वाद कधी कधी उपस्थित केला जातो. माझ्या मते, त्यातलं चित्र हेच श्रेष्ठ! आजच्या चित्रविषयी मी माझी मतं मांडणार नाही. आज तुम्हीं चित्रकाराला - सांगणार - काय वाटलं.
मित्रांनो आपण सर्व कॉमन मॅन आहोत. व्यंग-आस्वाद घेणे आपलं काम. व्यंगमय सतीश - कशातही व्यंग शोधणारा सतीश - बुद्धीनेजागरूक असणारा सतीश - याला आपण प्रोत्साहित करू. जगात खूप व्यंग आहे आणि ते 'टिपणारे' हवेत आपल्याला, क्षणभरगालातल्या गालात हसण्यास.
Post a Comment