आज 'रंगमंचाने' श्वास घेतला !


खूप दिवसांनीनाही वर्षांनीरंगमंच पुनश्च जिवंत झालाकुर्तकोटी मध्ये एक छोटेखाणी कार्यक्रम झालाअभिवाचनाचा कार्यक्रममलाऐकायला आवडतंत्यात जिव्हाळ्याच्या विषयावर वाचन होतं. ' प्लॅन : जॅक्सन वध'. कुणाही नासिकाराला हा विषय प्रिय असणारवाचन मस्त 'वठलं'. पारंपरिक वेषभूषेमुळे अजून भावलंशुद्ध वाणीआवाजातील चढउतारप्रेग्नन्ट पॉझेस या मुळे मजा आलीवधाचाविषय ?! काय बोलावे यावर ! 


अभिवाचन हा शब्द अभिनय अधिक वाचन अशा दोन शब्दांपासून बनला आहेएखादी कथालेख किंवा कोणत्याही प्रकारचे लिखाणवाचून दाखवताना त्याला वाचिक अभिनयाची जोड दिली की ते होते अभिवाचनआपल्या आवाजातील अभिनयातून वाचन प्रभावी आणिउठावदार करणे हे ह्यातून अभिप्रेत आहेतुम्हाला हातात स्क्रिप्ट घेऊन आणि एका जागी बसून किंवा उभं राहून अभिवाचन करायचे असतेअधिक परिणाम साधण्यासाठी संगीत आणि प्रकाश योजना यांची सुद्धा कधी कधी जोड देता येतेकादंबरीकथा संग्रह  चरित्रात्मकलिखाण हे वाचनीय असतेचशिवाय त्याच्या माध्यमातून लोकरंजनसमाजप्रबोधन व्हावेतसे झाल्यास समाजमन घडण्यासाठीअभिवाचन हे माध्यम म्हणून उत्तम ठरते.


अभिवाचनवाचन ही नक्कीच कला आहेआज खऱ्या अर्थाने 'रंगमंचानेथोडा का होईना 'श्वास ' घेतलाअनंत कान्हेरे यांना मनःपूर्वकनमस्कार अभिनव भारत या वास्तूला नमस्कारतिळभांडेश्वराला नमस्कार


कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिथयश नाट्यकर्मी श्री मुकुंद कुलकर्णी (या कार्यक्रमाचे दिग्दर्शकम्हणाले की 'स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातनाटक किंवा अभिवाचन या माध्यमातून अनेक , ज्ञात आणि अज्ञातस्वातंत्र्यवीरांचे आपण स्मरण करणार आहे७५ कार्यक्रम सादरकरणार आहे. '


या निम्मिताने महाराष्ट्रात 'जागरहोऊ घातलेला आहेजमल्यास कार्यक्रम बघा




 

0/Post a Comment/Comments