मन वढाय, मन वडाय


*मन वढाय वढाय*

आज सायकलिंगचा मार्ग बदललाआज गावात गेलोनव्या स्मार्ट रोडवरून सी बी एस वरून , स्तंभावरूनव्हिक्टोरिया पुलावरूनगोदावरीचे वरून दर्शन घेतलेनंतर काळाराम मंदिराचा बंद दरवाजा बघून रामकुंडावर पोहचलोपूर पूर्णपणे ओसरला होता आता फक्तपात्रातच पाणी होतं. 'नदीकाठचे चित्रविहंगम वैगरे असे काही नव्हतेउलट वाईट वाटत होतेमी जगातल्या खूप नद्या पाहिल्या आहेलोकांनी नद्यांना दिलेली वागणूक थक्क करून सोडणारी आहेइतर देशांनी अमाप प्रेम दिलं आहे - आपल्या आईला - आपल्या नदीलानावा नदी सेंट पिटर्सबर्गरशिया किंवा डुओरो नदी पोर्टोपोर्तुगाल पहा - इतिहास उभा आहेनदीला 'धक्कालावलेला नाहीअनआपल्या येथे - पात्रात कॉंक्रिट ओतलंयघाणीचं साम्राज्यफारशी बसवून विद्रुपीकरण सुरु आहेभिकाऱ्यांचे जागोजाग अड्डे आहेत


एवढं सगळं असूनही मी नदीला बघायला महिन्यातून एकदा तरी जातोमला पाण्याकडे बघायला खूप आवडतंपाणी वाहतांना जोआवाज येतो तो - एक नितांत सुंदर मेलडी असतेआज मात्र व्हिक्टोरिया पुलाखालून पाणी खूप 'आवाजकरत होतं - जणूकाही नदीचंआक्रंदन सुरु होतंदहा मिनिटे पुलाखाली बसलो - मन भरून आक्रंदन ऐकलंमग लक्ष्मण कुंडरामकुंडगांधी तलाव बघत बघतनारोशंकराचा घंटा बघितलाआहो आपल्या लोकांनी ती अवाढव्य घंटा सुद्धा बंदिस्त करून टाकलीदहाव्याचे कार्यक्रम मात्र जोरातचालू होते - करोनाची तमा  बाळगतावरच्या बाजूला कावळे यथावकाश 'घासघेत होतेत्रास होत असला तरी ... मन वढाय वढायहोतं .. नदीसाठीरामसेतूची अवस्था तर दयनीय झाली आहे


*मन वडाय वडाय*

रामसेतूच्या समोर भांडी बाजार आहेतेथे सकाळी सकाळी भाज्या दिसल्याघुसलो गल्लीतबालाजी मंदिराच्या वास्तूत 'राजहंसनावाचं हॉटेल आहेत्याचा निम्मा पसारा रस्त्यावर असतोकढईतील तेल नुकतंच तापलं होतंवड्यावाल्याने पहिला वडा कढईतटाकण्याची वेळ आणि मी तेथे पोहचण्याची वेळ एक झालीते म्हणतात ना 'कावळा बसायला ....'. मी वेटर बाबाला विचारलं - मालकरस्सा तयार झाला कामालक म्हणतात - नाही अजूनपाच मिनिटे थांबामन वडा वडा करत होतंपाच मिनिटात भाजी घेतली अन'हाटेलातआलोटेबलं तेलकट होतीमनात म्हटलं - टेबलं चाटायला थोडं आलो आपणकाही हरकत नाही मानकरस्वच्छतेचा बाऊकरू नकामी ऑर्डर  देताच 'वडा-रस्सासमोर आलाएका प्रश्नाबरोबर. 'पाव देऊ का?' - मी 'नको'!  आणि मग 'वड्याचासमाचारघेण्यास सुरवात केलीरंग रूप चव आकार - ३६० डिग्रीत - आनंदाला उधाण आले होतेडोळे जीभ नाक - तृप्तअर्धा वडा राहिल्यावरमी मन आणि मान वर केलीइतर लोकांनी 'भजीघेतली होतीएक 'नटसम्राटही दिसलाएकाग्र पणे भजी खात होतामाझंही मन'भजी भजीकरू लागलंपण .... नको म्हटलंमनासउगाच ते कोलेस्टेरेल वाढायला नकोगेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून - राजहंस - बघत आहेकाहीही बदल नाहीतेंव्हाचे तरुण वेटर आज म्हातारे मात्र झाले होतेकाउंटर एक तरुण मुलगी सांभाळत होतीबहुदापुढच्या पिढीतील ती मालकीण असावी


*नदीला पाहून -प्रसन्न झालेलं मन वडा खाऊन प्रसन्न झालंनदी आणि राजहंसचा वडा - दोनीही अक्षय


दिवसाची सुरवात उत्तम झालीउत्तम फिरणं झालं कि काहीही खाता येतं हे नक्कीफोटो पहा. *


 

0/Post a Comment/Comments