आईला-दुःख-दाखवले !?


मागच्या आठवड्यात मी आईला अन मावशीला घेऊन भालेकर कुटुंबीयांकडे गेलो होतोकाकांची तब्बेत हल्ली बरी नाही म्हणून भेटकाकांचा हा तिसरा हार्ट अटॅक - खाऊन आणि पिऊन मजा केली म्हणून ऐंशीवा वाढदिवस साजरा करू शकलो म्हणेखरं ते सांगत होतेगेल्या साठ वर्षांपासून भालेकर आणि मानकर कुटुंब स्नेहात अडकलेले आहेतभालेकर कुटुंबाने तर माझं जणूकाही पालकत्व स्वीकारलंहोतं - सर्व प्रकारच्या संस्कारासाठी - मटण मासे कसे खावे या पासून अभ्यास कसा करावा इथंपर्यन्तरविकाकांचे वडीलबाळकृष्णभालेकर१९६५-७० च्या दरम्यान एल आई सि चे डिव्हिजनल मॅनेजर होतेबहुदा ही पोस्ट मोठी असावी कारण तेंव्हा लॉन्ग टेनिस खेळणंआणि फियाट बाळगणं हे सोप्पं नव्हतंत्यांचा यूरोपियन रुबाब (गोरे गोमटे असल्यानेआणि मृदू हास्य माझ्या कायम लक्षात आहेआमच्या स्मरण रंजनाच्या गप्पा खूप रंगल्यामाझी आई हिरहिरीने गप्पात भाग घेत होतीभूतकाळ संपल्यावर गप्पांचा ताबा मी घेतलाशेअर मार्केट गॉसिप संपल्यावर 'म्हातारपण आणि वृद्धाश्रमयाविषयी चर्चा सुरु झालीपरांजपे यांच्या पुणे येथील 'अथश्रीयावृद्धांसाठी स्टुडिओ अपार्टमेंटची मी माहिती दिलीनासिक येथील सहारा नामक वृद्धाश्रमात मी दोनदा भेट दिली तेव्हाच्या काही'नियतीच्या क्रूरकथासांगितल्याआपलं कोणी काळजी घेणारं नसेल तर जीवन कसं 'भयदायकहोतं हे ऐकून सर्वांचं काळीज हललंहोतंपरं दुःखं शीतल असतं आणि 'करणमीमांसेलातत्पर असतंमाझी आई (वय ८२या सर्व 'गोष्टीकान देऊन ऐकत होती - बोलतनव्हतीचहापाणी झाल्यावर आम्हीं घराकडे निघालो


गाडीत तशी शांतता होतीपावसाची भुरभुर सुरु झाली होतीआईने अचानक प्रश्न केला - अनिल आम्हांला त्या वृद्धाश्रमात नेशील कारे

मी तत्काळ 'हो किंवा नाहीअसं काही उत्तर दिलं नाही. 'बघू नंतरअसं म्हणालो कारण माणूस भावनावश झाला की करतो असा विचारनंतर विषय सोडून देतो


पण तिने परवा हाच प्रश्न परत विचारला - कधी जायचंमी म्हणालो - शनिवारी जाऊया वेळी मला तिला टाळायचं नव्हतंतीकमालीची अध्यात्मिक आहेदुःख सोसण्याची ताकद प्रचंड आहेतिची काळजी तिचे पणतू सुद्धा घेतात म्हणून ती कायम आनंदातअसते


आज शनिवार असल्याने मी आईला आणि मावशीला 'सहारा केअर सेंटरमध्ये घेऊन आलोडॉक्टर सूर्यवंशी हे युनिट चालवतातत्यांनाआई आणि मावशी भेटायाला आल्या याचं खूप अप्रूप आणि आनंद वाटलासध्या येथे २३ महिला/पुरुष आणि दोन मुलं राहतातडॉक्टरांनी प्रत्येकाची ओळख करून दिलीकोणत्या परिस्थितीमुळे आज ते इथे आहे हे सांगितलंप्रत्येकाची कथा आम्हांस शॉक देतहोतीचटका देऊन जात होतीमन सुन्न करणाऱ्या गोष्टी आम्ही ऐकत होतोआमच्या सहनशीलतेची बुरुज ढासळत होते पण तरीहीआम्ही वरकरणी हसत होतो - त्यांना बरं वाटावं म्हणूननियती 'तालिबानीपद्धतीने कीती भयानक अत्याचार करू शकते हे आम्हीं बघतहोतोकोणत्याही परिस्थितीला माणसाचा स्व-भाव कारणीभूत असतो असं वाटून गेलेज्यांच्यापाशी सर्व काही ( पैसे /नातेवाईक ) असेही लोक येथे आहेशिकलेले सावरलेले आणि जीवनाच्या परीक्षेत नापास झालेले सर्व या छताखाली राहत आहेनियती 'निरपेक्षआहेगप्पा मारतांना एक उमगलं - हे सर्व तर्काच्या बाहेर आहे. 'माझं काय चुकलं ?' असा प्रश्न 'आतल्यांचाआणि 'बाहेरच्यांचाआहेप्रत्येकजण 'बरोबरअसल्याची परिणीती आम्हीं याची देहा .... डॉक्टर किती मोठी सेवा करत आहे याचा अंदाज आलासहा वाजतावृद्धाश्रमात आरती असतेआजची आरती माझ्या आईच्या आणि मावशीच्या हस्ते झाली - तसा रिवाज आहे म्हणेआम्ही नेलेल्या खाद्यवस्तूंचा 'प्रसाददाखवलाआईने अन मावशीने काही भजने म्हटलीघटकाभर का होईनावातावरण बदललं होतंबाप्पा आहे कि नाहीमाहित नाही - पण बापाच्या / बाप्पांच्या आरतीत ताकद आहे. 'तू सुखं कर्तातू दुःख हर्ताया शब्दात जादू आहेअसहाय्य आणि हतबललोकांना 'शब्दांचा'आधारआई अन मावशीने गप्पा मारल्याने प्रत्येकाला आनंद वाटला


निघतांना 'परत याअसं प्रत्येक जण म्हणालागणपतीत आरती असते तेंव्हा या असंही सांगितलंआई पण म्हणाली - 'मी माझ्या भजनीमंडळास नक्की घेऊन येते'. नंतर आम्ही निरोप घेतलामी थोडंसं वास्तववादी चित्रीकरण तुमच्याकरिता केलं


घरी परत येतांना गाडीत शांतता होतीमी समाधानी होतो कारण आईला दुःखं बघायचं होतं ते दाखवलंआपण कीती सुखी आहोत हेमोजायचे असेल तर दुसऱ्याच्या दुःखाकडे बघावंपाप आणि पुण्य मी मानत नाही तरीही विचार आला - काय पाप केलं असेल यालोकांनी कि जेणेकरून 'नरकयातनाभोगत आहे हे सर्व तेवीस ...


गाडी घराजवळ थांबलीपण विचार थांबेनामी परत जाईन वृद्धाश्रमात - केवळ त्यांना बरं वाटतंय म्हणूनछोटया छोटया गोष्टी मोठाआनंद देत असतील तर ....दुःखाला भेटायला गेलो आम्हीं ... पण आनंद घेऊन आलो ... आनंद देऊन आलो


आम्हीं बिघडलो तुम्हीं बी 'घडाना'. जाणिवा समृद्ध करायच्या असतील तर जवळच्या वृध्दाश्रमास भेट द्यातुम्हीं दुसऱ्यास आनंद देण्याससक्षम आहात हे नक्की


तळहातावरच्या रेषा कीती धूर्त असतातआपल्या मुठीत असतात पण आपल्या ताब्यात नसतात - एक चोरलेला पण सत्य विचार


#backpacking_mankar

#mankarrang


 

6/Post a Comment/Comments

 1. खूप छान लेखन.... मनाला भावले....
  हृदयस्पर्शी.....🙏🙏🙏

  ReplyDelete
 2. या व्हिडिओ द्वारे जगातला आरसा दाखवला आहे. कोणावरही वेळ सांगून येत नसते. डॅा. सूर्यवंशी मोठे काम करत आहेत.

  ReplyDelete
 3. छान ...अनुभव दिलात

  ReplyDelete
 4. सुधाकर पुंडे - The blog and total idea of sharing with link is _Best_ .
  With this I could watch _Ti Phularani_ presentation. All together very good . 👍🙏

  ReplyDelete
 5. सुधाकर पुंडे - About Sahara Care Centre -- My sister and Brother in law are presently staying there . 85 & 80 years of age . This all is due to Covid19 situation . They have very well furnished flat in Manik Nagar , Gangapur Road Their son stays in Pantagon , Savarkar Nagar . Very close to my and your house . But my sister is suffering from spondalysis and brother in law from memory loss . Brother in law does not recognise any one . Sister can not stand on her self and walk . Initially we hired two ladies for 24 hours . Paying 28,000 ₹ per month . But due ti corona problem , they stopped coming due to my brother in law tested positive for covid19 . Both were admitted in hospital for 14 days . Mean time we decided to enroll them in Old Age Home and shift them there . Furnished flat locked . Their son and daughter in law tried to help . But efforts were all in vain . Then we searched for Old Age homes . We got address for Sahara . I visited centre . Had talk with Dr Suryavanshi . Then recommended this for both -- my sister and brother in law . Since last 8 months they are staying there . Twice in a week some one in family visits them . All is real painful . But what ? Sahara care centre had taken over our burden . But pain दुःख is with us . We are forced to live like this . Old age is okay till one is in good health . Just before three years all was enjoyable . I use to visit my sister's house . She used to visit us . But ... Now all memorise . We donot know how long .

  ReplyDelete
  Replies
  1. How long is big question 🙋? Life remains mystery! I appreciate your narrative!

   Delete

Post a Comment