काल, आज आणि उद्या !


*काल - म्हणजे आठ दिवसांपूर्वी *

बोलता बोलता माझं आणि अनाहताचं अग्रीमेंट झालंअग्रीमेंट असं होतं की - ती खेळून दमली की मी तिचे पाय चेपून द्यायचे - पन्नासवेळात्याच्या बदल्यात तिने माझ्या पाठीवर पाय द्यायचे - तीन मिनिटेपण हे अग्रेमेन्ट पूर्णत्वास काही गेलं नाही कारण परस्परपूरकअसा योग आला नव्हताअनाहताला मी दोनदा आठवण करून दिली तर म्हणते - 'आज नाही हो बाबानंतर पाहू'. याचा अर्थ असा कीती दमली तरच माझ्या पाठीची 'सेवाहोणारअनाहताकडून आणि त्वमेव कडून पाठ 'तुडवूनघेणं हे माझ्याकरिता सध्यातरी स्वर्गसुखआहेदोघही हल्ली कंटाळा करतात कारण ती आता मोठी होत चालली आहे. 'पाठीवर पाय देणंही लहान मुलांचीच मक्तेदारी आहेमीसुद्धा आजीच्या पाठीवर दहा/बारा वर्षांचा होई पर्यंत पाय देत होतोत्या नंतर प्रत्येक 'वाढदिवसानंतरपाय देणं कमी झालंआजीचिडायचीपण मी काही 'भीकघातली नाहीआणि हल्ली अनाहता मला 'भीकघालत नाही


*आज म्हणजे आत्ता*

आज काय झालं - संध्याकाळी - उल्काने अनाहताकरिता फ्लोरेसंट मार्कर आणला - कुठल्या तरी दुसऱ्या तिसऱ्या अग्रीमेंट नुसारबाईसाहेब एकदम खुशपण तिला हा मार्कर घेऊन आगळा वेगळा अविष्कार कसा करावा हे सुचत नव्हतंइकडॆ तिकडे रेघोट्या मारूनसमाधान  झालेली अनाहता मोठया प्रेमाने माझ्या मांडीवर येऊन बसलीहळूच विचारलं 'बाबा तुमचे केस 'हायलाइट करू'. मी विचारलं'म्हणजे?'.  त्यावर ती म्हणाली 'ह्या मार्करने तुमचे केस पिंक शेडचे करते'. मी 'नाहीम्हणालोआधीच थोडे केस उरले आहेत्यांचे हालनकोपण आजोबांच्या 'हालाचीतिला चिंता नव्हतीतिला तिचा अविष्कार शांत बसू देत नव्हताखूप चर्चा झालीतिने लाडिक पद्धतीने- * बाबा करु द्याना हो हाईलाइट *- अश्या विनवण्या केल्यावर मी 'नेहमीप्रमाणेविरघळलोमाझं अंग आज जरा कसकसत होतंमीपरिस्थितीचा फायदा उठवायचं ठरवलं


मी अनाहताला म्हटलं 'आपण आज दुसरं अग्रीमेंट करूतू माझे केस हायलाईट केल्यावर माझ्या पाठीवर पाय द्यायचेचालेल का ?' मला वाटलं ती तत्काळ 'होम्हणेल - कारण तिचा अविष्कार वाट बघत बसला आहेपण तिने प्रतिप्रश्न केला 'कीती वेळ?'. (एव्हढीगरज असूनही तिने निगोशिएशन्स - देवाण,घेवाण चालू ठेवली.) मी सांगितलं 'दहा मिनिटे!'. त्यावर म्हणते कशी 'बाबा दहा मिनिटे जास्तहोतातपाच मिनिटे देईनचालेल?'. बॉल आता माझ्या कोर्टात होतामीही शॉट मारलाम्हणालो 'चालेल कायपळेलजेवण झालं कीकर तू हायलाईट'. माझ्या एक लक्षात आलं कि प्रत्येक वाढदिवसागणिक माणसाची देवाण - घेवाणकौशल्य वृद्धिंगत होत असतंमाणूस हळूहळू स्वार्थी होत जातोतीच्याकरिता मी जेवण आठला उरकलं आणि अंग कसकसत असल्याने गादीवर पडलो


यथावकाश 'माझे केस रंगवले गेले.' थोडासा त्रास झाला पण तो सुखद असल्याने मी ओरडलो नाहीतीच्या मुक्त अविष्कारास वाटमोकळी करून दिली - अग्रेमेन्ट नुसार - कारण पाय 'देऊन घेणंअजून बाकी होतंपार्टनरने 'धोकादिला तर कुठे कोर्ट कचेरी करणारमीजरा सबुरीने घेत होतो कारण जर ती म्हणाली असती की 'बाबा आता मी दमलेपाठीवर पाय उद्यातर मी हतबल 'आजोबाकायकरणारमाणसाच्या आयुष्यात विकल्प खूप कमी असतात असं 'वाटूनगेलंअसोउल्काने शूटिंग केलं


नंतर आमच्या पार्टनरने आमच्या पाठीवर पाय दिलेअहाहाकाय तो आनंदअंग कसकसत असतांना कोणी अशी नैसर्गिक 'क्रोसीनदीली की 'औषधात'सुद्धा मजा असते हे कळतंतेही 'नातीनेपाय दीले की असं वाटतं की 'वेळ इथेच थांबली पाहिजे.' पण तसं शक्यनाहीवेळ पुढे जाणार आणि आपण 'वाढतराहणारविचारांची आवर्तनं चालू असतांना मी झोपेच्या कधी आहारी गेलो हे कळलंच नाहीआणि स्वप्न सुरु झालेस्वप्नात मी माझ्या आजीच्या पाठीवर पाय देता आहे हे बघत आहेतिने मला पाच पैसे दिले ते आठवलंवरूननीट ऐकू आलं ती जे म्हणाली ते - 'पैसे खर्च करू नकोसाठव.' मी तिला फसवलं आणि लगेच 'रावळगाव चॉकलेट आणलं'. मग मीआणखी लहान झालेलो दिसलो स्वप्नातआई माझ्यावेळीस 'बाळंतीणझाली तेंव्हा पर्यंतआणि माझा जन्मही मी बघितलाअगदीअनाहतासारखाआणि तो पहिला 'टाहोऐकलास्वप्नातअचानक जागा झालोघड्याळात पाऊणे बारा वाजले होते


*उद्या म्हणजे - दहा सप्टेंबर *

पंधरा मिनिटांनी दहा सप्टेंबर सुरु होणारपहाटेचा जन्म माझाएकसष्ट वर्षांचा प्रवासकसा होता? - विचाराल तर सांगीन - *समृद्धप्रवासझालासगळं नीट आठवतं - पाठीवर पाय देण्यापासून ते पाठीवर पाय घेण्यापर्यंतकेवळ मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांच्याशुभेच्छा आहेत म्हणून सुंदर '  लो' ...


गंमत म्हणून गुगल केलं - १९५० पासून २१०० पर्यंतगणेश चतुर्थी १० सप्टेंबरला कीती वेळा आली आणि येणार आहे? - तर उत्तरमिळालं - १९८३२००२२०२१ - आज२०४०२०७८फक्त पाच वेळा


बाप्पा जय जय

https://www.timeanddate.com/holidays/india/ganesh-chaturthi#tb-hol_obs 

0/Post a Comment/Comments