आज सकाळी अंमळ उशिरा उठलो. सात वाजता. सायकलिंगचा मोह टाळला. म्हटलं आज 'चालू जरा'. बूट पायात अडकवत असतांनाबागेतल्या 'घंटी' जास्वदींकडे लक्ष गेलं. फुलांचा पारिजातकाप्रमाणे सडा पडला होता. ते पाहून मन आनंदित होत होतं. उल्का कालचम्हणाली होती की गेली आठ दिवस ती तिच्या मैत्रिणीला दररोज देवाकरिता फुलं पाठवत आहे. आज उल्का घरी नव्हती, म्हणून मी फुलंवेचली आणि 'पर्डी' भरली.
*पर्डी - जुना शब्द. आणि लगेच हाक ऐकू आली, आजीची. 'अनिल, म्हणजे मी, पर्डी घेऊन खाली जा आणि पारिजातकाची ५००० फुलंमोजून आण'. श्रावणातले ते १९६५-७० चे दिवस भर्रकन डोळ्यासमोर निघून गेले. 'त्या सकाळच्या गारव्यानं' अंग आता शहारलं. कायजादू आहे शब्दात. जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी. अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाब. परडी, परसराम, पोत आणिकवड्याची माळ यासोबत परडीला महत्त्व आहे. ही अंबाबाईच्या पूजेची प्रतीके आहेत.नवरात्रात परडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. परडी म्हणजे ताट आणि परसराम म्हणजे वाटी. आमची वेताची फुलांसाठी बनवलेली पर्डी बारीक वीण करून बनविली होती. पर्डी जपूनठेवली असती तर .... आजीला स्पर्श केल्याचं समाधान मिळालं असतं. माणूस आणि वस्तूंचा आपण संबंध आपण मनावर कोरूनठेवतो.*
या पर्डीभर 'घंट्यांचं' काय करायचं? या प्रश्नासह मी माझा मॉर्निग वॉक सुरु केला. उल्का घरी नसल्याने त्या फुलांचा घरी उपयोग नाही. विचार करत करत गंगापूर रोडवर चालू लागलो. जाई-जुई बंगल्यासमोर पोहचलो. हा बंगला विनयाचा, १९७६-८० ची मैत्रीण. विनयाआणि प्रदीप ( तिचा नवरा ) नेहमी आमच्या परिसरात चाफ्याची फुलं वेचायला येतात. अचानक वीज चमकली, वेगळ्या विचाराची. प्रदीपला फोन केला आणि सांगितलं ' तुमच्या देवांसाठी फुलं आणली, खाली या'. मोठा पॉझ घेतल्यानंतर, प्रदीप म्हणाला - 'विनयालापाठवतो'. निम्मी फुलं घेतांना विनयाच्या चेहऱ्यावर 'आश्चर्यमिश्रित' आनंद बघितला. मानकर कधी फुलं घेऊन येईल असा विचारहीविनयाने केला नसेल. 'वर चल, चहा घेऊ' - विनया. मी मोठ्या विनयाने 'नको' म्हणालो ( कारण नुकताच झाला होता). मलाही आनंदझाला - काहीतरी वेगळं केलं म्हणून.
मी पुढे चालत राहिलो. सिब्बल हॉटेल पर्यंत पोहचलो. तेवढ्यात वासू खेडकरची आठवण झाली. मैत्री १९८० पासूनची. मागे दोनदा तीनदाफोन केला तेंव्हा वासू पूजा करीत होता. वासूला फुलं देणं म्हंजे देवापर्यंत 'नक्की' जाणार. सोवळं नेसून पूजा करणारा भक्त. वासूलाफोन केला -'खाली ये आणि फुलं घेऊन जा' असं सांगितलं. त्यावर वासू म्हणाला 'वर ये, चहा घेऊ'. त्यावर मी म्हणालो 'मी जेवायलाबोलावल्याशिवाय कोणाकडे जात नाही!'. निरुत्तर वासू पटकन खाली आला. मी त्याची ओंजळ उरलेल्या फुलांनी भरली. वासू आनंदीझाला. मी फुलं घेऊन जाईन असं त्याला कधीही वाटलं नसेल.
पर्डी रिकामी झाली. 'डोईजड' झालेली फुलं योग्य त्या ठिकाणी गेली म्हणून मीही आनंदी झालो. घरी आलो तेंव्हा सहा किलोमीटर वॉकझाला होता. मी शांत अन समाधानी होतो. येतांना 'पांढरीशुभ्र काटे कोरांटीची' फुलं दिसली. सुनेच्या देवासाठी ती तोडली ... पर्डी परतभरली. भा रा तांबे यांची कविता आणि त्या ओळी आठवल्या - *नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं; देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणीं कशी तरी.* कविवर्य भा.रा.तांबे यांची ही कविता म्हणजे अंथरुणालाखिळलेल्या जर्जर माणसाने अंतसमयाची चाहूल लागल्यावर जणू मृत्यूशी केलेली गुजगोष्टच आहे…..
मी तर 'आयुष्याशी' बोलत आहे. पर्डी भरणं आणि रिकामी करणं.
वाचकहो, या नॅऱ्याटिव्ह मध्ये तुम्हांला एखादी 'गोष्ट' दिसली का? सकाळी सकाळी मी 'आनंद ' निर्मित केला... याची ही गोष्ट होईलका?
Post a Comment