दोरीवरची कसरत - दसरा


 नातवाची परवानगी घेऊन मी त्याच्या सायकलवर टांग मारलीवहिनीकरीता चहा घेतला आणि हास्पिटल मध्ये पोहचलोचहा घेतांनावहिनींनी सांगितलं - 'आज डीसचार्ज मिळणार आहेदादांना दुपारी घरी घेऊन जाऊ'. मी म्हटलं 'बरं झालंघरी गेल्यावर सण असल्यानेदादालाही बरं वाटेलमनाला उभारी येईल'. वहिनींची प्रतिक्रिया 'हो ही नाही अन नाही ही नाही'. किंचित पाणी डोळ्यात तरळलंमाझ्याभावाच्या घरी 'वेदनामय आनंदाचीदोरीवरची कसरत चालू होतीआज दसऱ्याच्या दिवशीतरी बरं घरात 'घटबसले आहेतमनातविचार आला - दुखंवेदना यांना वेळ काळ नसतोसहज बघितलं तर - हॉस्पिटल 'गच्चभरलं होतं, ICU सहितसर्वव्यापी, omnipresent ... दुखं.


सकाळी घरी परततांनालाऊडस्पीकर मधून लाऊड आवाज रस्त्यावर ऐकलाबघतो तर येथेही 'दोरीवरच्याकसरीतेचे दुकान मांडलेहोतेकुटुंबात पाच जण - नवरालेकुरवाळी अन तीन लेकरंमोठया मुलाचं काम - दोरीवरून चालायचंबापाचं काम - मुलगा बॅलन्ससांभाळतो कि नाही हे बघायचंआईचे काम - परातीत पैसे गोळा करणंलेकराचं काम - आईचं दूध पिणंदुसरं लेकरू - उघडं नागडं - रस्त्यावर रांगत होतंरस्ता वाहत होतापण काहीजण 'हाखेळ थांबून पहात होतेकाहींना वेळ नव्हता तरी थांबत होतेएखादी नोट देतहोते आणि लगेच पुढे जात होतेनोट देणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतंबरं नोट देणारे खूप 'श्रीमंतहोते असंही नाहीएकही चारचाकीवाला थांबला नाहीमाझ्याकरता 'हेदृश्य 'विलोभनीयहोतं कामी 'रेंगाळलोतेथेशूटिंग केलंमनात तरंग उमटतहोतेया कुटुंबाला आज 'दसराआहे हे माहित आहे काआयुष्य जगण्यासाठी जी कसरत करावी लागत आहे त्याला कुटुंबप्रमुखजबाबदार आहे - तीन मूलं !? - याची जाणीव त्याला असेल का ? अस्थायी कुटुंबाचे प्रश्नखूप श्रीमंत राहत असलेल्या 'नयनतारासोसायटीच्या गेट समोर हे 'नयन मनोहरदृश्य मी अनुभवत होतोलांबलचक BMW ला बाहेर पडायला अडचण होणार होती हे नक्कीतेव्हढ्यात गार्ड म्हणाला -'साहेब सायकल थोडी पुढं घ्या'. मी घेतली


आर्थिक विषमता जाणवलीपण दसऱ्याच्या दिवशी 'आनंदाची विषमतापण जाणवलीमाझ्या भावाकडे 'तणावमिश्रित आनंदआहे तरमाझ्याकडे 'आनंदआहेरस्त्यावरील कुटुंबाला तर 'आनंदम्हणजे काय .. हेच माहित नसावं


सगळीकडे 'दोरीवरीलकसरत


आमच्या घरासमोर बंगला तयार होत आहेमजूर लोक आपल्या 'हत्यारांचासन्मान करत आहे हे बघून बरं वाटलं.


दसरा किंवा विजयादशमी हा भगवान रामाचा विजय किंवा दुर्गा पूजा म्हणून साजरा केला जातोदोन्ही प्रकारांमध्ये हा शक्ती-पूजेचासण आहेशस्त्र पूजेची मुहूर्त आहेहा आनंद आणि विजयाचा सण आहेदसऱ्याचा सण दहा प्रकारच्या पापांचा त्याग करण्याची प्रेरणादेतोवासनाक्रोधलोभमोहवेडेपणामत्सरअहंकारआळसहिंसा आणि चोरी.


दसराहार्दिक शुभेच्छाघरी आलो तर , अनाहत  देवीचं चित्र काढत होतीमस्त वाटलंसर्व वेदनांचा मला विसर पडला

3/Post a Comment/Comments

  1. सुख दुःख कोणालाच चुकलेले नाही..सुख आलेले कळते पण ते असलेला काळ कधी ओसरला ते कळत नाही. दुःखाचे असे नाही. ते आलेले कळते, बोचते व जाता जात नाही असे वाटते. तुमच्या माझ्या वयाच्या माणसांनी दोन्ही वेळी मनाचा संतुलिपणा टिकवायला हवा एव्हढे नक्की. सुखाच्या काळात काहीच करायचं नाही..फक्त एन्जॉय करायचं पण दुःखाच्या काळात हेही दिवस जातील अशी अपेक्षा करायची आणि मुख्य म्हणजे कोलमडून जायचं नाही कारण त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. ही प्रतिक्रिया कृष्णा दिवटे यांची आहे

      Delete
  2. सुख दुःख कोणालाच चुकलेले नाही..सुख आलेले कळते पण ते असलेला काळ कधी ओसरला ते कळत नाही. दुःखाचे असे नाही. ते आलेले कळते, बोचते व जाता जात नाही असे वाटते. तुमच्या माझ्या वयाच्या माणसांनी दोन्ही वेळी मनाचा संतुलिपणा टिकवायला हवा एव्हढे नक्की. सुखाच्या काळात काहीच करायचं नाही..फक्त एन्जॉय करायचं पण दुःखाच्या काळात हेही दिवस जातील अशी अपेक्षा करायची आणि मुख्य म्हणजे कोलमडून जायचं नाही कारण त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. ...कृष्णा दिवटे

    ReplyDelete

Post a Comment