विक्रम योगेश परदेशी
*परवा काय झाले?*
सांगतो. दिवसातून पहिल्यांदा, दुपारी, व्हाट्स अप वर आलेला कचरा (फॉर्वर्डस) हातावेगळा करत होतो. आणि ... अचानकमोत्यासारखी पोस्ट हातात 'गावली'. संस्कार भारती तर्फे आयोजित प्रोग्रॅम होता - अभिवाचनाचा. लेखक सोमण यांनी साधारणपंचेचाळीस मिनिटांचं नाटक लिहिलंय - द प्लॅन : जॅकसन वध ; खूप विचार न करता संध्याकाळी 'अभिवाचन' ऐकण्यास गेलो. मजाआली. वेळ वाया नाही गेला. वाचावं कसं हे शिकलो. दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी तेथे हजार होता - त्याने 'अभिवाचनाला' दिग्दर्शनमिळालं की वाचनातही नाट्य दिसते - हा मुद्दा मांडला. नंतर 'संस्कार भारतीला' येत्या वर्षभरात ज्ञात आणि अज्ञात 'स्वातंत्र्यवीरांना' लोकांसमोर आणून त्यांना आदरांजली द्यायची आहे - अभिवाचन आणि नाट्य - या माध्यमातून - असंही सांगितलं. ज्यांना कोणाला याउपक्रमात भाग घायचा असेल त्यांनी संपर्क साधावा.
माझा आणि 'नाटक करणे' याचा दुरान्वये सुद्धा संबंध नाही. पण उल्का ही कधीकाळी 'नाट्यकर्मी' होती आणि आजही तिला 'नाटक' करण्याची जबर इच्छा आहे हे मी जाणून होतो. गप्पा मारता मारता मी दिग्दर्शक मुकुंदाला सांगितलं की - 'आम्हांला म्हणजे उल्कालाइंटरेस्ट आहे !' गप्पांच्या ओघात तो 'अभिनय कार्यशाळेविषयी' बोलला. मी विचारलं - आम्हांला भाग घेता येईल का? तर तो म्हणाला - समितीची संमती घेतो आणि सांगतो ! मला 'नाटक' जास्त समजून घ्यायचे होते. नुकतंच मी अतुल पेठेचं 'शब्दांची रोजनिशी' हे नाटकबघितलं. 'अतुलचा अभिनय आवडला' असं अभय सदावर्तेला म्हणालो तर अभय म्हणतो - ''अरे अभिनयाचं 'तंत्र' आत्मसात केलं कीझालं सगळं! '' अभिनय केवळ तंत्र आहे का? या प्रश्नाचा वेध घ्यायचा होता. उल्का सुद्धा येत आहे कारण तिला 'नाटक' करायचे आहे.
*आज काय झाले?*
सहा तासांच्या कार्यशाळेकरिता आम्ही सकाळी पाच वाजता निघून दहा वाजता कार्यशाळेत पुणे येथे दाखल झालो.
पहिला वर्ग गोखले सरांचा. ७६ वय असलेलं प्रचंड व्यक्तिमत्व. सरांचा प्रत्येक शब्द कान देऊन ऐकत होतो. पण मात्र सरांना त्यांच्यावडिलांबरोबर बघत होतो. 'त्या' बॅरिस्टरला विसरता येणारच नाही. इतकेच काय, कुठे डुलणारी खुर्ची दिसली, की— बॅरिस्टरआठवणारच! १९७७ साली ‘नाट्यदर्पण’ची एकाच वेळी नऊ पारितोषिके पटकावणारे एकमेव नाटक ते. तेंव्हापासून सरांना बघतोय. आज 'दमल्यासारखे' वाटतात, पण मोती उधळत आहे असे वाटले. नट व्हायचं असेल तर - self awareness हवा ; partner’s observation करण्याची कुवत असली पाहिजे ; actor should be able to reflect on self ; आणि समूहनितीची जाण असलीपाहिजे. 'ensemble' - चा अर्थ आहे - a small group of musicians, dancers or actors who perform together. गायक, नर्तककिंवा नट यांचा प्रयोग करणारा छोटा गट; वाद्यवृन्द, गायनवृन्द, नटवर्ग. - actor must create faith in team. Actor should react first and then talk. वैगरे वैगरे . वर्ग ५/६ तास चालला.
मी माझा प्रश्न विचारला - नाटक हे केवळ तंत्र आहे का ? तर विक्रम सर म्हणाले की - तंत्रावर मास्टरी हवीच , प्लस spontaneity - उत्स्फूर्तता हवी. Art must be added on.
दुसरा वर्ग सोमण यांनी घेतला. साधारण तीन वर्षांपूर्वी, सा वा मध्ये शेवटच्या रांगेतून त्यांना बघितलं होतं. मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीरसावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारा त्यांचा ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा एकपात्री प्रयोग खूप गाजला आहे. मुंबईविद्यापीठाचा 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस' या नाट्यशास्र विभागाच्या संचालकपदी योगेश सोमण आहे. 'कार्यानुभवातून ' आलेलं ज्ञानऐकतांना वेगळी मज्जा येत होती. स्वातंत्र्याची ७५ वर्षे कशी साजरी करायची हे सांगितलं.
तिसरे सर - गिरीश परदेशी. नवीन ऍक्टर आहे. मला त्यांच्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ते आले नाही.
एकंदरीत अभिनय कार्यशाळेचा अनुभव भन्नाट वाटला. जसा फिल्म अँप्रिसिएशन कोर्स एकदा तरी करावा तसा अभिनय कार्यशाळेतएकदा तरी सहभागी व्हावे. आपल्याला कितपत 'खोटं खोटं किंवा खरं खरं नाटक करता येतं का ?' याचा अंदाज येतो.
कोणतीही नवी गोष्ट शिकली की माणूस उत्साहित होतो. या उत्साहाच्या भरात मनात विचार आला की हे सर्व आपण 'गद्धे विशीतपंचविशीत' असतांना केलं असतं तर जीवन आणखी 'डोळस' झालं असतं. जसं, उल्काच्या संगतीत राहून शास्त्रीय संगीत खूप ऐकलंतसं. सिनेमाचं बाळकडू वडलांकडून मिळालेलं होतं. नाटक बघणे परवडत नसायचं म्हणून जरा कमी. सत्तर ऐंशी च्या दशकात रुपये ३५हे फार पैसे होते.
*असो. आजचा दिवस 'सत्संगतीत' गेला. 'कलाकार' नाही होता आलं तरी चालेल पण कलेचा आस्वाद घेणं जमलं पाहिजे. नाहीतर'साठी उताराची कहाणी' नि-रस होणार हे नक्की. *
Post a Comment