मी घराबाहेर पडतोय, नासिकच्या बाहेर. बरोबर दोन वर्षानंतर. एकटा. फक्त दोन चाकांवर. दिवाळी नंतर. उंडारायला. उंडारणे याचा अर्थ - विशिष्ट दिशा किंवा हेतू न ठेवता हळूहळू चालत जाणे; निर्हेतुकपणे फिरणे, भटकणे, रमतगमत जाणे, हिंडणे.
पण माझं उंडारणं हेतू सहित आहे. माणसांचा आणि स्थळांचा शोध घेणं ; त्यांच्याशी बोलणं - त्यांना गोष्टी सांगणं आणि त्यांच्या ऐकणं ; एखाद्या गोष्टीबाबत स्वतःला प्रश्न विचारणं ; नवल अनुभवणं; उत्तर भारत बघायचा प्लॅन आहे. जैसलमेरचे वाळवंट, काश्मीरची पांडव कालीन मंदिरं, गंगासागर येथील गंगेची भेट अशी ठिकाणं साद घालत आहे.
प्रवास करतांना खूप लोक भेटतील त्यांना उत्साहित करणं आणि त्यांना क्षणभर का होईना, आनंद देणं - हा मूळ उद्देश. इथे मला तुमची मदत हवी आहे. असं एखादं हिंदीमध्ये स्लोगन सुचवा जे मला प्रत्येक पांथस्थाबरोबर म्हणता येईल आणि ' Mahesh - घुम घुम सैर करेंगे दुनिया की हम तुम याद रखेंगे दोस्ती की' ही भावना निर्माण करता येईल. आकर्षक 'नारा' दोन ओळींचाच असावा. त्यात 'लय आणि ताल' असावा जेणेकरून 'मोठ्याने समूहात' ओरडता येईल.
ही स्पर्धा आहे. जिंकणाऱ्याचा योग्य तो सन्मान नक्कक्क्की .... हा हा हू हू. catchy music or words are pleasing and easy to remember, like the sort often used in advertising.
Mankar - Backpacking Continues.
Disclaimer - this is a plan with all sorts of uncertainty - man proposes and god …
Post a Comment