आज सकाळी उठल्याबरोबर व्हाट्स अप उघडलं तर, नट योगेश सोमण यांची मस्त पोस्ट वाचली. सांगत होते - कुठेतरी नाट्य कार्यशाळाघेत आहे. नाट्य संहिता कशी लिहायची याचं मार्गदर्शन करत आहे. त्यांनी पहिल्या सत्रात काही 'टिप्स' दिल्या त्या वाचल्या. त्याचबरोबर 'गृहपाठ' सुद्धा दिला. पहिला अभ्यास म्हणजे - Characterization - नाटकातील भूमिकेशी नाटककाराचा सवांद व्हायलाहवा. सुरवातीला लेखकाने आपल्या स्वतःशी आपला संवाद साधला पाहिजे - प्रामाणिकपणे. 'संवादाची' सूरवात स्वतःपासून व्हायलापाहिजे. स्वतःचं 'character’ लोकांसमोर आणणं हा उद्देश. दुसरा अभ्यास - घटनेची कथा. मी लगेच 'पहिला अभ्यास' पूर्ण केला. बघाआवडतो का? स्वगत ऐकता सुद्धा येईल -हे वाचन आहे - त्यात नाट्य नंतर 'ओतता' येईल.
*स्वगत*
घडाळ्याच्या काट्याने साठ वर्षे पूर्ण झाल्याचं दाखवल्याबरोबर मी 'मरणाचा' विचार करू लागलो, अपसुकपणे. अगदी सहजतेने. नकळतपणे का? नाही! 'संपलं एकदाचं, झालं सर्व काही' अशी मनाची धारणा झाली आहे. एकशे विसव्वा चेंडू टाकल्यावर सामनासंपलेला असतो अगदी तसंच मला वाटू लागलंय. आजही मी मनाचा वेध घेऊ लागलो आहे.
मंडळी मला मरणाची भीती वाटतेय का? तर नाही. भरपूर, हो अगदी भरपूर जगून झालंय हे नक्की. ह्या पृथ्वीतलावावर नुसतं 'श्वासघेणारा' म्हणून माझं अस्तित्व तर नक्कीच नव्हतं. इथं आणि तिथं जाऊन 'जगणारा माणूस' असा माझा 'प्रेझेन्स' होता. मी सर्व अर्थांनीश्रीमंत आहे. किंबहुना मी आजतरी 'सुखी आणि शांत' आहे. हे सांगताना मला कसलाही संकोच नाही. उद्या काय होईल याची भीती नाही.
मला 'इथपासून ... तिथपर्यंत ... मरणाच्या क्षणापर्यंतच्या प्रवासाची किंवा क्षय होत जाणाऱ्या प्रक्रियेची भीती वाटते का? तर तसंहीनाही. इतरांची दुखं पाहून, त्यांची मृत्यूशी झटापट पाहून मी किंचित निर्ढावलो आहे. या प्रवासातला हा अंतिम टप्पा, मुक्तता देणाराटप्पा, अवघड आहे याची मला जाणीव आहे. हा टप्पा शेवटच्या 'ओव्हर' सारखा आहे. सगळं काही ओव्हर होणार हे नक्की कारणघड्याळ चालू आहे, श्वास चालू आहे. आज मी अनुभवसिद्ध आहे. म्हणून मला दृष्टी आहे. दृष्टी असली की भीती वाटत नाही. तर मंडळीदररोज 'क्षय' होणाऱ्या या जीवनाची, जिवंत पणाची भीती मला नाही.
'मग कसली भीती वाटते मानकरा तुला?' असं तुम्हीं विचारताय ना? - माहित आहे मला. मी ते सांगितल्यावरच थांबणार आहे!
मंडळी, मला भीती वाटत आहे कुठेतरी चाललेल्या 'संभोगाची'! कामवासनेची! माझ्या 'इहलोकी' जाण्याच्या नेमक्या क्षणी त्यांचा भोगटिपेला पोहचला असेल तर मी 'कुठेतरी' परत अडकणार, या तलावावर. नऊ महिन्यानंतर आहेच टाहो. माझं आक्रन्दन कोणालाचकळणार नाही. मला अंधार हवा होता पण हे काय ... अरे मी तर पुनश्च प्रकाशात आलो. त्यांच्या 'आनंदाच्या कुजबुजीत' माझं आक्रन्दनविरून जातंय. मी ही, कदाचित नाइलाजाने, दूध पिऊन जगायला सुरवात करणार ... नवा गडी, नवे आईबाप. मला या पुनर्जन्माची भीतीवाटत आहे .. मग तो जन्म पृथ्वीवर असो की मंगळावर. मला तो नवा 'सामना' नकोय. अगदी कर्णधार असलो तरी.
पण मंडळी, या पुनर्जन्माच्या सोनेरी क्षणी, आकाशवाणी व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण विचारताय तुम्हीं? सांगतोय ना ...
मला पक्षी व्हावंसं वाटतं. मोर. रंगांवर प्रेम करणं अजून बाकी आहे हो. किंवा मला फ्लेमिंगोचा जन्म घ्यायला आवडेल. मस्तपैकीसायबेरियामधून उडावं, हिमालय पार करावा आणि दक्षिण ध्रुवावर उतरावं.
असो. खूप बोललो तुमच्याशी. की स्वतःशी? बहुदा स्वतःशी ! कारण आपल्या मानवजातीत 'मरणाविषयी' बोलणं 'न-कारात्मक' समजलं जातं. अस्तु.
स्वगत संपलं. तुम्हीं काय विचार करत आहात ते मला लिहा. ऐकल्यानंतर 'जे' वाटलं 'ते' लिहा - स्वतःशी बोला.
सगळं ठाकठीक असताना, सांपत्तिक चिंता नाहीत, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम आहे आणि गात्रे थकलेली नाहीत अशा अवस्थेत मरणाची भीती वाटत नाही असे वाटणे सहज प्रवृत्ती आहे. बहुधा सगळ्यांच्या बाबतीत हे घडत असावं. प्रथम उल्लेख केलेल्या दोन गोष्टी कायम रहातील पण एक ना एक दिवस गात्रे तर थकणारच. मला वाटते त्या अवस्थेत तर्कापेक्षा भावना हावी होतील, हळवेपण वाढेल आणि मग कदाचित वेगळे विचार मनात यायला लागतील. सगळ्यांच्या बाबतीत हे असंच घडत असावं पण खरी परीक्षा असेल शरीर सिग्नल द्यायला सुरुवात करेल तेंव्हा.
ReplyDeleteसगळं ठाकठीक असताना, सांपत्तिक चिंता नाहीत, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम आणि गात्रे थकलेली नाहीत अशा अवस्थेत मरणाची भीती वाटत नाही असे वाटणे सहज प्रवृत्ती आहे. बहुधा सगळ्यांच्या बाबतीत हे घडत असावं. प्रथम उल्लेख केलेल्या दोन गोष्टी कायम रहातील पण एक ना एक दिवस गात्रे तर थकणारच. मला वाटते त्या अवस्थेत तर्कापेक्षा भावना हावी होतील, हळवेपण वाढेल आणि मग कदाचित वेगळे विचार मनात यायला लागतील. सगळ्यांच्या बाबतीत हे असंच घडत असावं पण खरी परीक्षा असेल शरीर सिग्नल द्यायला सुरुवात करेल तेंव्हा.... कृष्णा दिवटे
Post a Comment