'राग' कोणता?
दुगावच्या अलीकडची चढण आता 'पायाखालची' नसून 'सायकल खालची' असं म्हणणं जास्त योग्य राहील. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डापाठ झाला की सायकल आपोआप वळणं घेत असते. त्यामुळे 'इकडे तिकडे' बघता येते. त्यात मी सायकल अत्यंत 'विलंबित ख्यालात' चालवतो, जेणेकरून सर्वांची ख्याली अन खुशाली समजते.
अचानक 'ते' दिसले. चाळीस पन्नास असावेत. एका रांगेत बसले होते. तारेवर. थबकलो. थांबलो. चिवचिवाट कर्णमधुर होता. सुश्राव्यहोता. रस्त्याच्या कडेला सायकल लावली. दहा मिनिटे बघत होतो, टक लावून. पक्षी काळे होते पण 'गात' सुंदर होते. जेवढे पक्षी उडूनजात होते तेव्हढेच नवे येऊन बसत होते. त्यामुळे तारेवरच्या पक्ष्यांची लोकसंख्या ( सॉररी पक्षीसंख्या ) बदलत नव्हती. परिसरातल्यामोठ्या झाडांवर जे वेगळे पक्षी होते त्यांनीही तारेवरच्या पक्षांना 'सूर' दीला होता, जसा मोठ्या गायकाला ते तांबोरेवाले देतात तसा. आजधुकं होतं, दव पडलेलं होतं. त्यामुळे वातावरण कुंद अन थंड होतं. मी शुक शुक केलं तर कोणीही 'गायक' तारेवरून जागचे हलले नाही. बहुदा त्यांना वाटत असावं की मी 'दाद' देत आहे. 'दुसऱ्या कडून दाद मिळावी' अशी अपेक्षा सर्व प्राणिमात्रांची असावी. वातावरण 'मंत्रमुग्ध' झाले होते. पहाट संपत असतांनाचा गार वारा अंग शहारून टाकत होता. मी त्या पक्षांबरोबर योग साधत असतांना, इतरसायकलिस्ट पुढे जात होते - काहीही न बघता .... मला वाटलं 'कीती उदासीन आहेत ही लोकं?! निसर्गात असूनही निसर्गाकडे दुर्लक्ष! नुसती कॅलरीज जाळण्यासाठी धडपड'. ओरडून सांगावसं वाटलं - *अरे बाबांनो हा नजारा बघा. दोन तीन मिनिटांनी हे सर्व चोवीसतासांकरिता नाहीसं होणार. पाहट फटफटायला लागली आहे. हे पक्षी सूर्याची वाट पहात आहे. एकदा का 'उदय' झाला, की माणसांचंराज्य. यांची 'मैफिल' संपणार. मग फक्त धूर आणि कर्णकर्कश्य आवाज'*
'तो पहा, तो सूर्योदय'. सूर्योदय झाला. तारेवरची मैफिल संपली. पक्षी उडून गेले. दोनतीन मिनिटात मोठ्या झाडावरचे पक्षी सुद्धा शांतझाले. दुचाक्या, चारचाक्या जोरात धावू लागल्या. कोलाहलाला सुरवात झाली. माझ्या दहामिनिटांच्या आनंदावर विरजण पडू लागलं. मी घराकडे वळलो. सर्व प्राणिमात्रांसाठी चोवीस तासांचं आवर्तन सुरु झालं.
काल 'बार्दो' नावाचं नाटक पाहिलं. मृत्यू आणि पुनर्जन्मच्या दरम्यान जे घडतं त्यावर गंभीर पण मार्मिक टिपणी बघितली, ऐकली. हाविषय " द तिबेटीयन बुक ऑफ डेड " या बौद्ध साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरीत सुद्धा डिस्कस केला आहे.
मनात विचार आला - 'जिवंत असतांना सुद्धा आपण 'जिवंत असल्यासारखे' वागतो का ?'
जाऊद्या, चित्रफीत बघा आणि माझा अनुभव अनुभवा. मला अजून एक प्रश्न पडला आहे तो असा - पक्षी कोणत्या रागात चिवचिवाटकरतात?
Beautiful scenery and good photography
ReplyDeleteफारच सुंदर व्हिडीओ, सुश्राव्य कूजन
ReplyDeleteस्नेहल साठे, भांडुप
DeletePost a Comment