तू काय लिहिशील .... रे ?




काळ-काम-वेग .... शाळेत ही गणितं सोडवताना माझी फार तारांबळ उडायचीशाळा अन कॉलेजच्या दरम्यानच्या सर्व भाउबीज्या मलाआठवतातपण त्या नंतर आयुष्यात वेळ वाऱ्यावर स्वार होऊन पळू लागलाआज मला 'आशालाशेवटची ओवाळणी कधी घातली तेआठवत नाहीबहुदा तिचं लग्न झाल्यावर मी फराळाचा डब्बा घेऊन जात असे तेंव्हासाधारण १९८७ पर्यंतनंतर व्यस्त प्रमाणाचीगणिते (काळकामवेग), खऱ्या आयुष्यातीलइतकी व्यापक झाली की 'भाउबीजात्या तारंबळीत गुदमरून गेल्या


पण २०२१ मध्येआजतसं नाहीकाळ काम वेग या तीनही variables ची किंमत आज मी 'शून्यकरून टाकली आहेआज आशा खासभाऊबीजेला नासिकला आलीआमचीदत्ताची आणि माझीभाऊबीज मस्त साजरी झाली


आशा अजूनही मला तेव्हढीच निरागस वाटते जेव्हढी ती लहानपणी होतीमागच्याच आठवड्यात जेंव्हा ती नासिकला येणार असं सांगतहोती तेंव्हा तिने 'बालसुलभप्रश्न विचारला - तो असा - 'तू एव्हढे इतरांवर ब्लॉग्स लिहितोजेंव्हा माझ्यावर ब्लॉग लिहिशील तेंव्हा कायलिहिशील?'. माझ्याकडे तिच्या प्रश्नावर उत्तर नव्हतेपण तिच्या अपेक्षा जाणवल्या - त्याही शब्दांच्याआपल्या बद्दल 'दुसराकायविचार करत असेल याचं प्रत्येकाला कुतूहल असावं बहुदा


दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'कलाकारानेआपल्याला काही तरी वैयिक्तकरित्या द्यावं असं वाटणंमलाही वाटतंनुकतंच घरसजवलंचारुदत्त कुलकर्णी (माझा मित्र ) आणि अच्युत एरंडे (माझे व्याहीह्या चित्रकारांकडून मी त्यांची ऑइल पेंटिंग्स मागून घेतलीसरोज म्हसकर यांनी माझं 'तैलचित्रओळख नसतांना चितारले अन मी ते 'समारंभ पूर्वकमिळवलंसंतोष पाठक मला म्हणाला 'काकातुम्हांला एक चित्र भेट द्यायचं आहे !' त्यावर मी म्हणालो 'इस्तान्बुल येथील प्रदर्शनातील चित्र तू रेखाट'. बिपीन बखले याने माझा लोगोतयार केला तर सचिन पाटील माझ्यासाठी दहा सेकंदाचं अनिमेशन करणार आहेकिशोर सोनवणे - माझ्यासाठीचं शिल्प कुठंपर्यन्तआलंशांताराम दादाने दिलेली चित्रं टेबलवर असतात नेहमी मला 'कलाकारांकडेत्यांच्या कलेची भीक मागतांना संकोच वाटत नाहीआहो मला हे कलाकार कायमस्वरूपी घरी हवे आहेम्हणून हा 'आटापिटा'. माझं घर 'आर्ट गॅलरीआहे


याच कारणासाठी आशाने व्यक्त केलेल्या अपेक्षेत मला विचित्र नाही वाटलंकिंबहुना तिने 'हक्कानेकाहीतरी मागितलं याचा आनंदझालाआशा सर्वसामान्यसर्वमान्यसुखी आणि समाधानी आयुष्य जगात आहेमुली शिकल्यावर आईच्या चेहऱ्यावर जो आनंद असतोतो ती बाळगून आहे - प्राची वास्तुविशारद आहे तर प्राजक्ता फॅशनकार आहेनवरासुहाससुस्वभावी आहे - आर बी आय मध्ये कष्टकेल्यावर ( कष्ट = पनवेल ते व्ही टी हा लोकल प्रवास चाळीस वर्षेहल्ली मुलींच्या संसारात मदत करतात


आता माझा उलट प्रवास सुरु झालामी दादा असल्याने आशाचं बोट धरून तिला शाळेत नेण्याआणण्याची जबाबदारी माझी होती १९७३ च्या दिवाळीत अण्णांनी तिला माझ्या शर्ट पॅन्ट पेक्षा भारी फ्रॉक शिवला होता - बॉबी मधील डिम्पल सारखा - म्हणून वाईट वाटलंहोतं हे आठवलं आणि याचं आत्ता मला हसू आलंआम्हीं बिनाका गीतमाला बरोबर ऐकायचोआम्हीं कधीच भांडलो नाही हेही आठवलं१९८०-८५ च्या दरम्यान माझा पगार रुपये १३०० होता - तेंव्हा - बहिणीच्या लग्नाची जबाबदारी म्हणून - मी अण्णांना रु १५००० दिलेहोतेत्यांनी मला सांगितलं 'असुदेकमी पडले तर दे !'. तिचं लग्न झाल्यावर मी बऱ्याच वेळा पनवेलला जायचोतिचं सासर 'खटलंहोतंएकत्र कुटुंब. 'अनिल येतो आहेअसं कळलं की तिचे सासरे 'माश्यांचा बाजारकरीत आणि सासू एकाचवेळी 'कोळंबीघालून वांग्याचीभाजीएक अखंड पापलेट आणि हलव्याचा तुकडामाझ्या ताटात वाढेआमची 'आशाभरल्या घरात आहे याचा खूप आनंद वाटायचा. ..... 'आशाअगं खूप लिहिता येईल पण थांबतो' ..


*तुझे आमचे नाते आताअद्वैताची मांदियाळी

माहेरावर अन सासरावर आतातुझ्या प्रेमाची सावली..*


मी तुझ्यापेक्षा मोठा म्हणून खूप 'आशीर्वाद'. आज तू मागितलेली ओवाळणी - शब्दांची ओवाळणी - देत आहेखूप लिहिता येईल इतकंसाचलं आहे मनातशेवटी गंमतीने म्हणेन - 


*आधी ओवाळी ओवाळी.., 

बहिण भाऊराया भोळी.., 

आता गिफ्ट आधी ठरते..,

तेव्हा बहिण ओवाळी..*


पण एक लक्षात ठेव - 

*आता झाली संध्याकाळदिवेलागणीची वेळ

एक एक पणतीच्याआली निरोपाची वेळ...* म्हणून येत रहामाहेरीकाळ - काम - वेग यांची गणितं भयंकर असताततू आज अडतीसवर्षानंतर आली आहे


(कवितांच्या ओळी चोरलेल्या आहेत !) 

0/Post a Comment/Comments