असेन मी नसेन मी




*शब्दव्रती मी ...

असेन मीनसेन मी ...*


चार चौघात आपण स्वतः एखादं नाटक 'वठवलंकी स्वतःस मस्त शाब्बासकी देतोपण त्याचप्रमाणे नाट्यकर्मींनी एखादं मस्त नाटकमस्तपणे 'वठवलंतर आपण त्यांचं 'मुक्तकंठानेकौतुक करतो काविचारा प्रश्न स्वतःलाबहुदा नाही


/ दिवसांपूर्वी लोकहितवादी मंडळानेसाहित्य संमेलनाच्या पूर्व संध्येला एक भन्नाट नाटक सादर केलंते खूप सुंदर होतं म्हणून मीठरवलं 'निवांतपणेकौतुकाची पावती द्यायची आणि जमलं तर काही 'सुधारणेसाठीसूचना द्यायच्याआताच सांगतोमी नाट्यकर्मीनाही आणि मला संगीतातलं काही(हीकळत नाहीत्या मुळे 'सल्लाघ्या ... की ...


हे नाटक शब्दव्रती शांता शेळके यांचा संगीतमय जीवन प्रवास सांगणारं होतंवंदना अत्रे यांनी 'शांताबाईयांनाच पाचारण केलं होतंमला ही आयडिया खूप आवडलीतीन शांताबाई ! लहानपणीची शांताशाळा कॉलेज मध्ये जाणारी शांता आणि वयस्कर 'शांताबाई'.  विद्या करंजीकर यांनी सादरकेलेली 'शांताबाईअप्रतिमती वरचेवर पदर सारखा करण्याची लकब विद्याने मस्त दाखवलीयालाच'बेअरिंगम्हणतात काएखाद्या(लकबीमुळे मोठया व्यक्ती 'साकारतायेते त्याचं हे सुंदर उदाहरण. 'तो चष्मासुद्धा अभिनय करतहोतामूळातच शांताबाईंची आणि विद्याची 'शाररिक ठेवणीतखूप साधर्म्य आहेइतर 'शांतासुद्धा खूप सुंदरपाठांतर आणि अभिनय - एकदम भारीशांताबाई यांचा जीवन प्रवास दोन तासात 'दाखवणंहे काम सोप्पं नाहीपण वंदना यांनी हे 'शिवधनुष्यछान पेललं आहेकारण नाट्यगृहातून बाहेर पडतांना 'आपल्याला शांताबाई कळल्याअसं प्रेक्षक म्हणत असावेयातच 'लेखकाचं यशआहे


नाटक हा एक दृक्‌श्राव्य कलाप्रकार आहेनाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रिया-प्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा आकृतिबंध होयशांताबाईंचा हा 'आकृतिबंधमुकुंद कुलकर्णी यांनी 'अजबपद्धतीने साकारला आहे. 'मुकुंदहे एक अजब रसायन आहेकाहीतरी 'वेगळीपद्धत तो मांडतोरसिकांसमोरया नाटकात द्वंद्व नाहीउदबोधन आहेशांताबाईंच्या एन्ट्री पासून ते एक्झीट पर्यंत मुकुंद आपल्याला'शब्दव्रतीच्या डोहातबुडवून ठेवतोपुढे कायअसं वाटत असतांनाएक्झिटडोह निर्माण करतांना प्रकाशयोजना सुंदर वापरली आहेपण मुकुंद सरस्पॉट्स नेहमी / सेकंद उशिरा का येत होतेते जरा बघातुमचा स्पॉट जेथे पडतो तेथे रसिक 'एकाग्रहोतात म्हणूनत्यात 'डीलेनको


*अजून एक सांगायचंनेपथ्यातून रंगमंचावर स्थळं जिवंत होतातत्यावरच संहितेतलं नाट्य खुलून आशयरूप होतंपण या नाटकातीलनेपथ्य अगदीच सुमार होतंकाहीच 'सुचवतनव्हतंमी जर नेपथ्यकार असतो तर 'एखाद्या चिरेबंदी वाड्याचा नक्षीदार दरवाजाआजूबाजूंच्या दगडासहित उभा केला असताकोनाड्यात एक पणती शांतपणे तेवणारी ठेवली असतीआहोशांताबाईंचे शब्द 'अक्षयआहेत हे सुचवण्यासाठी .... आणि या करिता खूप खर्चही आला नसताअसोमला या विषयातलं काही कळत नाही.*


मुकुंदरावरंगमंचाचं विभाजन तुम्हीं छान साधलं होतंनिम्मा मंच अभिनयासाठी तर निम्मा 'गायकांसाठी - वाद्यवृंदासाठी'. हा घ्या'नाट्यानुभवअन हा घ्या 'संगीतानुभव'. वाद्य वृंद तयार होता - सिंथसायझर एकदम भारीपण गायिकाएकीचा सूर अतिशय उत्तमलागला होता तर दुसरीला सुरांनी दर्शनच दिलं नाहीहोतं असं कधी कधीतयारी कमी पडली की काय?! पुरुष गायक मात्र खणखणीतअसोपुढच्या प्रयोगाआधी या दोन तीन बाबींकडे लक्ष द्यामुकुंदराव तुम्हीं प्रयोग एका उंचीवर नेऊन ठेवला आहे .... पण त्या पेक्षाअधिक उंचीवर तो जाऊ शकतो


दिग्दर्शकाचे महत्त्व संहिताकाराच्या बरोबरीने आहेमुकुंदराव ह्या तुमच्या माध्यमात मला तुमचे 'इंटरप्रिटेशनहवंयसंगीताचा नेमकाउपयोग केलाय यात शंका नाहीपण .... जमलं तर ... 'असेन मीनसेन मी ...' या कवितेची भूमिका 'रसिकांवरबिंबवाती 'तुम्हींअधांतरी सोडली होआहोया रोजच्या धावपळीत ... कविता कोण वाचतंय?


असोमोठ्या बाईंचासंगीतासह जीवन प्रवास मस्त घडवला - वंदना ताई आणि मुकुंदबुवा यांनीसर्व नाट्यकर्मींना खूप शुभेच्छा पुढीलप्रयोगांसाठीमाझं काही चुकलं आहे असं वाटलं तर ... माफी असावी


या निम्मिताने कविता कॉपी पेस्ट करत आहेमीही प्रथमच वाचत आहे


*असेन मीनसेन मीतरी असेल गीत हे

फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे


हवेत ऊन भोंवतीसुवास धुंद दाटले

तसेच काहिसे मनीं तुला बघून वाटले


तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे

स्वयें मनात जागते सूर-ताल मागते


अबोल राहुनी स्वतअबोध सर्व सांगते

उन्हें जळात हालती तिथे दिसेल गीत हे


कुणास काय ठाउके कसेकुठेउद्या असू?

निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू


तुझ्या मनींच राहिले तुला कळेल गीत हे*




 

0/Post a Comment/Comments