फुगेवाला नंबर २


 फुगेवाला नंबर  


आज सकाळी रियाझाला सुरवात केली आणि सायकल गिरणारे व्हाया सोमेश्वर कडे वळवलीकाही केल्या रात्रीचा सावरकर नगरातफुगे विकणारा माझी पाठ सोडत नव्हता


रात्री नऊ वाजता फुगे विकणारा पाहून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत्याचा दिवसभर धंदा नसेल झाला काकी त्याचे कुटुंब मोठेअसेल म्हणून त्याचा दिवस अठरा तासांचा असेलकी त्याला घरी जावेसे नसेल वाटतकी त्याला घरचं नसेल? .... प्रश्नांचा पूर मीथांबवू शकलो नाहीत्याच्या फुग्यांवर स्माईली होत्याबहुदा ग्राहकांनी 'हसऱ्या स्मायल्याघेतल्या असाव्या कारण आता फक्त 'दुःखीस्मायल्याउरल्या होत्या. *निर्मात्याने हसरे आणि दुःखी फुगे समसमान बनवले होते पण दुःख कोणालाच नको* ..... म्हणून 'दुःखी फुगेहवेत उडत होतेचालतांना मी त्याला ओलांडले आणि सहज त्याला हात केलातो केविलवाणा हसला ... चार्ली चॅप्लिन सारखा ... हेचते का 'हसरे दुःख?'. तो बहुदा 'एक तरी फुगा घ्याअसे सुचवत असेल काआणखी एक प्रश्नमी पूर्ण सुखात असल्याने तो रडका फुगाकशाला 'विकतघेऊघरचे म्हणतील 'तू फुगा विकत घेतला लहान मुलासारखा ...' असोमन असेच वाहत चालले होतेमनात विचारअसले की 'पायडलिंगचेदुःख अथवा त्रास कमी होतोबोलता बोलता .....


बोलता बोलता दुसरा फुगेवाला दिसलासकाळी सकाळीबरोबर सोमेश्वरच्या गेट समोरती 'अनादी काळापासूनछोटी छोटी घरं आहेना तेथे तो राहतोमी याला दररोज सहा वाजता दुकान 'लावतांनाबघतोम्हणजे असं की त्याच्याकडे मोटरसायकल आहेत्याचं'चालतंदुकान 'फटफटीवर आहेसगळी खेळणी तो व्यवस्थित लावतो आणि सर्वात शेवटी त्या रंगीबेरंगी फुग्यांचा झुपका उभा - उभारतोमी त्याला या वेळी इथे नेहमी बघतोआणि मी जेंव्हा दुगावचा चढ पास करत असतो तेंव्हा तो मला ओव्हरटेक करतोत्याच्याशी गप्पा माराव्या असं मला यापूर्वी कधीच वाटलं नाहीपण आज ......वाटलं कारण काल रात्रीचा फुगेवाला 'मनावर बसलाहोता


दुगावच्या चढावर मी थांबलोत्याची गाडी नेहमी इथे गणपती मंदिरासमोर थांबतेतो लांबूनच देवाला 'हायकरतो आणि पुढेगिरणाऱ्याकडे जातोआज त्याने देवाला हाय केल्यावर मी त्याला हाय केलंनमस्कार चमत्कार झाल्यावर आमच्या गप्पा रंगल्यातोपस्तिशीचा जवान घाईत नव्हतात्याने विडी शिलगावली यावरून अंदाज आलामग मीही त्याचा DNA तपासू लागलो


गिरणारं गाव ओलांडले की लगेच 'कामगारांचा बाजारलागतोकामगार साधारण सहा वाजेपासून आपला डब्बा घेऊन उभे असतातदोनशे अडीचशे लोकांची ( बायका माणसांची ) गर्दी असतेठेकेदार येतो आणि त्याच्या गरजेनुसार 'कामगारांनाघेऊन जातोबरेचसेकामगार 'कुटुंब कबिल्यासहअसतातलहान मुलंही असतातआई वडील काम करतात तेंव्हा मुलं साइटवर खेळत असावीयाकामगाऱ्यांच्या बाजारात 'खेळणीवालाआपलं चालतं बोलतं दुकान 'फटफटीवर उभं करतो आणि कमावतो स्वतः साठी


सांगत होता 'साहेब हे फुगे मी एकदम स्वस्त विकतोकाही नफा  कमावताआहो साहेबसकाळी सकाळी पोरं बोंबलत असतातफुग्यासाठीआईबापाकडे नही पैसेमग मी ठरवलं - पोरांचं रडणं थांबवायचंदोन पैसे नै मिळाले तरी चालतीलमजुरांचा दिवस नीटसुरु झाला पाहिजेकाम मिळल का नही या काळजीत असतात बिचारेदोन पैसे कमी मिळाले तरी चालंल .. काय वाटतं साहेबतुमास्नी


त्याने टाकलेला 'समाज भानाचाबाउन्सर माझ्या डोक्यावरून गेलामी म्हणालो 'अरे मी तुला दररोज बघतोपण तू इतका ग्रेट असशीलअसं मला वाटलं नव्हतंअरे लोकांचे लै आशीर्वाद घेतो आहे.' 


बिडीचा शेवटचा झुरका घेत तो म्हणाला 'साहेब कुणी आशीर्वाद देवो नहितर  देवोथोडं काहीतरी चांगलं करीत रहावंबरंनिघू का मीआता?' 


तो गेलामला दिग्मूढ करून गेलासकाळी सकाळी 'डिस्टर्ब्करून गेलागणपतीला नकळत नमस्कार केलाअगदी हात जोडूनसायकल उतारावर लावलीवेग वाढत होता सायकलीचाआणि माझ्या विचारांचा. - *थोडं काहीतरी चांगलं करीत रहावं.*


ठरलंफुगेवाला नंबर  कडून - मला गरज असो वा नसो - रात्रीचा एक फुगा घ्यायचाउरलेली रडकी स्मायली घ्यायचीपण फुगेवाला'हसलापाहिजे


*थोडं काहीतरी चांगलं करीत रहावं.*

0/Post a Comment/Comments