स्थलांतर - वेदनादायी


 स्थलांतर 


माणसानं पोटापाण्यासाठी केलेल्या स्थलांतराविषयी मला खूप उत्सुकता असतेमी प्रवास करत असो अथवा नसोरस्त्यावरील वेगळीमाणसं बघितली की मी थबकतो आणि नंतर थांबतो


आधी धुक्यात बसलेल्या वासूदेवाचे छायाचित्र काढलेआवश्यक प्रकाश नसल्याने मन खट्टू झालंमुलाखत देण्याचा त्याचा मूड होतापण मुलाखत घेण्याचा माझा मूड नव्हता


फर्लांगभर सायकल दामटली अन मुड बदललापहाटेचं प्रचंड पडलेलं दव आता विरत चाललं होतं आणि सकाळ पांघरूणातून बाहेरपडली होतीकिंचित थंडी मी म्हणत होतीसिग्नल ओलांडल्याबरोबर दोन म्हातारे विडीचा आस्वाद घेत छातीत गरम हवा भरत होतेआणि मस्तपणे धूर आसमंतात सोडत होतेजगाला पडलेल्या प्रदूषणाच्या प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं नव्हतंते धूर सोडतंच होतेबाबाची दाढी अन ती वलयं पाहिल्यावर माझा मूड बदललाथांबलोहे प्रवासी तर नक्कीच नव्हतेमी कसं ओळखलंसांगतोत्यांच्याकडे इअर बड्स आणि पेन्स दिसलेबहुदा ते विक्रेते असावे


मी समोर(थांबल्याबरोबर ते कावरेबावरे झालेम्हणजे ते नाशिककर नव्हतेदोघांनी मला हात जोडलेअपराधीपणाची भावनाचेहऱ्यावर ठेवून माणूस डोळ्यांनी म्हणतो 'आम्हांला सोडा दादा आता' - असं काहीसं घडलं


मला कीव आलीपरप्रांतातपरदेशातपरग्रहावर माणूस किंचित 'भ्यायलेलाअसतो असा माझा स्वानुभव आहेमी त्यांच्याकडेविडीकाडी मागितलीतर ते लाजले. 'आप भी क्या बाबूआप थोडी बिडी पियेंगे ?' असं म्हणून विडीकाडी खिशात ठेवलीपण यामाझ्या बिडी मागण्याच्या कृतीमुळे आमच्यातील अंतर नाहीसं झालंमग मी मुलाखत घेतलीऐका तर


रोजी रोटी साठी ही माणसं हजार बाराशे किलोमीटर दूर आलीजास्तीत जास्त तीनचारशे रुपये मिळत असतीलकाय खातील अनकिती पाठवतील - राजस्थानातल्या कुटुंबासकुणास ठाऊक


आठवलं - माझा दक्षिण आफ्रिकेतील धनाढ्य बॉस मला एक दिवस सांगत होता - मानकर माझे पणजोबा कच्छ च्या रणातून शिडाच्याबोटीनं नव्वद वर्षांपूर्वी केनियात आलेकच्छ (गुजरातमधील परिस्थिती इतकी वाईट होती की कधीही मरण येऊ शकतेमग माझ्यापंज्याने विचार केलाएवीतेवी मरण तर येणारच आहेमग इथे मारण्यापेक्षा समोरच्या किनाऱ्यावर जाऊन मारूअरबी समुद्र पार केलाकी सोमालियाकेनियाटंझानिया ... अगदी साऊथ आफ्रिका या पैकी कोठेही उतरू आणि जगण्याचा प्रयत्न करूअन ते शिडाच्याहोडीत बसले आणि मुंबासाला उतरले


पोटासाठी केलेले हे स्थलांतर किंवा ते स्थलांतरदोनीही एकच

0/Post a Comment/Comments