नॉट अ गुड मॉर्निंग



 not a good morning?


सकाळी सकाळी बऱ्याचवेळा अनपेक्षितरित्या सुखावणाऱ्या गोष्टी घडतात आणि सकाळ 'आनंदात वाढत जाते', पळापळानेअसं वाटतंकी 'पळइथेच थांबावा.


पण आज दिवसाची सुरवात बेकार झालीआज मी पायी चाललो होतो अन कोपऱ्यावरून वळलोनजर झाडाच्या बुंध्याशी गेलीदोनजुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो कोणीतरी ठेऊन गेलं होतंज्या पद्धतीने ते 'ठेवलेहोते त्यावरून ... ते फेकले नव्हतेआत्तापर्यंत मी देवतांचेफोटो किंवा मुर्त्या अशा 'ठेवूनगेलेल्या पहिल्या .. गुपचूपपण आई वडिलांचे फोटो ....?


मनात दुःख साचू लागलंखिन्नता वाढू लागलीपुढचा दीड तास .... विचार ...अभद्र विचारकोण असेल हे 'नालायक लेकरू'? एकेकाळी याच फोटोच्या साहाय्यानेपितृ पंधरवड्यातपितर जेवले असतील नामग काय नव्या फर्निचरात जुन्या फोटोंना जागा नाहीम्हणून असे फेकून द्यायचेमला माहित आहेछातीवर दगड ठेऊनच हे फोटो नजरेआड केले असतीलदेवांचे फोटो एकवेळ फेकणं सोप्पंआहे .. कारण देव आपल्या कधी संपर्कात नसतातपण आईवडिलांचेआजीआजोबांच्या फार अवघडकारण आपण त्यांचेच अंशअसतो


घरात मृत व्यक्तींचे फोटो लावावेत  लावावेत याबद्दल दुमत असू शकतंमला नाही आवडत फोटो लावलेलेकारण ? ' मनी नाही भावअन आईबाबा मला वडा पाव ' अशी आपली मानसिकतामग कशाकरता 'शो'. आपण त्यांना मनी चिंतावेत्यांचे आभार मानावेत असंमला वाटतंत्यांच्यासाठी आठवणींचा जागर करावास्मरण रंजन - स्वान्तसुखाय ! 


फोटो नको असतील तर त्याची 'विल्हेवाटकशी लावावी या वर नक्की विचार झाला पाहिजेअथवा दहाव्याच्या दिवशीब्राम्हणानेसांगायला पाहिजे - की सर्व फोटो पिंडासहित .... गंगापर्णमस्तु...


अभद्र विचार करतंच घरी पोहचलोउल्काला सांगणार होतो की - 'मी गेल्यावर माझे फोटो अजिबात भिंतीवर लावू नकाआठवणचठेवायची असेल एक छोटा फोटो पर्समध्ये ठेवमला विसरली तर उत्तम.' पण मी गप्प बसलोकशाला तिची सकाळ 'नासवा'. 


तेव्हढ्यात 'चहासमोर आला ... आणि पेपर ...काल रात्री आणि आज उषःकाळी काय घडलं ते बघूआज मकर संक्रांत ... आणखी एकसंक्रमण ...तीळ गुळ द्याअन गोड गोड बोला ...

0/Post a Comment/Comments