स्निग्धमयी दूध (वाला)


 निग्धमयी दूध(वाला


'माझा दूधवालाअसा निबंध मला लहानपणी लिहायला सांगितला असता तर मी लिहिले असते 'माझ्या दुधवाल्याचे नाव शिवा आहेकारण शिवाला - शंकराला दूध फार आवडतेमला शिवा आवडतो कारण तो दुधात कमी पाणी टाकतोमुख्य म्हणजे त्याच्या दुधालाजाड अन भरपूर साय येतेत्यामुळे आमची आई घरीच तूप तयार करतेमला आमचा दूधवाला खूप आवडतो.'


आज मी दूध आणावयास बाहेर पडलो - कुडकुडतशिवाकडे पोहचलो अन लगेच चहाची ऑर्डर दिलीतिशीचा माझा दूधवाला कायमहसत दूध देत असतो म्हणून मला आवडतोदोन वर्षांपूर्वी त्याने दुधाचं टेबल आमच्या कॉलनीत थाटलं तेंव्हा एक बोर्ड लावला होतात्याबोर्डवरील मजकुरामुळे मी त्याचा 'ग्राहकझालोबोर्डवर लिहिलं होतं - 'दूध रु ६० लिटर : आम्हीं उन्हाळ्यात दुधाचे भाव वाढवत नाही.' असोहसणारी माणसं मला आवडतात त्यामुळे आमच्यात 'शिवरंजनीराग फुलू लागलाआमच्या वयात ३० वर्षांचे अंतर असले तरीआमची मैत्री चंद्रकलेप्रमाणे वाढत गेलीशिवा नेहमी 'काहीनाकाही प्रश्नविचारत असतोमी जमेल तेव्हढी उत्तरं देतोमी कधीही त्याला'राम राम शाम शामकरत असतो - सकाळ दुपार संध्याकाळउभ्याउभ्या भरपूर चकाट्या पिटीत असतो


आजही सकाळी सकाळी चकाट्या पिटायच्या उद्देशाने मी त्याला चहा ठेवण्यास सांगीतलाकाल शेअर मार्केट खड्ड्यात गेल्याने आजमला घाई नव्हतीगप्पा सुरु झाल्याथोडंसं व्हिडीओ शूटिंग घेतलंहे बघून इतर ग्राहक 'हसतहोते, 'हासतहोते - माझे वेडे चाळे बघूनत्यांच्या मनातला विचार - 'दुधवाल्याचं कोणी शूटिंग घेतं का?'.  असोजो तो आपापल्या कुवतीप्रमाणे विचार करतो


गप्पा मारतांना असं लक्षात आलं की माझ्या शिवाचं नाव शिवा नसून शिवा त्याच्या मुलाचं नाव आहेदुकानाचं नामकरण 'मुलाच्यानावानं'. सहज चौकशी केली - तर रवींद्र आव्हाड उर्फ दूधवाला म्हणाला - की आमचे आजोबा १९७२ मध्ये सिन्नरवरून नासिकला आलेत्या काळी सिन्नरला मोठा दुष्काळ पडला होताघर नाही अन दार नाही ... अशा अवस्थेत दिवस काढले ... मग त्याने त्यांचा इतिहाससांगितला ... व्हिडीओ बघा मग समजेलरविंद्र रचना विद्यालयाचा विद्यार्थी असल्याने माझी अन त्याची 'नाळजुळली - गप्पातमीसाबणे-पटवर्धन-लिमये बाई यांचा उल्लेख केला तर म्हणाला - सर यांची मी नावं खूप ऐकली आहेशाळांच्या गप्पा झाल्यावर कौटुंबिकगप्पा सुरु झाल्यारवींद्रचे तेंव्हाचे 'दुष्काळ ग्रस्तआजोबा आज 'सधनआहेबोलता बोलता दुधवाल्याने मला त्यांच्या 'प्रॉपर्टीचीयादीदिलीसातबारेफ्लॅट्स अन प्लॉट्स सर्वदूर पसरलॆले होतेतीन पिढ्यांचे कष्ट असे त्याने मोजून दाखवले


अचानक रवींद्र विचारता झाला - बाबाफॉरीनला कामाकरता कसं जायचं असतंमी त्याला सविस्तर सांगितलं तर त्याला आश्चर्यवाटलंमाझ्या विषयीचा आदर अन 'कवतिकमला त्याच्या डोळ्यात प्रश्नासह दिसलंत्याने विचारलं - बाबा तुम्हांला एव्हढं कसं कायमाहित? ..... मग काय .... माझ्या कथावर कथा सादर झाल्याथोडक्यातऐकणारे मिळाले की 'कथेकरीखुश होतातमी त्यालाविचारलं - तू कशाला चांभारचौकश्या करतोतर तो म्हणाला - 'माझी लै ईच्छा हाये फॉरीनला जायची'. मी मनातल्या मनात 'डोक्यालाहात लावलाआणि विषय आटोपता घेतलारवींद्र दुसरा चहा 'घ्याम्हटला आणि मी घेतला - तीस ml - कागदी कपतेव्हढ्यातआठवलं - उल्का चहाविना व्याकुळ झाली असेल. 'चहा कट्ट्यावरूनएक्झिट घेतली


आज मी माझ्या 'त्या जुन्यानिबंधाचा शेवट असा करतो. 'माझा दूधवाला लै गोड आहेतो स्वतः दूध पित नसल्याने मला चहा पाजतोमी त्याला 'गुंतवणुकीचे सल्लेदेतोदररोज बाराशे लिटर दूध विकणाऱ्याला 'परदेशात मजुरीकरायला जाऊ नको असे सांगणारमाझादूधवाला मला खूप आवडतोकारण तो 'स्निग्धमयीआहेदुधावर साय खूप आहे.' 


*जगात इतरत्र सर्वत्र स्नेह सांडलेला आहेतूप सांडलेलं आहे .... ते वाकडी वाट अन बोट करून काढता आलं पाहिजे.*

1/Post a Comment/Comments

Post a Comment