वाढ-दिवस, अनाहताचा !
गेले काही दिवस 'वाढ' दिवसाचे वारे घरात वाहत आहे. कधी जोरात - मला काय हवे आहे हे सांगत? तर कधी - आजीच्या कानात'कुजबुजत'! माझ्याकडे कोणतीही डिमांड नसते. अनाहताला स्वतःला काय पाहिजे हे माहित आहे पण ते कसे मिळवायचे याचे प्लॅनआहे, स्टॅटेजी आहे. अगदी लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म.
तिला सायकल घ्यायची आहे. म्हणून त्यासाठी बचत चालू आहे. आज जेंव्हा कॅश मोजली तेंव्हा सायकल किंमतीत आणि बचत मध्येदोन हजार रुपयांचा फरक आहे. मग मी आज कमिटमेंट केली की सायकल घेतांना जी काही रक्कम कमी पडेल ती 'बाबा' देणार. अशीगिफ्ट मिळाल्याने मॅडम खुश. हे झालं लॉन्ग टर्म प्लँनिंग. पण प्लॅन बी म्हणून अनाहता घरातील काही मेम्बर्सला सांगत आहे - मला कॅशगिफ्ट द्या. अगदी जवळचे - म्हणजे तिचे दुसरे बाबा, आजी आणि मोठी आज्जी (माझी आई). आहे की नाही गंमत? कोणी म्हणत असेलकी लहान मुलांना कळत नाही, तर ते चुकीचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. हल्लीची डिजिटल मुलं खूप हायपर आहे. नाहीतरआम्हीं? पूर्वीचे आमचे (१९६० जन्मलेली बॅच) वाढदिवस म्हणजे - श्रीखंड पुरी, घरी केलेला केक - केकपात्रात विदाउट आयसिन्ग अनओवाळणे - नो गिफ्ट ....
आता आजीच्या बरोबर गेल्या महिन्यांपासून चाललेल्या 'गुजगोष्टी' बद्दल. याविषयी कालपर्यंत कोणालाही माहित नव्हते. तिचं आणिआजीचं गुपित काल संध्याकाळी उफाळून बाहेर आलं जेंव्हा 'आर्थिक' विवंचना भेडसावू लागली. चिमणीला 'होम - टेन्ट होम' हवं आहे. मग रात्री धावपळ - या दुकानातून त्या दुकानात - या मुळे माझी किंचित चिडचिड. असो. एकदाचा आयटम सापडला. पण अनाहतानेअप्रूव्ह केल्याशिवाय वस्तू घ्यायची नाही असा माझा अट्टाहास! कारण वस्तू खरेदी करतांना सुद्धा जो आनंद असतो तो मला टीपायचाहोता. (दुसरं कारण - आपण आटापिटा करून आणलेली गिफ्ट दुसऱ्याला आवडली नाही तर - अमाप दुःख होतं, पैसे वाया गेल्याचं अनअसमाधान !) मग आज सकाळी सकाळी आम्हीं तिघंही दुकानात. गिफ्ट सिलेक्ट झाली आणि आनंद टिपला मी ... आजीनं अनाहताच्याहाऊसची हौस पुरवली. नकळत आजीची पण हौस फिटली. कधीकधी आपण 'नातवंडात' आपलीही हौस भागवून घेत असतो. उदाहरणार्थ माझी कॅडबरी खाण्याची लहानपणीची इच्छा! नातवंड जेंव्हा कॅडबरी आणतात तेंव्हा त्यांना 'माझा वाटा' बाजूला ठेवावाचलागतो. शेअरिंग इज केअरिंग.
गाडीत बसल्याबरोबर अनाहताने मला विचारलं की - बाबा तुम्हीं काय गिफ्ट देणार आज? मी प्रतिप्रश्न केला - तुला काय हवं आहे? तरउत्तर आलं - ओरिओ कॅडबरी चॉकलेट! मी तत्काळ 'हो' म्हणालो. दीडशे रुपयात दोन - एक अनाहता आणि दुसरं त्वमेव. खरं तर मी दोनहजार 'नगद' देणार होतो ... पण माझी गिफ्ट 'थोडक्यात' आटपली. मनात विचार येऊन गेला - ताटात काय अन वाटीत काय. माझ्याखिशात काय अन त्यांच्या खिशात काय? सारखंच! खरंच 'सारखं' असतं का? .... उत्तर आलं - 'नाही'. थोडं थोडं देत रहावं. नाहीतर'आपला विजयपत सिंघानिया व्हायचा!'
घरी येतांना विचार आला - आम्हीं दोघंही भाग्यवान, कारण नातवंडांचे लाड प्रत्यक्ष पुरवतो. आमचा आनंद 'झूम' वर अवलंबून नाही - कॉल झाला की संपला. आमची 'मज्जा' आहे - अव्याहत.
घरी आलो. अनाहताच्या आवडीचे - छोले भटुरे - तिनेच नैवेद्य दाखवला. टेन्ट उभारला. आजीने 'उदघाटन' केले. बघा तर.
।। इति स्कंद पुराणे रेवाखंडे प्रथम सत्र कथा समाप्त ।।
वाह, मला ही या वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाल्या सारखे वाटले. 👌👌👍🏻👍🏻👏🏻👏🏻💐💐
ReplyDeletePost a Comment