नव्याचे ९ दिवस , आजचा तिसरा


 नव्याचे नऊ दिवसआजचा तिसरा दिवस ? 


आज मी सकाळी सकाळी पेपर वाचन  करताताम्हणजे ताजा कलम लिहायला घेतलाही एक PS म्हणजे Post Script आहेपरवाच्या 'वाढ-दिवसब्लॉग साठीअनाहताचा आनंद चित्रबद्ध केल्यावर त्यावर 'काहीतरीलिहिलंच पाहिजे असं वाटू लागलं


कालचा संपूर्ण दिवस अनाहताने 'टेंन्टमध्ये घालवलासात आठ मैत्रिणी गोळा केल्या अन नवीन तंबूत घर केलंखाली गालिचा होतात्या मुळे 'मऊ मऊमज्जा येत असावीअसो


आज सकाळी 'टेंटानंदम्हणजे टेंन्ट आनंद वहातंच होतासध्या ऑनलाईन क्लास असल्याने अनाहता टेबल खुर्ची  वापरता 'तंबूतशिरलीलॅपटॉप सहनवीन अरेंजमेंटचे चटके लगेच बसू लागलेपहिला चटका - ढुंगाणाखालची जमीन खूपच थंड होतीदुसरा चटका - एलईडी लाइट असले तरी लॅपटॉप कसा चार्ज करायचा हा प्रश्नमग अनाहताने 'चंबूगबाळंआवरलं अन ती गादीवर शिफ्ट झालीइथेमात्र आनंदी आनंद होता - गादी मऊ मऊक्लास सुरु झालामनात आनंद असला की अध्ययन चांगलं होतं असं मी बघत होतो


नव्याचे नऊ दिवसनवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही - असा माझा अनुभव आहेमाणूस इथून तिथून सारखाचबघा नाआपल्याकडे म्हणतात ‘नव्याची नवलाई नऊ दिवस’ - ‘नाइन डेज् वंडर्’. लहान थोरांची मनोवृत्ती सर्वसाधारण सारखीचमीही एखादीनवी वस्तू घेतली की 'सुख ओरबाडत असतो'. त्वमेवाला नवीन शर्ट आणला की तो तीन दिवस एकच शर्ट वापरतोमग सांगावं लागतं - अरे धुवायला टाक आता तो ... वास येऊ लागला . 


नव्याची नवलाई चार दिवस टिकते म्हणतातते 'नवं' 'जुनंहोतं .. मला तर 'जुनीवस्तू सुद्धा खूप आवडतेबघू टेंट कधी 'जुनाहोतोआहे


एक प्रश्न - माणसाला सुखाचा सुद्धा लगेच कंटाळा येतो काकाहीतरी नवीन हवं असतं ! कायमम्हणून तर जग चाललंय ! 

1/Post a Comment/Comments

  1. Ajoba rangale ani dangale!!!
    Nice one!!! Good observation

    ReplyDelete

Post a Comment