शंकऱ्या


 शंकऱ्या ..


*२०२२*

अनाहताला शिकवणीला जातांना आणि येतांना दररोज एक डोंगर पारक्रॉस करावा लागतोती दररोज त्या डोंगरावर रेंगाळतेअगदीदोन मिनिटांसाठीआणि मग पुढेआमच्या बरोबर समोर तीन बंगल्यांचं काम चालू आहेत्यामुळं तीन वॉचमनचा कबिला घरासमोरआहेत्यांची ऍव्हरेज . मुलं धरली तर कायम  मुलं दगड विटा अन वाळू यात खेळत असतातदीड मुलं तीन आयांच्या पोटात आहेअनाहताला आणि तिच्या दोन मैत्रिणींना येता जाता खोपा तयार करतातत्यावेळी त्यांना कसलंच भान राहत नाहीअनाहताने सुरवातकेली की 'वॉचमनची मुलंगोळा होतात अन ती काय करते हे बघतातमग मी 'चल आताबसं झालंअशी घाई केली की अनाहता'नाइलाजास्तवडोंगरावरून उतरतेतिचा 'त्या - शेंबड्याकळकट मळकट मुलांबरोबरचाबाय बाय बघण्यासारखा असतोत्यामुलांमध्ये 'सम्राटहा लक्षवेधी आहेबाजा वाजवत असतो नेहमीमी फोटो काढला की 'मला फोटो दाखवअसं म्हणतोसम्राट हा 'त्यामुलांचा म्होरक्या आहे तर अनाहता 'यामुलींची म्होरकीमनात नेहमी विचार येतो की 'एव्हढी मोठी विषमताअसूनही मुले मात्र 'समानताया तत्वावर खेळत असतात कीती ती 'निरागसता'?!


मी सहज या मैत्रीवर नाराजी व्यक्त केली तर अनाहता म्हणाली 'बाबा आम्हीं त्यांना हात नाही लावत'. मी विषय लांबवला नाही कारण'हा असा खेळचालूच राहणार कारण तो पूर्वीपासून चालू आहेअगदी 'अनादी काळापासून' - आठवा सुदामा ...


*१९६८-७०*

आमच्या राका कॉलनीत एक म्हातारी राहायची - बुटकीअस्ताव्यस्त अन थुलथुलीत होतीपूर्वी कॉलनी घनदाट जंगलात होतीकॉलनीसंपली की जंगलात एक दर्गा होतात्या दर्ग्याशेजारी एक प्रचंड मोठं बेलाचं झाड होतंत्या झाडाखाली शंकराची एक पिंड होतीनंदीसहम्हातारीची झोपडी झाडाखाली होतीम्हातारी दररोज शंकराची पूजा करायची अन कॉलनीत 'चक्करमारायची - शिळंपाकंगोळा करायलाशंकऱ्या सुद्धा तिच्याबरोबर असायचाशंकऱ्या माझ्याचं वयाचा होता - आठ दहा वर्षांचा


शंकऱ्याची अन माझी दोस्ती जानी होतीशनिवार रविवार आम्हीं मासे पकडत असूराका कॉलनी आणि टिळकवाडीच्या मध्ये एक नालावाहत असेबाराही महिने पाणी असेत्या नाल्यात आम्हीं दोघं आईचं जुनं 'पातळघेऊन जायचो अन डोकमासे पकडायचोमग त्यांनाकाचेच्या बरणीत ठेवायचंमासे दोन तीन दिवस जगायचेत्यामुळे आमचा 'मासेमारीहा उद्योग अव्याहत चालू असायचाएकदा तरसापाचं पिल्लू आलं होतं पातळामधेशंकऱ्याने त्याची शेपटी पकडलीशंकर सरडे मारण्यात तरबेज होताएक दगडात साबरीवरचासरडा खाली पडलाच पाहिजेत्याच्या बरोबर मी कॉलनीतील जंगल तुडवायचो


घरच्यांना माझी शंकऱ्याबरोबरची मैत्री अजिबात आवडत नव्हतीआजीची बोलणी तर दररोज - अगदी रतीबएकदा तर मी झाडावरून'धडपडलोहोतो आणि केवळ शंकऱ्या बरोबर होता म्हणून 'बापाचामार खाल्लेला आठवतोएवढं सगळं असूनही माझ्या अनशंकऱ्याच्या मैत्रीत खंड पडला नाही


आज अनाहताने 'सम्राटला जेंव्हा बाय केलं तेंव्हा मला माझा शंकऱ्या आठवलापन्नास वर्षांच्या आठवणी 'जाग्याझाल्याआर्थिक अनसामाजिक परिस्थिती विषम असूनही ती आमच्या मैत्रीत आड नाही आलीआजही तेच अनुभवत होतो


गंमत म्हणजेमागच्या महिन्यात शंकर अचानक भेटला - कॉलनीतच

मी - काय करतो?

शंकऱ्या - वॉचमन आहे - पंडित कॉलनीत.

मी - म्हातारी ?

शंकऱ्या - आई कधीच मेलीतुझी आई आली होती मौतीला.

मी - राहतो कुठे?

शंकऱ्या - दर्ग्यासमोरील झोपडपट्टीतभेटू परतड्युटीची वेळ झाली


पाठमोरा शंकर - बुटकाथुलथुलीत अन .... साठी ओलांडलेला शंकऱ्या अन मीविषमता असली तरी .... 'मानकर सदनमधून माझीआई बाहेर आली ... विचारलं 'तू शंकरला ओळखलं?'. मी आईला म्हणालो 'अगं आईबहुदा शंकरने माझ्यावर त्या काळी संस्कार केलेअसावे म्हणून तर मी आफ्रिकेतील जंगलं पायाने तुडवू शकलोअन्यथा मी भित्रा राहिलो असतो.' 


सूक्ष्म संस्कारअनाहतावर सुद्धा होत असतील का काही सूक्ष्म संस्कार आजोबांचा प्रश्न.  

0/Post a Comment/Comments