हळद


 हळद 


'मान्यातू सप्तरंगी माणूसआज हात पिवळे कसेतेही साठीत?' - माझा मित्र म्हणालात्याचा 'बोहचकपणामाझ्या लक्षात येऊनही मीत्याला 'नीटउत्तर दिलेपिवळ्या रंगाविषयीचे कथाकथन हे असे - अरे काय झालं .... म्हणून सुरवात ...


चार महिन्यांपूर्वी काही फुलांची रोपं घेण्यासाठी मी माझ्या जीवनकाकूंकडे गेलो होतोरोपं देतांना त्या म्हणाल्या 'अनिल या दोन काड्याघेऊन जा - हळदीच्या आहे'. मला हळदीत इंटरेस्ट नव्हतातरीही  बोलता घेतल्या अन घरी कुंडीत लावून टाकल्याकाड्या दररोजवाळत चालल्या होत्या ... पिवळ्या पडत चालल्या होत्याया अशक्ताकडे मी लक्ष दिले नाही पण इतरांबरोबर त्याला पाणी मात्र मिळतहोतेइतर रोपांनी 'जीवधरला होता आणि मला 'फुलरूपीआनंद देत मिळत होता


आज हळदिची काडी पूर्ण सुकली असल्याने मी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर ... माती पूर्ण हालली ... मी अजून जोर लावला तरकाडीबरोबर हळदीचं बुटुक बाहेर आलेमग आणखीन 'उकरंलतर ओल्या हळदीचा खजिना सापडलाआम्हां उभयतांना 'मोठा आनंदजाहला'. मी हळद स्वच्छ केली आणि मालमत्ता पुढील सोपस्कारासाठी उल्काकडे सुपूर्त करतांना म्हणालो - 'मस्त लोणचं कर'. त्यावरतिने बॉम्ब स्फोट केला - 'म्हणाली 'मला वेळ नाहीकाय करायचं ते करा'.  मीही पेटलो होतो - म्हटलं 'चॅलेंजमंजूरमी करतो लोणचं'.  


आनंदाच्या भरात खूप कष्ट केलेसर्वप्रथम हळदीची सालं काढलीकंबर खूप दुखलेपण ... हू कि चू नाहीनंतर 'मन-मान-पाठएकत्रकरून हळद 'किसली'. खूप त्रास होत होताझक मारली अन झुणका खाल्ला या म्हणीचा अर्थ उमगत होता. 'सहन होत नाही अनसांगताही येत नाहीह्या अवस्थेचा अनुभव घेत होतोउल्काला सांगितलं असतं अन प्रयोग मधेच सोडला असता तर ती कदाचित किंचितआनंदी झाली असतीमाझा 'अहंममोठ्या प्रमाणावर दुखावला असता. 'किसा-किशीझाल्यावर एक लक्षात आलं कि 'उल्काचा किसघेतल्या शिवाय काही खरं नाहीलोणचं कसं 'घालायचंहे मला माहित नाहीमी म्हणालो 'उल्के समोर उभी रहा आणि लोणच्याचीरेसिपी सांगमी शूटिंग करतो'.  व्हिडीओ घेतल्यावर कळालं की लोणचं कसं घालतातआता शेवटच्या क्षणी माघार  घेता 'लोणचंघातलं'.  तुमच्यासाठी 'लोणच्याचीकथा पाठवत आहेगोड करून घ्यामी विजयी झालोविजयात 'उन्मादअसतो कातर 'असतो'. एक वेगळा आनंद मी अनुभवत होतोआता हा आनंद बाटलीत भरला अन 'मुरवतठेवला


'प्रवीणबासष्ठाव्या वर्षी तुम्हीं लोणचं घालणार आहातअसं कोणी ज्योतिष्याने सांगितलं असते तर मी त्याला उडवून लावले असतेपण आज ही परिस्थिती आहेआजही मी माझे आयुष्य 'सप्तरंगीकरतो आहे. 'जमत कसं नाहीमलाही हे जमलंच पाहिजेहा हेकाधरून पुढे काहीतरी केलंच पाहिजे - म्हणून आज लोणचं केलंउद्या काय करीन याचा भरवसा नाही


पिवळा रंग आणि तुम्ही : लक्ष्मीचा प्रिय असतो पिवळा रंगअसे मानले जाते की बुद्धीच्या विकासाचा प्रतीक पिवळा रंग अभ्यासकॉन्सनट्रेशन आणि मानसिक स्थिरतेसाठी फारच उत्तम आहेतर आता तुम्हीं जाणून घेतलंय की .... तुम्हीं कधी घालताय लोणचं


2/Post a Comment/Comments

  1. छोट्या छोट्या गोष्टींचा मस्त आनंद लुटता सर

    ReplyDelete
  2. जगणं रंगतदार करणारे रंग आपल्या आसपासच असतात याचं सुंदर उदाहरण. तुम्ही हळद रुजवलीत हे महत्वाचं. सुरेख.

    ReplyDelete

Post a Comment