Bullet, Bulleting?!


 Bullet-Bulletin-Bulleting!


आजची सकाळ लै भारी गेलीसायकल म्हणून सायकलिंगबुलेट म्हणून बुलेटिंगआज बुलेटिंग केलंम्हंजेसांगतो


पंधरा दिवसांपूर्वी मुकुंद भेटलानवा मित्रसायकलवालामहिरवाणीलापाहिल्याचं भेटीत म्हणे - इथे जवळचब्रह्मगिरीच्या उदरात खूपमोर आहेतमाझा लगेच प्रश्न - कधी जायचं ? तत्काळ उत्तर - कधीही


काल मुकुंदाला रात्री दहा वाजता विचारलं - कधीतर उत्तर आलं - उद्या


आज मी -३० वाजता आई टी आई सिग्नलला वाट बघत होतोथंडी मी म्हणत होतीमुकुंदाने अजून दोन मित्र आणले - नाना अनसुदीपदोन बुलेट वर आम्ही चारजणं थंडी झेलीत महिरवाणीला पोहचलोनव्या मित्रांबरोबर नव्या गप्पा सुरु झाल्याप्रत्येकी दोन चहाअन एक डोनट खाण्यात अर्धा तास गेलागप्पांचा भडीमार झालामग मला आठवण झाली कि आपण आज मोर बघायला आलोआहोतबुलेट सुरु झाल्यातळेगावाकडे ऑफ रोडींग ... मग सकाळी सकाळी ऊन खात कट्ट्यावर बसलेल्या ग्रामस्तांना विचारलं - मोरकुठेत्यावर एकाने गंभीरपणे विनोद केला - म्हणाला 'जंगलात !'. दुसरा म्हणाला 'थोडं म्होरं जावालगेच दिसतील'.  म्होरं गेल्यावरविचारलं तर तिसरा म्हणे 'तलाव कोरडे झाल्याने मोर नाही'. 


तोपर्यंत आम्हीं जंगलाच्या कुशीत शिरलेले होतोबुलेटी पार्क केल्यामोरांच्या शोधात खूप जंगलात पायी चाललोगप्पांचा पाऊस पडतहोतामधून मधून नाना आणि मुकुंद मोरांना साद घालत होतेजेंव्हा गप्पा चालू होत्या - म्हणजे प्रत्येक जण 'त्यांच्या त्यांच्या गोष्टीसांगत होतातेंव्हा मला नव्या मित्रांची 'लांबी रुंदी आणि खोलीकळत होतीप्रत्येक जण समृद्ध होताआणि हीच समृद्धी मला आनंद देतहोतीमोर दिसले नाही. 'गेले खड्यात'. पण नवे मित्र नवी अनुभूती 'देऊनगेलेअजून मी माझ्या गोष्टी बाहेर नाही काढल्यापुढची ट्रिप - वैतरणा बॅक वॉटर - पक्षी दिसले नाही तरी चालेल पण आवाज ऐकता आला पाहिजेनाहीतर 'आहेच आमच्या चौघांची वटवटतेथल्याशांततेत.' नंतर डब्बे खायचे .. तेथेचघाई करायची नाही .. परतायचीमोक्कार फिरायचं ...


सहाला बाहेर पडलेला मी ... दहाला घरी आलोबघतो तर शेजारच्या दुकानात गर्दी ?! काय झालं ? - गर्दीतून आवाज आला - चोरी ! कधी ? सव्वासहा वाजताम्हंजे मी गेल्यावर


मग घटनास्तळी टाइम पासबायकोही आलीआयुष्य म्हंजे टाइम पासमजा आहे

0/Post a Comment/Comments