आनंदाचा डोह - अ-मृतमयी


 आनंदाचे डोही ...-मृत!


आज जागतिक आनंद दिन आहेहा दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे आनंदी जीवन आणि आरोग्यसंपन्न राहण्याची प्रेरणामिळावीती मला एका आनंदकडून मिळालीहा दुग्धशर्करा योग डॉआनंद नाडकर्णी यांच्या ' आनंदाचे डोही - मन आरोग्यावर मुक्तसंवादकार्यक्रमामुळे झाला


मानसिक दृष्टीनं आनंदी राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहेआणि ते कसे राहता येईल याचा दोन तास उहापोह झालाप्रसूती तज्ज्ञडॉ चंद्रकांत संकलेचा आणि सुप्रसिद्ध गायिका सौ मंजिरी असणारे यांनी डॉक्टरांना 'बोलतंकेलं आणि मग आनंद यांनी 'आनंदाचाधबधबा साकार केला. 'आनंदम्हणजे नक्की कायवेदांना काय अभिप्रेत आहेगौतम बुद्धाचा दृष्टिकोन काय होता? ... बापरे .... काय'बापमाणूस आहे 'हा आनंद' .... किती ते चिंतन ... मनन आणि अप्रतिम 'समजावून सांगण्याची हातोटी'. सभागृह मंत्रमुग्ध झालं होतं तरी....


कार्यक्रमाचा समारोप खालील काव्यावरील - सहा ओळीवर - निरूपणाने झालायात मानसशास्त्र कुठे डोकावत आहे ते पहाऐका


*मोगरा फुललामोगरा फुलला

फुलें वेचिता बहरू कळियांसी आला

इवलेसे रोप लावियले द्वारी

तयाचा वेलु गेला गगनावेरी

मनाचिये गुंती गुंफियला शेला

बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला*


कितीही चांगलं ऐकलं तरी नव्वद टक्के गोष्टी माणूस विसरून जातोम्हणून मी 'मन मैत्रीच्या देशातहे डॉ आनंद नाडकर्णी यांचं 'ताजंपुस्तक विकत घेतलं - मी आनंदी आहे की नाही हे तपासून बघण्यास

0/Post a Comment/Comments