दुःखातील पहिला धडा - सोनिग्राफी



 *दुःखातील पहिला धडा - सोनोग्राफी ?!*


माझ्या मनात नेहमी, निरंतर, एक विचार घोळत असतो तो म्हणजे - माझ्या आयुष्यातील दुःखं हे माझ्याच घरात वळचणीला बसलेलं आहे. कधी ते 'धपकन' खाली पडतं तर कधी ते 'हळू हळू' खाली येतं अन माझं विश्व व्यापतं. जेंव्हा ते अचानक येतं तेंव्हा मी चटकन सावरतो अन पुढच्या 'दुःखं निवारण' या कार्यक्रमात गुंततो. पण या वेळी ते हळू हळू आलं, आम्हांला, कुटुंबाला कुरतडू लागलं, आणि वर्षा दोन वर्षात त्याने मानसिक आणि शाररीक हानी पोहचवली. 


बायकोचं आजारपण 'शिगेला' पोहचलं कारण 'निदान'च झालं नाही लवकर. जेंव्हा झालं तेंव्हा उशीर झाला होता. या दुःखद प्रवासात आम्हीं काही धडे शिकलो, त्यातला पाहिला धडा - सोनोग्राफी. 


दहा बारा वर्षांपूर्वी उल्काचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं. त्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं 'दर सहा महिन्यांनी सोनोग्राफी करा आणि मला रिपोर्ट द्या'. उल्काने अत्यंत मनोभावे गेली दहा वर्षे सोनोग्राफी केली - चारशे रुपयांपासून ते बाराशे रुपया पर्यंत. जसा खानदानी शिंपी असतो, खानदानी सोनार असतो अगदी त्या प्रमाणे आमचा खानदानी 'सोनोग्राफर' झाला 'तो' डॉक्टर. आपण त्या डॉक्टरांचे नाव 'जुना' डॉक्टर असे ठेऊ. डॉ जुना अत्यंत प्रतिथयश आहेत आणि साधारण तीस पस्तीस वर्षांपासून 'पोटाची फोटोग्राफी' करत आहे. स्वभाव चांगला आहे. गोड बोलतात. सोनिग्राफी करतांना 'उल्काने कोठे कोठे ट्रेकिंग केलं, नवीन प्रवास कुठे' अशा गप्पा. मग पाच मिनिटांनी चार ओळींचा रिपोर्ट तयार होत असे - stating 'everything is normal’. पण गेल्या दोन वर्षांपासून म्हणू लागले 'मला थोडेसे पाणी साचल्यासारखे क्लॉट दिसताहेत. काही दुखत आहे का?'. उल्का काहीच दुखत नसल्याने 'नाही' म्हणायची - मग डॉ जुना तोच 'जुना' रिपोर्ट द्यायचे - 'everything is normal'. या रिपोर्टवर आम्हीं खुश, 'जुना' खुश आणि युरॉलॉजिस्ट खुश. कारण प्रॉब्लेम नाहीच काही. आनंदी आनंद गडे. उल्का तर सोनिग्राफी झाली की आनंदी असायची कारण ते 'किडनी स्टोन' चा प्रॉब्लेम नाही. 


पण तीन महिन्यांपूर्वी घात झाला. Ulka suffered from Urine infection following blood clotting and its discharge. युरॉलॉजिस्टने सांगितलं 'सोनोग्राफी' करा. साकेतला कळलं की 'आईची सोनोग्राफी करायची'. ताबडतोब मला फोन -' बाबा डॉ जुना यांच्याकडे जायचं नाही. फालतू डॉक्टर आहे तो. डॉ नव्या कडे जा. मी अँपॉईंटमेंट घेतली आहे'. मी हल्ली साकेतचं ऐकतो - वय झालंय माझं म्हणून. किंवा त्याचं नॉलेज अपटुडेट आहे म्हणून. नवा डॉक्टर माझ्या घरापासून जवळ आहे आणि पार्किग आहे तेथे. 

डॉ नव्याने उल्काच्या 'व्याधीची' सखोल विचारणा केली, इतिहास मांडला अन गंभीर झाला. पंधरा मिनिटे सोनोग्राफी चालली. नवे डॉक्टर म्हणाले ' मानकर मॅडम तुमच्या पोटात, गर्भाशयाच्या बाजूला सिस्ट डेव्हलप झालंय. साईझ मोठी आहे. ब्लॅडरला धोका आहे. लगेच ..........' डॉ नव्याने दोन पाने 'रिपोर्ट' दिला - आकार आणि व्याप्ती नमूद केली. हे सगळं सांगण्याचे फक्त हजार रुपये. चिकूच्या आकाराइतका सिस्ट मोठा होता पण बिच्याऱ्याने गेली पाच वर्षे हूं की चू नाही केलं. 


युरॉलॉजिस्ट कडे गेलो. 'संकट किती गंभीर आहे ' हे त्यांनी आम्हांला समजावून सांगितलं. म्हणाले - 'आता आपण प्रथम युरीन इन्फेक्शन थांबवू आणि मग सिस्ट काढण्याविषयी विचार करू'. शेवटी त्यांनी एक 'विचार प्रवर्तक' प्रश्न मांडला - *गेल्या तीन चार वर्षांच्या सोनोग्राफीत आपाल्याला 'चिकू' का दिसला नाही?*


आमच्या (मी, उल्का आणि साकेत) विचार मंथनातून आलेले काही निष्कर्ष असे - 


~ डॉ जुना यांचं ज्ञान आणि मशीनरी जुनी झाली होती. जुनी मशीन पैसे छापू शकते, मग नवी कशाला घ्या - असा विचार. कारण 'धंदा जोरात' चालला की 'व्यापारी' आंधळा होतो. 

~ डॉ जुना यांचा 'अप्रोच' अतिशय कॅज्युअल वाटला. प्रत्येक वेळी 'चार ओळींचा रिपोर्ट'? काहीही रिपोर्ट दिला तरी 'गिऱ्हाईक' येतंय ना !

~ डॉ नवा तरुण आहे. नवी मशीनरी, नवं चैतन्य आहे. अजून शिकत आहे म्हणून complacency factor शून्य आहे. (Complacency is an attitude that we develop when we enjoy prolonged comfort).  

*यातून आम्हीं काय शिकलो. सोनोग्राफीच्या रिपोर्ट वरून लाईन ऑफ ऍक्शन ठरते. म्हणून 'अद्ययावत' डॉक्टर शोधा. त्याच्याकडे स्टेट ऑफ आर्ट मशीनरी आहे का याचा अंदाज घ्या. 

Inadequate / insufficient sonography reports are sure shot recipe for ….. mess. मी जर डॉक्टर बदलला असता तर ...... येथे 'जर-तर' ला काही किंमत नाही. रुग्ण आणि कुटुंब 'हळू हळू' कुरतडत जात असते.*

म्हणून म्हटलं 'सांगाव्या चार गोष्टी'. पहिला धडा संपला. भय इथले संपत नाही ...

*दुःखातील दुसरा धडा - नासिक की मुंबई ?!*

0/Post a Comment/Comments