बाग

अंगणातील बाग - एक सेतू!


हल्ली माझा बायकोबरोबर सकाळी 'सु(खं)संवादया वाक्याने सुरु होतो 'उल्के आज 'बेगम बहर'ला सहा फुलं आली आहेकिंवा 'तीनअंजीर दिसत आहेकाढू का? - दीड दीड खाऊ'. आम्हीं आयुष्यात एकमेकांना 'कचकडीगुड मॉर्निंग केलं नाहीदिवस कसा मस्त सुरुझाला पाहिजेमग वाद विवाद आहेतच दिवसभरआमच्या अंगणातल्या बागेच्या न्यूज ऐकल्या की उल्का उठणारचहा करणार (तीतिचाआणि मग आमच्या वीस फूट बाय वीस फूट बागेत चहाचा कप हातात घेऊन 'चक्करमारणारफुलांची खानेसुमारी करत करत'आज पाणी घालावं लागेलअसं मला सुतोउवाच करणारआणि इथेच आमची गुड मॉर्निंग संपणारपाणी मी घालतो मग मी ठरवणार - कधी तेमाझा मुड कसा आहे यावरून मी 'बघूअसं उत्तर देतोमला जेंव्हा अंजिर काढायचे असतात तेंव्हा ती म्हणते 'आज नको उद्या' - मग संवाद आणि विवादअसो


पण अंगणातील 'बागहा एक जबरदस्त सेतू आहे - नवरा बायकोला जवळ आणण्याचा - मानसिक दृष्टामला हल्ली बागेविषयी 'ओढनिर्माण झाली आहे. 'सहजीवनात प्रेमआहेआमची 'बागहे आमचं साठीतलं अपत्य आहेकर्म धर्म संयोगाने 'बागनावाचं मूल कसंवाढवायचं यावर आमच्यात दोन मते नाही


पाहिलं एकमत म्हणजे 'उठायचंनर्सरीत जायचं अन 'वाढलेलीमुलं दत्तक घेऊन यायचंहे आम्हांला दोघांनाही आवडत नाहीज्यामुलाच्या 'वाढीमध्येतुमची इन्व्हॉलमेंट नाहीगुंतवणूक नाहीत्यात 'प्रेमनाहीबी टाकणे अथवा काडी खोचणे ही क्रिया 'अदभूतआहेजमीन आणि बी / काडी यांच्या संभोगाला तुम्हीं कारणीभूत आहात हा विचार सर्जनशीलतेचा भाग आहेपाहिलं पानपाहिलं फुलम्हणजे वंश वृद्धीनिसर्ग कीती अफाट आहे हे 'एक रोप अथवा बी ' लावली तरी समजतंरोपं मोठी होतात तेंव्हा 'मुलंमोठी होतात त्याचंसमाधान देऊन जातातएकदा प्रेम सापडलं की 'अजून पाहिजेही सहज प्रवृत्ती जागी होते आणि मग छोटी बाग मोठी होऊ लागते. 'चित्तीअसुद्यावे समाधानहे बुवांचे विचार मागे पडतातबोलता बोलतालावता लावता आम्ही साठ कुंड्याचा संसार मांडला


आमच्याकडील प्रत्येक रोपास 'नावआहेगाव आहेफुलांचं नाव काहीही असो आम्हीं त्यांना संभोततांना ते कुणाकडून आणलाय याचाउच्चार करतोउदात्या वहिनींच्या रोपाला आज फुलं आलीजीवनकाकींनी दिलेलं अंजिराचं रोप थोडं सुकलंसंजीवनीकडून आणलेलंरोप आज जमिनीत लावायला हवंशेखर म्हणाला घेऊन जा अन आपण आणलं - चांगलं रुजलंयवैगरे वैगरेथोडक्यात आमची बागम्हणजे आमच्या अन मित्रातील एक सेतू आहेकायम आठवणीब्रम्हकमळाचं पान मी चोरून आणलंयमाझ्या 'नर्सरी मित्राने - जेजुरकरइंग्लिश गुलाब दिले आहेया सर्व मित्रांना आम्हीं सदैव उपडेट देत असतोत्यांनाही बरं वाटतं अन मग ते म्हणतात 'अजून घेऊन जा'. यामध्ये पैसे वाचतात आणि प्रेम वृद्धिंगत होतं


प्रत्येक रोपाला आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे - प्रत्येकाची कथा न्यारीरूप न्यारं अन सुगंध न्यारात्यांची अभिव्यक्ती वेगळीमलात्यांना पाणी कधी द्यायचं हे बरोबर समजतं - जसं आईला 'पाजायचंकधी हे समजतं तसं. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।याउक्तीप्रमाणे मी अव्याहत पाणी घालत असतो


पण 'भेदकरणं हा स्वभाव माणसाच्या पाचवीला पुजलेला आहेभेदभाव करणं चुकीचं आहे हे समजत असूनही मी तो करतोकाहीकाही 'मुलांकडेजास्त लक्ष दिलं जातंफळाचं रोप फुलांच्या रोपांपेक्षा जास्त प्रियफुल  देणाऱ्या रोपांकडे किंचित दुर्लक्षकमळांच्या फुलांचं 'ब्रह्म कमळापेक्षाजास्त कौतुककमळ आणि लिली ही दोन वेगळी फ़ुलं पण आम्ही लिलीलाच कमळ म्हणतोअसेअनेक सूक्ष्म भेद आम्हीं करत असतोयावर बऱ्याच वेळा उल्काचं अन माझं दुमत असतं


आपल्या नवीन घरात कोणी प्रथम आलं असेल तर आपण त्यांना आपलं नवं घर दाखवतोहल्ली आम्हीं दोघंही 'आमची नवी बागआलेल्या प्रत्येक पाहुण्याला दाखवतोयेथे मात्र माझ्यात अन उल्कात स्पर्धा असते - रसभरीत वर्णन करण्यासाठीआम्हीं आमचा आनंद'द्विगुणितकरत असतोपण कधी कधी बोलतांना अचानक लक्षात येतं की 'अरे पाहुण्याला बागेत इंटरेस्ट नाही'. मग आम्हीं ब्रेक दाबतोपाहुण्याची कीव करतो - मनात म्हणतो - बिचारा , याला आनंद माहीतच नाहीहल्ली आम्हीं स्ट्रॅटेजी बदलेली आहेपाहुणा स्वतःहोऊनवृंदावनात गेला तरच बासरी वाजवायचीअन्यथा 'अरण्यरुदन (निष्फळ आक्रोशव्यर्थ खटाटोपकरायचे नाही


अजून बरेच लिहिता येईलचिंतनपरपण थांबतोहे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे - तुम्हांला बाग हा विषय आवडत असेल तर याआमच्याकडेचहा पाजतो 'वृदांवनात'. अन्यथा तुमच्याकडे दुसऱ्याला 'देण्यासाठीरोपं असतील तर मी तुमच्याकडे येतो. 'अमृततुल्यनाही पाजलं तरी चालेल पण रोप द्याआपण एक सेतू बांधू.  आमच्या बागेतून तुमच्या बागेपर्यंत 

0/Post a Comment/Comments