‘मानकर' बाई



 'मानकरबाई ?!


'जिया जलेजाँ जलेनैनों तलेधुआँ चलेधुआँ चलेया ओळींचं विडंबन मला करावसं वाटतं ते असं -'उल्का जले, (मेरीजान जले नैनोंतलेधुआँ चलेधुआँ जले'. हे धाडस मी आजच्या 'महिला दिनानिमित्तकरू पाहत आहे


ऑपरेशनच्या आदल्या दिवशी उल्काला भेटायला उज्वला आली होतीमी पेपर वाचत निवांत बसलो होतोअचानक 'माझ्या मानसिकशांततेतभूकंप झालाउल्का उज्वलाजवळ मनातील 'खंतव्यक्त होतीअनाहत नाद आहत नादात रूपांतरित होत होता  खंत शब्दबद्धहोत होतीअगदी स्पष्टपणेउल्का माझ्या सुखनैव जीवनशैली वर 'जळतेहे समोर आलंसांगत होती - 'मानकर सकाळी सहा वाजताउठून आठला परत येतोसायकलिंग करूनमग स्वारी पेपरवाचनास जुंपते ते दहा पर्यंतमग मार्केट ... एक बरं आहे त्याचा चहा तोकरून घेतोअगं मला वेळच मिळत नाहीसकाळ पासून अडीच वाजेपर्यंत काम काम अन कामपेपर अन व्हाटसअप मी दुपारी उघडतेपुरुषांचं बरं असतं .....' उज्वलाही संमतीदर्शक हो ला हो करत होतीमी गप्प बसून राहिलोमी एक सहनशील पुरुष होतो यात मलाकाहीही दोष दिसला नाहीकिती ते मानसिक अत्याचारअसो


ऑपरेशन झाल्यावर मात्र आमच्या भूमिका बदलल्यामी 'तीझालो अन ती 'मीझालोथोडक्यात उल्काला 'पूर्ण आरामकरायलासांगितलाहल्ली उल्काला चहा अंथरुणात मिळतोपेपरची घडी तीच उघडतेअंथुरणात अथवा कट्ट्यावर बसून संपूर्ण वाचन (मनन?). मग नाश्ता ... दुपारचं ... मी मात्र जुंपलेला असतोचहानाश्तारांधा वाढाउष्टी काढाधुणं ( भांड्याना बाई आहे अन पोळ्या'कोपऱ्यावरील जोशी काकूंकडूनयातंच दिवस निघून जातोनव्या भूमिकेबद्दल मला आकस नाहीआवडीने करतोपण माझ्या शर्तीवरअटी  शर्ती लागू ) - मला 'नावंठेवायची नाहीखूप सूचना करायच्या नाहीमुख्य म्हंजे 'स्वच्छतेचा बाऊ करायचा नाही'. हे सगळंकेवळ (रशिया-युक्रेन सरहद्दीवरशांतता नांदावी म्हणून


घराची 'पूर्णजबाबदारी घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की 'घरकाम खूप काही अवघड नसतं'. त्यातही मज्जा आहेस्त्री अन पुरुषजन्मतः एकच असतातहि कुटुंब व्यवस्था आणि समाज त्यांना लिंगावरून स्त्री किंवा पुरुष करतो - तसं घडवतोनीट पहा आपल्याकुटुंबाकडेआणि मग आपण 'महिला दिनीसमानता कशी नाही यावर एक दिवस नुसती चर्चा करतो


पण या 'घोळाबाबतसिमोन  बोउआर

स्त्रीवादी फ्रेंच लेखिका  चिंतक एका ठिकाणी म्हणते ' but the girl 👧, since her childhood, has looked to the male for fulfillment and escape; he is a liberator; he is rich and powerful; he holds the key to her happiness; he is Prince Charming…..’ आता उल्काचं अन माझं लग्न झालं तर तिने (आणि मीसमजून घ्यावं कि ‘marriage is a destiny traditionally offered to woman by Society’. थोडं गप्पं बसावंखंत हि व्यर्थ आहेफ्राईडनं ( Sigmund Freud) तर कळस केला - तो म्हणतो'नवरा हा अनेकदा ज्या माणसावर आपण प्रेम केलेलं असतं त्याच्या बदल्यात मिळालेला पुरुष असतो'. सगळंच भन्नाटअसो


आमच्या घरी सध्यातरी 'समानतानांदत आहेमाझ्यावर पैसे कमावण्याचा ताण नसल्याने मी स्वैर वागू शकतोसोमवारी उल्कालासांगणार आहे 'ते जरा शेअर मार्केटमधील सौदे बघमी भाजी फोडणीला टाकतो'. बघू काय होतं ते !


आमच्यात प्रत्येकाला स्वतःचा असा एक 'अवकाशआहेती मुक्तपणे कविता करत असतेस्त्री अत्याचारावर सुद्धा लिहीत असतेतीमुक्त आहेतिनेच मुक्तता मिळवलेली आहेएका दृष्टीने हे बरं आहे 'कारण मीही हळू हळू मुक्त होत आहे'. समानता हवी आहे ना तर'पूरकजगूपण परस्परवलंबित्व नको


आमच्या नव्या बदलेल्या भूमिका किती दिवस चालतील माहित नाहीएकदा का उल्का बेड वरून खाली आली कि ... माझ्या नव्याभूमिकेत 'लुडबुड' ... मग मी सांगणार .... आजपासून तुझा चहा तू तयार करायचाआणि पेपरची घडी मी मोडणार


नाहीतर माझी अवस्था ' मेघा छाए आधी रात

बैरन बन गई निंदियाबता दे मैं क्या करूँ 

मेघा छाए आधी रात...'

0/Post a Comment/Comments