*मानकर मिसळ*
Introducing मानकर मिसळ 🤗 । वर्तमानपत्र वाचू नका | मिसळीचे रंग पहा | या नासिकला | मी पाव खात नाही | रस 'भंग' होतो | फरसाण 'लाल' असावी म्हंजे नीट भिजते | पिवळे फरसाण 'विरघळते' त्यामुळे 'मिसळीचा' 'गोपाल-काला' होतो | काही लोक 'पावाचेतुकडे करतात आणि मिसळमध्ये 'भिजवतात' - किती भयंकर - खून आहे मिसळीचा हा | आंबट दही 'किंचित पातळ' करावे - पण ते'ताक' नसावे. यामुळे आंबटपणा प्रत्येक 'स्वाहा' मध्ये येतो | सध्या एक लिंबू दहा रुपयाला मिळते तरी लिंबू टाळू नये - एक अषटांस(१/८) - लींबू पीळावेच (अन्यथा मिसळ खाण्याचे पाप करू नये - तुमच्या भल्यासाठी सांगतो ) | मटकी खूप शिजवू नये - तिचा 'गचका' आपल्याला खायचा नाही. प्रत्येक मटकीचा 'दाणा' अनुभवता आला पाहिजे | कांदा चौकोनी पण बारीक नसावा - कांद्याचा तुकडा तोंडातजे रस सोडतो त्या वर लक्ष द्या | घाई असेल तर मिसळ खाऊ नये - 'मिसळयोग ' शांततेत साधला पाहिजे | मित्राबरोबर मिसळराजकारणावर नासिक मधील ट्रॅफिक बद्दल बोलू नये - चव बिघडते | कोथंबीर असली तर उत्तम , पण नसली तरी चालेल | तर्री हळू हळूऍड करावी. आपल्याला काय झेपेल याचा अंदाज घ्यावा - 'भास' मारण्याचा प्रयत्न करू नये - नाहीतर आहे 'नाका कानातून धूर ' | मिसळ खातांना घाम येतो - पण तो लपवू नये - घाम पुसू नये , मिसळ संपेपर्यंत | मिसळ समोर आल्याबरोबर नजरेने आणि नाकाने तीखावी. मग जिभेचे 'बड्स' जागे होतात. मेंदू 'चव कशी असेल ? या विषयावर कल्पना करू लागते | ही तयारी झाली की मिसळ नीटहलवावी - एकत्र करावी - आणि पहिला घास घ्यावा | मग थोडे थांबावे | अन्नपूर्णेला थँक्स म्हणावे | सदा सर्वदा योग तुझा घडावा .... असं मनात म्हणावे | मग 'समाचारास' सुरवात करावी | जेंव्हा ताटलीतली मटकी संपते आणि फक्त रस्सा उरतो तेंव्हा वेटरला म्हणावे'एक सिंगल वडा' | वडा आला की अजून रस्सा तर्री घ्यावी अन 'सुखनैव' पद्धतीने योग साधावा |
अरे 'मानकर मिसळ' गार झाली. परत गरम करावी का ? नाही. मानकर नाही. गिळा आता तशीच -कारण मिसळ खातांना सोशलमीडियाकडे लक्ष देऊ नये , सगळं मुसळ केरात जातं. तुम्हांला 'सांगायच्या' गडबडीत माझ्या मिसळमधल्या फरसाणीचा कुरकुरीतपणाशांत झाला.
ता. क. - काही ठिकाणी मिसळीला बेस दिला जातो. पोहे अथवा साबुदाणा खिचडी. मला खिचडी आवडते कारण ती चटकन विरघळतनाही.
अजून माहिती हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधा - मी सांगीन 'मिसळ कधी आणि कुठे आणि कशी' खावी ते. मिसळ कशी करावीयाचे 'मार्ग - दर्शन' उल्का करणार. तिने 'आख्या जगात' मिसळ केली आहे.
Post a Comment