गोदाप्रेमी - चंद्रकिशोर पाटील


 गोदेचं ....येडं लेकरू ? 


*दोनतीन महिन्यांपूर्वी*

आज संध्याकाळी चुकून मी पायी फिरायला बाहेर पडलोनकळत पाय कुप्रसिद्ध आसारामबापू पुलाकडे वळाले - हा पूल कुप्रसिद्ध आहेपहिले कारण 'बापूअन दुसरे कारण 'त्या पुलाच्या आजूबाजूला चालणारे उद्योग'. पुलावर 'चंपाभेटलेशिट्टी घेऊन उभे होतेयांना मीएकदीड वर्षांपूर्वी येथेच भेटलो होतोत्यांचे 'उद्योगबघून मी चाट पडलो होतोत्यादिवशी मी तत्काळ यांच्यावर ब्लॉग लिहिला होतातुम्हांस सांगितलं होतं '*आज विचित्र पाटील भेटला होतानाशिकच्या सुज्ञ रहिवाश्यांनोतुम्हांला सुद्धा भेटण्याची शक्यता आहेकारणतो ओम्नीप्रेझेन्ट आहेम्हणजे ? - तो 'सर्वव्यापीआहेतो कधी तुम्हांला एखाद्या बागेत साफ सफाई करतांना दिसेल तर कधी तुम्हींआम्हीं झाडाखाली देवांच्या तसबिरी फेकून दिल्या असतील तर त्या गोळा करत असेल.* आजही ते 'प्रदूषणमुक्त गोदावरीच्या ध्यासघेऊन काहीतरी शिस्त आणू पहात होतेकचरा नदीत जाऊ नये बाजूला एकत्र ठेवत होतेआमचा रामराम शामशाम झाल्यावर त्यांच्याजिव्हाळ्याच्या विषयावर गप्पा सुरु झाल्यासांगत होते - मानकर साहेब हे पहा कंडोमह्या दारूच्या बाटल्या अन हे नकोसे झालेले देवत्या तिथे आईवडिलांच्या आणि देवांच्या तसबिरी पडल्या आहेवैगरेवैगरे'. *(माझ्या मनात विचार आला - आपण आपल्या आईवरबलात्कार करतो आहे हे आपल्या लक्षात कसे येत नाहीघाण असते नदीच्या दोन्ही तीरांवरत्यात अकार्यक्षम प्रशासननदीच्या पात्रातकाँक्रीट टाकणंकुठे फेडाल रे ही पापं ?')* चंपा मला प्रत्येक भेटीत दोन गोष्टी सांगतातपहिली -त्यांच्या स्वच्छता मोहिमेतील बातम्यादुसरी गोष्ट म्हणजे - त्यांच्याच शब्दात सांगतो - 'मानकर साहेब माझी बायको तुमची मोठी फॅन आहेतुम्हीं लिहिलेला प्रत्येक ब्लॉग तीवाचतेतुमच्या सायकलिंगच्या पोस्टचा आवर्जून उल्लेख करते आणि मला सांगते की आज मानकारांनी शेतातून ही भाजी आणलीअथवा ती फुले आणलीमग हळूच तक्रार करते - कारण मी काहीच घरी नेत नाही म्हणून'. त्यावर मी म्हणालो 'पाटीलमाझ्या ब्लॉगमुळे इतरांच्या संसारात कलह होईल असे मला कधीच वाटले नव्हते'. मग आम्हीं खूप हसतो आणि मग 'परत भेटूअसं म्हणून मी निरोपघेतोआजही निरोप घेतांना मी त्यांचे पोटभरून कौतुक केलेमी 'वहिनींनीकौतुक केल्यामुळे सुखावलो होतो तर 'चंपामी केलेल्याप्रोत्साहन रुपी कौतुकामुळे सुखावले होतेप्रत्येक माणसाला शाब्बासकी हवी असतेया 'पाठीवरच्या थापेवरतर तो 'आणखी कामकरत असतोआज निघतांना मी सांगितलं 'पाटील वहिनींना घेऊन या घरी एकदा'. चंपा 'हो - नक्कीम्हणालेसूर्यास्त झाला होतापुलावर 'वेगळ्यापद्धतीची गर्दी वाढू लागली होती


*सातआठ दिवसांपूर्वी*

उल्काची सकाळ सुरु झाली होतीतिने यांत्रिक पद्धतीने रेडिओ लावलाचहासाठी आधण ठेवलं आणि दात घासू ..... तिने रेडिओलावलेला मला अजिबात आवडत नाहीकारणया 'आकाशवाणीवरफक्त काल मोदी काय बोलले हेच ऐकावं लागतेमला त्यांचा'तोचतोचपणानाही सहन होतंपण तरीही मी गप्प बसतो आणि माझ्या चहाची तयारी करू लागतोसकाळी सकाळी 'मतभेदनको - त्यासाठी दिवस पडलाय ना!


पण आज मोदी काहीतरी वेगळं सांगत होतेमन सुखावून टाकत होतेआम्हीं दोघांनीही कान टवकारलेते श्री चंद्रकिशोर पाटील (आपलेचंपायांचं कौतुक करत होते - मन की बात मध्येआपल्या नाशिकचे सुपुत्र स्वयंस्फूर्तीने त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नाशिक शहरातीलनदी  इतर ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहेतत्यांनी गोदावरी  नंदिनी नदीमधून हजारो किलो कचरा  घाण बाहेर काढली यात्यांच्या कार्याची दखल आज देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या भाषणात  घेतलीत्यांचा गौरव केलाhttps://www.facebook.com/100001600901615/posts/5339461659450478/?d=n


आम्हांला खूप आनंद झाला होतामी लगेच चंपा यांना फोन लावलाअभिनंदनाचं रुटीन संपल्यावर सांगितलं 'पाटील मी वहिनींनाभेटायला येतोमला त्यांचा इंटरव्हयू घ्यायचा आहेमाउलींचं मन जाणून घ्यायचं आहेतुमच्या आनंदात भागीदार व्हायचं आहे'. पाटीलया म्हणालेतुमचा 'फॅननक्कीच आनंदी होईल


*आज*

मी आणि उल्का गेलोपाटलांकडेमस्त स्वागत झालंमी अतिशय साधे प्रश्न विचारलेवनिता उत्साहित - एक्ससायटेड - झालेलीवाटलीत्यात आपला 'आवडता ब्लॉगरपाहून दुधात साखरवनीताने विनयाने सर्व उत्तरे दिलीमधेच चंद्रकिशोर बोलायचा प्रयत्न करतहोतेपण वनीताला त्यांनी ओव्हरटेक नाही केलेदोन सूर एकमेकात विरघळल्यावर जे संगीत तयार होतं ... ते गाणं मी ऐकत होतोकस्तुरीचा सुगंध दरवळत आहे असा भास आम्हांला पाटील दांपत्याच्या सहवासात आलापाटलांचे अनुभव आणि अनुभूती खूप ऐकावेसेवाटत असतांनाच 'मी पंधरा मिनिटात पोहचतोअसं 'चंपाम्हणालेम्हणून आम्हीं उरकते घेतले


पाटलांचं गाणं 'अक्षयराहोहे लेकरू 'गोदेचीसेवा जरी करत असले तरी ते मूळचे शेगावचे आहेतगजानन महाराजांचं गाववनितासुद्धा शेगावचीपाटील या ट्रस्टींची ती नात


ताकिंवा सांगायचं राहून गेलं - मी आज वनीतासाठी शेतातून अळूची पानं आणली होतीती 'समारंभपूर्वकदेण्यात आलीआणि वरबजावलं - पाटीलसाहेब मोठं काम करत आहेत्यांच्याकडे भाजीचा हट्ट करायचा नाही

0/Post a Comment/Comments