Old Monks

 *ओल्ड मॉन्क्स कॅरम खेळतात ... म्हातारपणातून लहानपणात ....जातात आहे*


माझ्या आईला पाच बहिणीम्हणजे मला पाच  मावश्याप्रत्येक मावशी - आईतुल्यदोन मावश्या ठगाआड गेल्याराहिल्या चारबहिणीत्यांना मी मॉन्क्स म्हणतो कारण या चारही बहिणी अध्यात्मात अखंड बुडालेल्या आहेतमाझी आई ऐंशीत प्रवास करत आहे तरसर्वात लहान मावशी सहासष्टची


सध्या आम्हीं सर्व मावस भाऊ स्नेह वर्धन व्हावाघट्ट व्हावा म्हणून अलिबाग येथे जमलो आहेखाणं पिणं खेळणं फिरणं यांना ऊतआलेला आहेआठवणीवर जगणारे आपण सर्वआम्हीं सारे नवीन आठवणी 'तयारकरण्यात व्यग्र आहोतम्हणजे नेमकं कायतरवर्तमान 'पूर्णजगायचं - म्हणजे प्राप्त परिस्थितीत जे जे करता येईल ते ते करायचे अथवा जे करायचे 'राहूनगेले ते करणे - वयविसरून


मी आज सकाळी तयार होऊन आर बी आय गेस्ट हाउसच्या साध्यासुध्या रिसेप्शन एरियात आलो तर बघतो कायचारही बहिणी 'कॅरमखेळत आहेवय विसरून 'भांडणाचाआनंद घेत होत्या. 'हे काय कॅरम खेळण्याचं वय आहे काअसा प्रश्न नाकारत माझी माय मस्तढकलंपनची करत होतीआशा मावशीचा नेम चुकत होता तर सुमन मावशी 'दे दणादणपद्धतीने बोर्ड संपवत होतीतेवढ्यात मोठ्ठाआवाजात भांडणं सुरु झालीसगळ्यात छोटीनेउषा मावशीनेकाहीतरी गडबड केली असा इतरांनी आरोप केलामग काय 'आम्हीं नाहीखेळतजा ' असं तिघी म्हणू लागल्या. ....


मी त्यांच्या नकळत शूटिंग केलंत्यांचे हावभाव टिपले. 'आठवणीनिर्माण होत होत्या आणि मी त्याचे 'दस्तऐवजीकरणकेलंह्या चौघीआता मॉन्क्स असल्या तरी त्यांनी कॅरमच्या माध्यम वापरून 'लहानपणातप्रवास करत होत्याएक वेगळा अनुभव घेत होत्यास्नेहसंमेलन सार्थकी लागलं असं वाटून गेलंमाणसांना 'मोकळंजगता यायला पाहिजे - वर्तमानात - अर्थपूर्ण ! बाकी सगळे 'काळनिरर्थकभूतकाळ - आठवणींनी वेढलेला - चांगल्या वाईटभविष्य काळ - काळज्यांनी भरलेलाकधीकधी 'विदारकताकडेच नेणारा


*मनात अचानक विचार आला - अरे मी पण 'म्हाताराझालो आहेया मावश्यानी जो धडा 'शिकवलातो मला गिरवायलाच पाहिजेवर्तमानात 'जगा'. बघा - मॉन्क्स कॅरम कसा खेळतात ते ...*


https://youtu.be/SFEZzHzCkZg


0/Post a Comment/Comments