माझे संकट


माझी समस्यामाझे संकट!


मी मंदिरात गेलो की माझं लक्ष देवाकडे कमी असतंकिंबहुना ते नसतंचत्या पेक्षा मानवनिर्मित मंदिर मला भावतं - दगडाचं असेल तरजास्त भावतंमंदिर निर्माण करणार्यांनीशिल्पकारांनीमंदिराच्या रचनेची कल्पना मांडणार्यांनी जी काही सर्जनशीलता जगासमोरमांडलेली असते तिला तोड नाहीत्यात प्रतीकांचा वापर विचारपूर्वक केलेला असतोफक्त आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो ..


आजही मी अहिल्याबाई होळकर यांनी रेणुका मातेचं 'जीर्णोद्धारकेलेलं मंदिर 'सखोलबघत होतोमाझा देवाला नमस्कार पटकनहोतोदोन हात 'जोडलेकी 'किंचित असलेली श्रद्धाहा विषय संपतो. *मनी नाही भाव अन देवा मला वडा पावअशी अडचण होतेत्यात सारखं देवाकडे काहीतरी मागत राहणं - मला नाही आवडतमंदिराच्या गाभाऱ्यात मी सैरभैर असतो देवासमोर 'भामटेपणानाहीमी देवाशी 'एकाग्र' 'एकजीवहोऊच शकत नाहीयोग  साधताच मी पटकन मंडपात येतोमंडपातील भव्यतानीटनेटकेपणाआखिवता आणि रेखीवता मला खूप आवडतेत्याकाळच्या अभियंत्यांनीकारागिरांनी जगाला खूप - भरभरून - देऊन टाकलं आहेआता ते मला सांगत असतात - आम्हीं जे काही 'करून ठेवलंयना ते तरी नीट बघाइथे मी मोकळाखोल श्वास घेतो - चिंतनाच्यामार्गावर असतोहे माझ्या घरच्यांना माहित आहेमी गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर आज दीपाली - सून - म्हणाली - बाबा मी अर्धातासमंत्रोच्चार करणार आहे तो पर्यन्त तुम्हीं फोटोग्राफी 'उरकूनघ्या


मग मी मंदिराची प्रत्येक कमान पाहू लागलोप्रत्येक खांबावर जे नक्षीकाम केलं होतं ते पारखू लागलोत्यांचे क्लोजअप घेऊ लागलोयेथे जी प्रतीकं वापरली आहे त्यात 'सर्पहे प्रतीक वेगवेगळ्या रचनेतून वापरलं आहेहे मंदिर डोंगर कोरून उभारलं आहेमंदिराचा मंडपअतिशय सौंदर्यपूर्ण आहे


योगशास्त्रामध्ये वेटोळे मारून बसलेल्या सापाला कुंडलिनीचं प्रतीक मानलं गेलंयज्यांची जाणिवेची पातळी आणि क्षमता मनुष्या पेक्षाश्रेष्ठ आहे अश्या देव योनीतील (जसे यक्षगंधर्वलोकांनी अस्तित्वाच्या आपल्या या आयामत प्रवेश करतांना नेहमी सापाचेच रूपधारण केलेसापांकडे एक अशी आकलनशक्ती आहे जिच्याद्वारे त्यांना जीवनाच्या काही विशिष्ट आयामांची जाणीव असते ज्यांचीमनुष्याला नेहमीच उत्कंठा आणि आकांक्षा राहिली आहेत्याला कान नाहीततो ठार बहिरा आहेम्हणून तो त्याचं संपूर्ण शरीरच कानम्हणून वापरतोतो खर्‍या अर्थाने जमिनीला कान लावून ऐकतोसाप हे एक प्रतीक आहे ज्याने अनेक देशांच्या इतिहासावर आणिसंस्कृतीवर लक्षणीय छाप सोडली आहेअनेक शतकेयामुळे लोक एकाच वेळी मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्याशी जोडले गेले


मंदिराच्या बाहेरील दीपमाळ मला मोहवून टाकतेदीपमाळ ही मंदिराच्या प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्यबांधकाम असतेसगळे दिवे लावल्यावर काय सुंदर दिसत असेल याची मी कल्पना करतोयेथे दोन दीपमाळी दिमाखात उभ्या आहे


कासव - इथलं कासव साधं आहेनिरागस आहेआत्ता जिवंत होईल अन देवीकडे जाईल असं वाटलं .....


अन तेव्हढ्यात दीपाली ओरडली - बाबा आत या - निदान आरतीला तरी यामी आत गेलोआरती सुरु झाली - दुर्गे दुर्घट भारी तुजविणसंसारी  अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी  
वारी वारीं जन्ममरणाते वारी  
*
हारी पडलोआता संकट नीवारी*   


*हे मातेमी हरलो आहेएकाग्रतेने तुझी प्रार्थना नाही करू शकतआता तूच मला या संकटातून बाहेर काढ.* 

0/Post a Comment/Comments