कासव


 *अजून एक 'कासवसंग्रथन*!*


*पूर्वार्ध*

नुकतंच मी माझ्या कौलारू घराचा 'जीर्णोद्धारकेलाघराची नवीन रचना करतांना मी एक कल्पना उराशी धरून होतोमला माझं'रागरंगनावाचं घर तत्सम अनुभव देणारं करायचं होतंथोडक्यात मला क्युरेटर - संग्रहक व्हायचं होतं आणि घरात आर्ट गॅलरीथाटायची होतीमाझ्याकडे जुन्या वस्तू आहेतच पण त्यात मी जगप्रवास करतांना ज्या काही 'आठवणीआणल्या आहेत त्याची भरपडली आहेत्यात काही चित्र आहेतकाही वाद्य आहेतवैगरे वैगरे माझी ध्येयपूर्ती झाली असं वाटतंमाझं घर 'प्रत्येक येणाऱ्यालावेगळं वाटतंबहुतेकजण माझी किंचित प्रशंसा करतातमीही 'प्रशंसा '  लाजता स्वीकारतोपण मला मात्र नेहमी 'अपूर्णताजाणवतराहते - माझ्या घरात 'शिल्पकलेविषयीकाहीही नाहीयाची खंत आहेपण मला खात्री आहे की ही 'उणीवनक्की ... कधीतरी भरूननिघेलमी जुन्या दगडी कारंज्याच्या शोधात आहे


*उत्तरार्ध*

साकेत-दिपालीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 'देव देवकरायचं ठरलंमागच्या आठवड्यातकुलदेवता रेणुका मातेचं कुटुंबानेयथासांग दर्शन घेतलेमी ही घेतलेपण मी शिल्पकलेकडे जास्त लक्ष दिलेअचानक 'कुटुंब प्रमुखसाकेत  मानकरांनी फतवा काढलाचलो वडनेरभैरवनाथ हे आमचं कुलदैवतमी 'हुकूम की तालीमकेलीवडनेर छोटंसं गाव होतं तेंव्हापासून बघत आहेभैरवनाथाचेमंदिर अन् रथयात्रेच्या परंपरेमुळे प्राचीन वडनेर भैरवमय झाल्याचे अनुभवायला मिळतेपूर्वी वडनेर अन् भैरव ही दोन वेगळी गावं होतीवडनेर म्हणजे वड नेहार म्हणजेच वडांच्या झाडांचा समूह अथवा थापी अन् नेहर म्हणजे नदीनदीच्या लगत असलेल्या वडांच्या झाडांचासमूह ते वडनेरतसेच वटक ऋषी नावांच्या ऋषींनी हे नगर वसवल्याचा पुराणामध्ये उल्लेख मिळतो


मंदिराच्या समोर पोहचलोगाभारा पुरातन आहेवास्तू दगडातील आहे - प्राचीन आहेपण सभामंडप मात्र नवा आहेअहिल्याबाईहोळकरांनी भैरव गावातील भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केलागावात तीन मजली चावडी बांधलीभैरवनाथ मंदिराजवळ बारव बांधलीअहिल्याबाईंनी बांधलेल्या गावात एकूण चार बारवा आहेतकाळ साधारण १७५०-६० चा असावा


मी सभामंडपात बसलो आणि लाकडातील कोरीव काम न्याहाळू लागलोमंडप संवर्धन करतांना चुकीचे दिलेले रंगांचे थर पाहिल्यावरतळ पायाची आग मस्तकात गेलीपण लगेच हा दोन मजली मंडप अडीचशे वर्षानंतर उभा आहे या विचाराने मन शांत झालंउल्काआईआणि दीपाली पूजेत / नैवेद्यात मग्न होत्या तर मुलं नारळ फोडण्यातकुटुंब प्रमुख साकेत - आपण सर्वांना देवापर्यंत आणलंआताजेचंतेनि पाहून घ्यावं - अशा विचारात नाथाजवळ उभा होतासंगमरवरी फारशी गारवा देत असतानांच मी या वास्तूतील गतकाळाचीकल्पना करत होतोअहिल्याबाई पूजा करत असतील .... तेंव्हा ... चं ... वैभव ...


तेव्हढ्यात दिपालीने हाकारा केला 'बाबा चला'. मी उठलोदारात येईपर्यंत मनात प्रश्न आला - मी देवाला नमस्कार केला का? 'चूकभूलदेणे घेणेया तत्वानुसार मी उंबठ्यावर असतांना डोळे भरून 'काळ्याकुळकुळीत तेजस्वी भैरोबा ' कडे पाहिलं आणि पाऊल बाहेरटाकणार तेव्हढ्यात ...


तेव्हढ्यात माझं लक्ष वर जाणाऱ्या जिन्यात पडलेल्या दगडी अवशेषांवर पडलंनीट बघितलंमुंडकं नसलेलं संगमरवरी कासव तेथे पडलंहोतं - धूळ खातस्वार्थी मेंदू कार्यरत झालामी परत मंदिरात आलो अन गाभाऱ्यातील पुजार्याला कासवाबाबत विचारलं. 'काय सांगूसाहेबअशी सुरवात करून पुजारी म्हणाला 'मागच्या आठवड्यात बहिरोबाच्या रथाचं चाक त्याच्यावरून गेलं त्यामुळे मुंडकं धडावेगळंझालंमग गावकर्यांनी ठरवलं की नवीन 'कासवमंदिरासमोर बसवायचंआणि ते कालच बसवलंआता हे जुनं कासव 'गंगार्पणकरायचं आहे'. मलाही शिल्प हवंच होतंमाझ्या स्वार्थी मेंदूनं विचारलं 'मला द्याल का?, मी माझ्या घरासमोर ठेवतो जेणेकरून कासवाचंमाझ्यावर 'लक्षराहील'.  तो तत्पर 'होम्हणालामी आनंदी झालोतो गाभाऱ्यात गेला आणि जपून ठेवलेलं 'मुंडकंत्याने मला दिलेम्हणाला 'नीट चिटकवा'. मी आणखी आंनदी झालो कारण 'संपूर्णकासव मला मिळालंमी ते गाडीत जपून ठेवलं आणि नाशिककडेप्रवास सुरु केलाहवेतंच होतो मी


माझ्या घरासमोर आमच्या कुलदेवतेच्या मंदिरासमोर असलेलं कासव स्थानापन्न झालंएक शिल्पएक योगायोगश्रीविष्णूंना कुंडलिनीजागृत होण्यासाठी कासवाने प्रार्थना केल्यावर विष्णूंनी त्याला आपल्या मंदिरात प्रवेशद्वारात स्थान दिले आहेम्हणजेच कासवालामिळालेले हे ईश्वरी वरदान आहेजे त्याच्याकडे असलेल्या सत्वगुणामुळे मिळाले आहेकुंडलिनी जागृत होणे ही योगामधील सर्वातउच्च पातळीची साधना आहेपूर्वजांनी जाणिवपूर्वक ठेवलेलं हे एक प्रतिक आहे


*आज मी खूप आनंदी आहेएक शिल्प मिळालं म्हणून - तेही अचानकदेवातुझं माझ्यावर लक्ष आहे तरया पुढे जो येणार तोविचारणार - कासव तुमच्याकडेमग मी 'पूर्वार्धापासून उत्तरार्धापर्यंतसगळं 'संग्रथनकरणार.*


*संग्रथन म्हणजे शब्दांच्या साहाय्याने एखादी गोष्ट समग्रपणे सांगणेबहुदा हा शब्द विनोबांनी खूप वापरला आहे - 


https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-91593f93294d932947/92d94893093592e92f-935921928947930

0/Post a Comment/Comments