फुल वाचन


 फुल-वाचनअरण्य वाचनानंतर!


'चकवा-चांदणंवाचल्यावर वन-ऋषी मारुती चितमपल्ली माझ्या मानगुटावर बसले की काय अशी शंका येऊ लागली आहेते कायमबसले तर माझ्या जीवनात आणखी आनंद येऊ शकतोपुस्तक वाचल्यापासून माझा 'दृष्टीआणि 'कोनबदलला आहे असं वाटतंकारण ....


माझ्या घराच्या रचनेत असंख्य खिडक्या आहेतनवीन बागेचा 'भारसांभाळतांना मी कुंड्यांची रचना अशी केली आहे जेणेकरूनकोणत्याही खिडकीतून बघितलं तर कुंड्या दिसायलाच पाहिजे म्हणजे येणाऱ्या - उमलणाऱ्या - प्रत्येक फुलाचा 'आस्वाद-आनंदघेतायेईल


सध्या एका रोपाचं फुल उमलतंयत्या फुलाचा नाव-गावजात-पातधर्म-पंथ मला माहित नाहीजाणून घेण्याची इच्छा नाही - कारणनावात काय आहेअसा प्रश्न बऱ्याचवेळा पडलेला असतोह्या फुलाचं विशेष म्हणजेपूर्ण फुलण्यास सहा सात दिवस लागतातएकदा फुललं की महिनाभर 'तसंचराहतं आणि हळू हळू मरतंसगळं कसं माणसासारखं आहेलहान बाळाचे सहा सात वर्षे म्हणजेयाचे सहा सात दिवसदररोज आनंदाला उधाण येणारमी गेले सहा सात दिवस 'मुलाचे/बाळाचे/फुलाचेखिडकीतून सकाळी दहावाजता फोटो घेतोसकाळी दहाकारण याच वेळी सूर्यदेव - त्यावर संपूर्ण 'प्रकाशवृष्टीकरत असतोफुल तेजस्वी दिसतं यावेळीकिंचित पारदर्शकमग पिवळा रंग अधिक खुलतोतो बोलतोलाल रंगावर प्रकाश पडला की  .... सगळं नाही सांगतफोटो बघा - आमच्या बाळाचे


बाळाची चाहूल पहिल्या फोटोतलाल रंगात पिवळा लपेटलेला आहेकळी लांबसडक आणि  उंच आहेनाक धारदार आहेयावरूनयेणाऱ्या मुलाचे गुण पाळण्यात दिसू लागतातत्याचे हिरवे आई बाप काय तोऱ्यात उभे आहे ते पहा


दुसऱ्या वर्षात अथवा दिवसात बाळाने फुलाने चांगले बाळसे धरले आहेमोठं झालयदात येत आहे की काय - पिवळं पिवळं काहीतरी


तिसऱ्या दिवशी मात्रबाळाचा आकार उकार समजू लागलाकळीतुन फुल होणं हा प्रवास निम्मा झाला होतारोपाच्या प्रसव यातनाकधीच संपल्या होत्याआता जेव्हढा जास्त सूर्य प्रकाश तेवढी 'वाढजास्तआता 'अंगावरचं पिणंकमी होत होतं


चवथ्या दिवशी बाळात 'मी पणआलं असं वाटलं कारण फुल आता चार वर्षांचं झालं होतंबाळाला बोलता येत होतं तर फुलाला ..... बिपीन सांगत होता की फुलांच्या फुलण्यावर 'माळ्याच्यास्वभावाचा परिणाम होतोमाळी ( म्हणजे मी ) सकारात्मक असेल तरफुलांशी दररोज बोलत असेल तरस्पर्श करत असेल तर ... फुलं छान फुलतातमी हे करत असतोचपण सकाळी सकाळी आमचं हेमूलफुल ... सकाळी सात ते नऊ पर्यंत रेडिओ सुद्धा ऐकत असतंउल्का उठली की पहिलं कामरेडिओ लावणे. *फुलांना 'मनअसेलकाहोचितमपल्ली 'होम्हणाले.* मला ऐकू आलं - मानगुटीवरूनतो पिवळ्यावरील किंचित 'काळाठिपका दिसतो का तुम्हांलात्याला तुमची दृष्ट लागू नये म्हणून लावला मीकाजळ आहे तेआता चार रंगाचं अविष्कार - लाल पिवळा काळा अन तपकिरी


पाचवा दिवस म्हणजे आजचा - आमचं बाळ लै गुणी हाये बघापाच वर्षांचंपाच दिवसांचं झालंसर्वात जुन्या दोन पाकळ्या बघाफुलात मध्ये पडलेला प्रकाश बघावरच्या भागातील पिवळ्या पाकळ्या बघाकिती कौतुक करूऑफ-बॅलन्स असूनही मलाआवडतंयवाऱ्यावर डोलतांना सुंदर दिसतंसगळं माणसांप्रमाणे


उद्या आणखी एक फोटोशेवटचात्या नंतर नाही कारण निसर्गाची 'सर्जनशीलताथांबणारमग 'ससटेनन्स' - एखादी गोष्ट सातत्यानेटिकून राहण्याची प्रक्रियाहा प्रवास अपरिहार्य असला तरी मला नाही आवडतम्हणून 'नो फोटो'.  आणि तिसरी स्थिती - ह्रास ! त्याचेतर कोणीच फोटो काढत नाही


असं आहे माझं 'फुल-वाचन'. मूल मोठं होतांना 'वाचतायायला पाहिजेहे फक्त आजी आजोबा झालं की करता येतंफोटो काढायलावेळ असतोनिसर्गाकडे बघण्यासाठी 'डोळसपणायेतोमारुतीराया मुळे मी आता 'चिंतनपल्लीहोणार हे नक्कीते बसले ना ... मानेवर

0/Post a Comment/Comments