भारत इराण - संबंध

*भारत आणि इराण - स्नेहपूर्ण संबंध !*


*श्री स्कंद पुराणे सायखेडा खण्डे ... गोदातीरी कथायां चतुर्थ अध्यायप्रारंभ |*


 टा 'वारसाफेरीच्या सुरवातीला 'साईखेडकरांनीआमचं सुंदर स्वागत केलं - फुलचहा आणि पाणी देऊन - अन एक विशेष असाउल्लेख केला तो असा 'आज आपल्याबरोबर एक परदेशी पाहुणी सुद्धा आहे '. साहजिकच सर्वांना तिचे कौतुक वाटलेसर्वांच्या भुवयाउंचावल्या गेल्याअनुभवांती सांगतोजगात कोठेही गेला तर असं दिसतं की - *स्थानिक माणसांना परदेशी माणसांबद्दल एक सुप्तआकर्षण आहेही उत्सुकताकौतुकमिश्रित आनंदमाणूस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतोकधी चेहरा बोलतो तर कधी मदत बोलतेकधी प्रश्न विचारले जातात तर कधी 'वाटदाखवली जातेक्षणभराच्या सहवासात मन सुखावले जाते.*


आजही मी इराणवासी जहिरा राहमिनिझाद हीची वास्तपुस्त घेतलीजहिरा ही सौ शैलजा जैन यांच्याबरोबर आल्या होतीशैलजा यांनी'जगजेत्या इराण कब्बडी संघालामार्गदर्शन केले आहे आणि या निम्मिताने त्या बऱ्याच वेळा इराणला जाऊन आल्या आहेतऔपचारिकरित्या तोंडओळख झाल्यावर मी माझ्या मुख्य कार्याकडे वळालो आणि फोटो काढू लागलोसायखेडा 'पिऊलागलोभ्रमंतीच्या शेवटी सौ शैलजा यांना विनंती केली की जहीराला घरी घेऊन या


ईराणी पाहुण्यात जास्त इंटरेस्ट होता कारण मला परस्परदेवघेव (रेसिप्रोकेशनकरायची होती२०१३ मध्ये एका ईराणी कुटुंबाकडूनइराणच्या पंधरा दिवसांच्या वास्तव्यात आमचं जे आदरातिथ्य झालं होतं त्याचा 'परतावाजहीरा मार्फत करायचा होतायाला'परतफेडम्हणता येणार नाहीपरत अनुभवांती सांगतो - ईराणी आदरातिथ्य हे जगात सर्वात सुंदर आहे - त्यात उत्कटता आहेओलावाआहेजणू खूप जुनी ओळख आहे असं पहिल्या भेटीत वाटतंभारतीय अन इराणी संस्कृतीत खूप साम्य आहे म्हणून 'नाळलगेचजुळतेआदरातिथ्याबाबत.


मी स्वतःला परदेशात 'भारतसमजतो अन जहिराला 'इराण'. वैयक्तिक पातळीवर जगातील सर्व माणसं एकमेकांना 'माणसाप्रमाणेवागवतात - ते 'धर्म-रंग-देशनिरपेक्ष असतातया पातळीवर 'मी तुला काय आणि किती मदत करू ते सांगअशीच भावना असतेपणहाच माणूस जेंव्हा समूहाचा भाग होतोतेंव्हा तो वेगळा वागतोहिंस्त्र होतो. 'धर्म-रंग-देशसापेक्ष होतोबेजबाबदार वागतोहे असं काहोतंझुंडीचे मानसशास्त्र .... ? 


काल संध्याकाळी सौ/श्री शैलजा आणि इराणी आमच्या घरी आलेखूप गप्पा झाल्यामीउल्का आणि शैलजा यांनी आपापल्या'इराणी आठवणीउगाळल्यादोन तीन तास चांगले गेलेजेवण महाराष्ट्रीयन - खिचडीकढीफोडणीचं तेलतूपपापड अन फरसाणपाहुणीला हा बेत आवडला असावा कारण ती 'आवडीनेजेवलीबाहेर पहिला पाऊस पडत असल्याने मने उल्हसित झाली होतीएकबरं होतं की जहीराला इंग्रजी येतंयपंधरा वीस दिवस इराणी शैलजाकडे राहात आहेजातांना जहीराने दोन छोट्या गोष्टी भेट दिल्यापहिली गोष्ट म्हंजे - इराणी ब्रेडपावपोळीहा प्रकार खूप दिवस टिकतोदुसरी गोष्ट म्हणजे - पर्शिअन गालिच्याचा 'तुकडालाकडीफ्रेम मध्ये लावलेलानंतर जहिराने सांगितलं की हा तुकडा  इमाम रझा मॉस्क येथे पसरलेल्या गालिच्याचा भाग आहेएक प्रकारे तोपवित्र आहेप्रसाद आहेइमाम रझा हे शिया पंथातले आठवे गुरु होयही माहिती मिळाल्यावर या गिफ्ट्चं 'मूल्यअचानक वाढलेआता मला योग्य ठिकाणी ही फ्रेम लावावी लागणार


*भारताच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मग आम्हींही एक छोटी भेट दिलीमुलाने लेह वरून आणलेल्या 'झेंड्यांच्या / पताकांच्यामालिकाआता बुद्धाचे झेंडे/पताका 'इराणच्या घरातझळकतील.*


म्हणून आजच्या अध्यायाचे शीर्षक आहेभारत-इराण : स्नेहपूर्ण संबंध. 'वारसा फेरीकुठे सुरु झाली आणि कोठे संपली हे बघा


*इति श्री स्कन्द पुराणे रेवाखंडेसत्यनारायण व्रत कथायां चतुर्थोऽध्यायः समाप्तः *


हा अध्याय शेवटचा बरं कानाहीतर तुम्हीं म्हणाल ....


 

0/Post a Comment/Comments