*मान्या म्हणे क्षेत्रश्रेष्ठ पंढरपूरी ।
एक तरी दिंडी अनुभवावी |*
॥१॥...... नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी ।
एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥
नामदेव महाराज यांनी ज्ञानेश्वरमहाराजांची आणि त्यांनी लिहिलेल्या भावार्थदीपिका [ज्ञानेश्वरी] ची भलावण करताना म्हटले आहे कियातील एकतरी ओवीचा अनुभव घेतल्यास आयुष्याचे कल्याण होईल. मी अजूनही, बासष्टीतही, ज्ञानेश्वरी वाचली नाही. एकाहीओवीचा अनुभव नाही. अर्थात याची 'खंत' आहे. पण 'वाचलीच' पाहिजे असं वाटत नाही. पण 'दासबोध' मात्र वाचावासा वाटतो. तोदररोज खुणावत असतो, पुस्तकांच्या गर्दीतून. आठशे पानांचा, घरी आणला आहे. मला तो निरूपणासह वाचायचा आहे - किंबहुनाफक्त निरूपण वाचायचं आहे.
गेल्या २५/३० वर्षांपासून घोकतोय की 'दिंडीला जायला पाहिजे'. पण अर्थप्राप्तीमध्ये वेळच मिळाला नाही. आता मात्र 'वयात आल्याने' वेळच वेळ आहे. वेळेस 'अर्थाचे' कंगोरे नाही. मनाच्या तळातून जावसं वाटतंय. हा ही अनुभव घ्यावासा वाटतोय. स्वछंदी पांथस्थ व्हावंसंवाटतंय - दिंडीतील पांथस्थ. अध्यात्माकडे 'ओढ' वैगरे ? असं काही नाही - कारण अजून 'ते' वय झालेलं नाही! किम्बहुना असंहीवाटतं की 'मानकरा, हात पाय अजूनही 'चालत' आहे .. तर फिरून घे. मनात आलेलं 'गाणं' म्हणून घे - छंदी आणि पंथी न होता. मुक्तरहा.
*जे जे भेटे भूत । तें मानिजे भगवंत ।*
मी दिंडीला का जात आहे? असं स्वतःला विचारलं आणि उत्तर वरील ओवीत सापडलं. माझा उद्देश 'वारकर्यांना' भेटायचा आहे. 'भागवत' पंथ समजून घ्यायचा आहे. यांच्यातच 'भगवंत' शोधायचा आहे. 'शुद्धता' शोधायची आहे. निरागसपणा अनुभवायचा आहे. मी तरकाळ्या मूर्तीच्या दर्शनाला सुद्धा जाणार नाही. कारण प्रवासातच मला 'विठ्ठल आणि रुख्माई' भेटणार आहे. 'रिंगण' अनुभवणार आणिपरत फिरणार. जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजणार. हा माझा भक्तियोग आहे. गेल्या २५/३० वर्षात माझ्याक्षमतेनुसार मी जी काही मदत केली आहे ती संतांनी सांगितलेल्या 'योगात' बसते - म्हणून मी समाधानी आहे. सेवावृत्ती हा भक्तीचाअविष्कार आहे. मला माझा पांडुरंग आफ्रिकेत आणि अरेबियात भेटलेला आहे - जे गांजलेले होते त्यांच्या रूपात. असो. या विषयावरअधिक न बोलणे उचित.
अतिसुसंस्कृतपणा कामाचा नाही. मुळात अंगी आहे तो रानटीपणा जरा जोपासावा एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्ययही त्रिसूत्री पाळून, पायी भटकावे. निसर्गाच्या कुशीत राहून निरागस आनंद लुटावा या माफक अपेक्षा बाळगून मी 'पुढे' जात आहे.
नर्मदा नदी सुद्धा वाट पाहतेय. कदाचित 'दिंडी' ही नर्मदा प्रदिक्षणेची पहिली 'नामदेव पायरी' असू शकेल. प्रदक्षिणा - म्हणजे चार सहामहिने! नुसतं चालणं! खिशात एक पै न ठेवता. 'तो घेईल' काळजी - असं भाविक म्हणतात. मी म्हणतो 'ते घेतील काळजी'! 'ते' म्हणजेइतर लोक - वाटेवर भेटतील ते. माणसांच्या 'माणुसकीवर' माझा अजूनही विश्वास आहे. मी 'स-श्रद्ध' आहे.
असो. येताय का दिंडीला? काही मदत, माहिती हवी असेल तर ... फोन ८६६८२१९१२५ .. माझं - 'माउली' मानकर यांचं नासिकवरूनप्रस्थान २१ जून २०२२. वर्गणी रु १३०० फक्त - जेवण आणि राहणं. लवकर सांगत आहे - नाहीतर तुम्हीं म्हणाल - 'एकटाच गेला. सांगितलं नाही. आम्हीं पण आलो असतो.'
म्हणून माझं विडंबन लक्षात घ्या. *मान्या म्हणे क्षेत्रश्रेष्ठ पंढरपूरी । एक तरी दिंडी अनुभवावी |*
Post a Comment