*आनंदली 'ती' माउली*
माझ्या 'दिंडी' प्रवासाची वार्ता एकूण माझ्यापेक्षा जास्त आनंद तीन 'माउलींना' झाला कारण त्यांनी सुद्धा दिंडीची 'पराकाष्ठा' केलेलीआहे. एक माझी 'माय' आहे तर दुसऱ्या दोन 'मावश्या' आहेत. या तिघी बहिणींनी 'भक्तीच्या डोहात' खोल उडी मारलेली आहे. मला'अध्यात्माची' किंचित गोडी निर्माण झाली की काय अशी गोड शंका त्यांना आली म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आपलं 'कार्ट' वयानुसार लायनीला लागलं म्हणून .... एक समाधान. कालौघात माणसात बदल होतात असे म्हणतात. असो.
दिंडीला जातांना स्वतःचं अंथरून पांघरून बरोबर न्यावं लागतं म्हणून मी तयारी करत होतो. लक्षात आलं की आमच्याकडे चादरी आहेपण छोटी सतरंजी नाही. तेव्हढ्यात लक्षात आलं की आई देवपूजेला बसते तेंव्हा छोटी सतरंजी आणि फरशी गार लागू नये म्हणूनघोंगडी वापरते. तडक आई कडे गेलो. तिने 'मोठ्या आनंदाने' मला सतरंजी/घोंगडी दिली. तिने आत्तापर्यंत तीन वाऱ्या केलेल्या आहे. तीलगेच तिच्या मागच्या आठवणीत विहार करू लागली. आठवणी सांडू लागली. 'अनिल, एक प्लास्टिकचा मोठा तुकडा बरोबर ने. पाऊसआला तर घोंगडी भिजायला नको. उगीच सर्दी पडसं नको'. ८२ वर्षांची माय ६२ च्या कार्ट्याची काळजी घेत होती. सामान कमीत कमी घेही सूचना. मग तिला काहीतरी आठवलं. ती आत गेली अन दहा बारा सफेद टोप्या घेऊन आली. 'बघ, तुझ्या डोक्यात कोणती बसते ती ' असं म्हणाली. मी सांगितलं की 'साध्या टोप्या मी वापरणार आहे'. त्यावर ती म्हणाली 'गांधी टोपी डोक्यावर नसेल तर ते तुला दिंडीतघेणार नाही'. हे टोपी प्रकरण माझ्याकरिता नवे होते. तिला काहीतरी संशय आला - की मी दिंडी 'गंभीरपणे' करत नाही. ती म्हणाली'थोडी तरी श्रद्धा ठेव. अर्ध्या चड्डीत अन टी शर्टात फिरू नको. पांढरा शुभ्र छब्बा पायजमा घाल. सर्व नियम पाळ. वैसट - मांसमच्छी खाऊनको. गंधाची कसली लाज? ते लाव. दिंडी करतोय तर मनोभावे कर. चालतांना पूर्ण आनंद घे' . तिला तिचा मुलगा 'चांगला' माहितआहे - म्हणून हे सर्व सांगत होती. मी तिला आश्वासन दिले की तू जे सांगितलं ते सर्व करणार. माझ्या आश्वासनामुळे ती 'सुखावली' होती हे नक्की, डोळे पाणावले होते - हे दिसत होतं. मी तिला माझ्या मनातलं सांगितलं असतं तर 'रसभंग' झाला असता. मी'माणसांच्या अभ्यासासाठी' दिंडीला चाललो आहे. नवे मित्र, नवा अनुभव या साठी आसुसलेला आहे. मी अंथरुणाची 'वळकुटी' करतचहोतो ... तेवढयात फोन आला ... निनावी ....
निनावी माझा दूरचा नातेवाईक निघाला. माझ्या दिंडीची चौकशी केली. त्यांनाही दिंडीत सामील व्हायचं होतं. मी त्यांना आवश्यक मदतकेली आणि त्यांची नोंदणी झाली. पुढे फोनवर गप्पा मारतांना त्यांनी एक गंमतीशीर मत दिलं. ते म्हणाले *'दिंडीला एकटेच जावे. नातेवाईक, मित्र, गाववाले बरोबर असले की आपण 'बाहेरच' पडत नाही. दिंडीतही 'आपला आमचा एक कंपू' निर्माण करतो. नव्याओळखी होत नाही मग नव्या अनुभुत्या कशा येणार? आपण दोघांनीही दिंडीत 'सामील' व्हायचं. कडेकडेने नाही चालायचं. त्यांच्यातएकरूप व्हायचं. जमलं तर वीणा हातात घ्यायचा. आणि एखादा पावडरचा डब्बा आणि मलम जवळ ठेवा - पायी चालून त्रास झालातर. नेहमीची वापरात असलेली चप्पल घ्या. स्पोर्ट्स शु नको. मला दहा वर्षांचा छोट्या वारीचा अनुभव आहे म्हणून सांगतो. खाण्याचाएकही पदार्थ घेऊ नका.'* बऱ्याच टिप्स मिळाल्या म्हणून मी उल्हसित झालो होतो. माझ्यासारखा वेगळा विचार करणारा 'परीक्षित' भेटला म्हणून आनंद वाटला. बऱ्याच लोकांची 'आहो कोणी कंपनी मिळत नाही' म्हणून वारी झाली नाही.
फोन संपल्याबरोबर आईच्या 'भजनी मंडळातील महिला' दारात हजर होत्या. आईने मोठ्या कौतुकाने सांगितलं की 'आमचा अनिलदिंडीला निघाला - पायी'. वृद्ध महिलांना अचानक माझ्या विषयी आदर निर्माण झाला. त्या नमस्कार करायला लागल्या. मी अवघडलो. मग मीच त्यांच्या पाया पडलो आणि आशीर्वाद घेतले. आशीर्वाद - बाबा सुखरूप परत या! शेवटी आईने एक झोळी दिली. 'ही घेऊन जाबरोबर. पाण्याची बाटली ठेव बरोबर'.
*आता चालता चालता 'आनंदाचे' घोट घ्यायचे. कुठेतरी, अनोळखी चौकात - कट्टयावर रेंगाळायचे, अन पुढील मजल मारायची.*
घरी आलो अन वळकुटी बांधली.
Post a Comment