पेमगिरी


 *पेमगिरी*


भव्य वडाच्या झाडाखाली तो मला सांगत होता *'काय सांगू साहेबजिजाऊ माता एक दिवस अगोदर बाळंत झाली असती तर 'शिवनेरीच्या ऐवजी 'पेमगिरीप्रसिद्ध झाली असतीपण माताजीनीं एक दिवस अगोदरच 'सोयीसाठी पल्याडशिवनेरी किल्ल्याकडे कूच केलं'. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि संशयाने विचारलं 'तुला कसं रे माहित ?'. तो म्हणाला 'साहेब इतिहासात लिहिलं आहे अनआमचे बापजाते सांगत व्हते ना'.*


मला इतिहासावर जास्त चर्चा करण्यात स्वारस्य नव्हते कारण माझा 'वर्तमानमला 'येम्हणत होताआणि गावात येतांना मी 'पेमगिरीकिल्लाया पाटीकडे अनावधाने दुर्लक्ष केलं होतो याची खंत वाटत होती. 'इतिहासाकडेदुर्लक्ष करू नये


माझा मित्र 'राजानेमला पेमगिरी येथील अति विशाल वडाच्या झाडाबद्दल सांगितलं होतं तेव्हांपासून 'पेमगिरीमाझ्या बकेट मध्येस्थिरावली होतीकाल मी 'दिंडीनिम्मिताने पुण्याला सकाळी सहा वाजता निघालो - स्कुटरनेसंगमेरला आल्यावर अचानक मनातआलं - चलो पेमगिरीबॅकपॅकर लोक जास्त विचार करत नाहीगाडी घातली गावाकडे - ऑफरोडींग सुरुचिखलीनांदुरी दुमालाओलांडलं अन पेमगिरी गावात पोहचलोकाय आहे पेमगिरी लापेमगिरीचा किल्ला प्रसिद्ध आहेया किल्ल्याचं नाव शाहगड असं आहेयादव राजांनी .२०० मध्ये हा बांधला होतादिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान आणि विजापूरची आदिलशाही या दोन सत्तांनीमिळून निजामशाही संपवलीत्यावेळी मूर्तझा या अल्पवयीन असलेल्या निजामशाहीच्या वारसदाराला गादीवर बसवून मराठा सुभेदारशहाजीराजे भोसले यांनी पेमगिरीच्या शाहगडावरुन  वर्षे राज्यकारभार चालवला असंही सांगितलं जातंअसो


मी पेमगिरी येथील महाकाय वटवृक्ष जो संगमनेर तालुक्याचे वैभव आहे ते बघायला आलो होतोवडाचा 'विस्तारदोन अडीच हेक्टरअसावाभारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहेया क्षणाला वड समोर आहेशिरलो त्यांच्या पारंब्यातअथांग शांतवाटत होतंएक मंदिर होतं आणि त्याची पण आख्यायिका ऐकलीआसमंत खरंच झाडाने व्यापलं होताखूप फोटो व्हिडीओ घेतलेवाटेवसरची गावं अन तेथली 'निवांतमाणसं बघितलीखेडी कशी जगतात हे बघणं उद्बोधक आहे


निघायची वेळ झाली होतीपेमगिरी गावातआजूबाजूलापर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे अनेक डोंगर आहेमाझ्या पुढे दोन पर्याय होतेएक परत १५ किमी आल्यामार्गी परत जायचंदुसरा पर्याय - सह्याद्रीत घुसायचं - कडे पठारावरून स्कुटर चालवायचीरस्ता अर्थातनिर्मनुष्य आणि खराब असणारपण परत असा चान्स येणार नाही म्हणून मी गाडी डोंगराकडे वळवलीअन पुढचा प्रवास अप्रतिमझालाया उन्हात पिवळा पडलेला निसर्ग अधिक सुंदर दिसू लागलामी अगदी तीनचार वेळा डोंगर माथ्यावरून गाडी चालवत होतोकधीकधी घाट उतरणं आणि चढणं अव्याहत चालू होतंया वातावरणात आपण एकटं आहोत याचा आनंद वेगळा असतोया आनंदालाएक भीतीची किनार पण असतेगाडी बंद पडली तर तर काय ? ... बघू पुढे ... बंद पडल्यावर


बत्तीस किलोमीटर स्कुटरिंग झाल्यावर मी परत हायवेला टच झालोआटपलं एकदाचं 'पेमगिरी'

0/Post a Comment/Comments