दिंडी - इंदुआत्या


 *दिंडी : 'इंदु आत्या'*


*चार दिवसांपूर्वी*

तिची अन माझी नजरानजर झालीमला एकदम माझी इंदुआत्या आठवलीमाझ्या आजोळची शांतसमाधानीनिरागससधनसुसंस्कृतमोठ्ठ कुंकू भाळावर असलेलीपन्नास वर्षांपूर्वीची चुलीच्या शेजारी बसलेलीफुंकणी हातात घेऊन फुंक मारणारीसर्वांनाकप कप भर दूध देणारी..... 


मागच्या जन्मात इंदुआत्या मोहाडीला होती तर या जन्मात ती 'मांडवी - विदर्भयेथे असू शकते असा विचार मनात आला आणि तेथेचविरघळला


*तीन दिवसांपूर्वी'*

आम्हीं सर्व विसाव्यासाठी थांबलो होतोत्या रानात काटे खूप होतेम्हणून मी आणि राम चांगली जागा शोधू लागलोथोड्याच अंतरावरचार पाच माऊल्या बसल्या होत्या तेथे गेलोबघतो तर कायमाझ्या आत्यासारखी दिसणारी माउली तिच्या चार मैत्रिणींना घेऊनबसलेली होतीयापुढे त्या माउलीचे नाव 'इंदुआत्याठेऊ

आम्हीं आमची बैठक त्यांच्या जवळ मांडलीमाझ्याकडे एक गूण आहेमी नबोलणाऱ्याला बोलतं करतोओळख पाळख नसेल तरी'प्रचंड गप्पामारू शकतोविनोद करू शकतोमुख्य म्हणजे माझ्याशी झालेली भेट 'सुंदर आठवणीतवर्ग करू शकतो


आजही तसंच झालंमीइंदुआत्या आणि मैत्रिणीबरोबर खूप गप्पा मारल्यादक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र एकत्र झालाकायकसेकुठेकाकेंव्हाहोकाअरेरेअसे शब्द आम्हीं वाक्यात टाकून बऱ्याच गोष्टींचा उहापोह करत होतोत्या बोलत असायच्या आणि मीऐकत असायचोमाझ्या एक लक्षात आलं की यांना लिहायला वाचायला येत नाही. 'तुम्हीं दांडीला का चाललायाचं उत्तर त्यांना देताआलं नाहीउत्तर महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय रुजलेला आहेपिढ्यानपिढ्या तो मागून पुढे येत आहेत्याचं ‘बौद्धिकीकरण’ कोणी करतनाही


*एतां विभूतिं योगं  मम यो वेत्ति तत्त्वतः।

सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः॥*

भावार्थ : जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतोभगवंत त्याचे कधीही वाईट होऊदेत नाहीआत्या आणि मी बोलू लागलोदोन तास निघून गेलेपुढच्या प्रवासास सुरवात झाली


*दोन दिवसांपूर्वी*

आम्हीं वाल्ह्या गावात पोहचलोवाल्या कोळ्याचं हे गाव दिंडी थांबली होतीएकेचाळीस तापमानातही उकळलेले पाणी पिण्यासटपरीवरच्या बाकड्यावर बसलोया 'पांढरपेशाकडे पाहून लोक सावरलेजो काळीमध्ये कसत नाहीम्हणजे जो शेतकरी नाहीतोपांढरपेशामी गप्पा सुरु केल्या आणि 'वाल्याचा वाल्मिकयेथे कसा झाला हे पुराव्यानिशी ऐकलंमग मी दिंडीजवळ आलो - आमच्यामाणसांजवळआड रस्त्याला सर्व माऊल्या रस्त्यावर 'निजल्याहोत्यामी माझा 'आत्ताचाब्लॉग खरडलाइकडे तिकडे बघितलं तरइंदुआत्या अधिक चार रस्त्यावर झोपल्या होत्यामी जवळ गेलोम्हटलं 'तुमचे मोबाइल नंबर द्या'. त्यावर त्या म्हणाल्या 'नंबर माहितनाहीहा मोबाईल घ्या अन शोधाआम्हांला काय बी येत नाही'. मी चक्रावलो होतोनाद सोडून दिलामी म्हणालो 'कथा सांगू?'. कथाम्हटल्यावर त्या ताडकन उठल्यामनोभावे माझी कथा ऐकली अन मलाच नमस्कार केलाप्रत्येक माउली दुसऱ्या माउलीला वाकूननमस्कार करतेइंदूत्त्याची मैत्रीण म्हणाली - लै भारी लिवलंमी धन्य झालोमी ही माझी पथारी आत्त्याजवळ लावली


*आज*

मी सामान आवरून पटांगणात बसलो होतोकाल माऊलीची पालखी येथे होतीकोल्ह्या गावाची एरव्ही पाच हजार असते ती काल पाचलाख झाली होतीकीर्तन सुंदर झालं होतंमी एकटा बसलेलं पाहून इंदूत्त्या जवळ आलीम्हणाली 'तब्बेत बरी नाहीताप अन पडसंधरलंय'. मी विचारलं 'औषध घेतला का मग ?'. तर म्हणाली 'नायकोणाकडे मागावं हेच समजत नाही'. आत्याचा चेहरा मलूल झालाहोतामी माझ्या कडची सर्व औषधें दिली अन म्हणालो 'आत्या काळजी घेआत्ता मी दिंडी सोडतोयमला बी ताप हायेहा माझा नंबरघे अन नाशिकला येतुला राम दाखवतो.'


मग त्या चार पाच जणी आणि मी दिंडी मार्गापर्यंत आलोप्रत्येक वारकरी रस्त्यावर पाहिलं पाऊल ठेवण्याआधी कृतज्ञता व्यक्तकरण्यासाठी रस्त्याला नमस्कार करतोपाऊल ठेवतोस्वतः भोवती गिरकी मारतो अन पांथस्त होतोआम्हीं सर्वांनी तेच केलंलालकुंकू असणारी इंदुआत्या अष्ट-गंध धारी विठ्ठलाकडे चालली होतीआणि मी दक्षिण काशीला


आमचे डोळे पाणावले होतेडोळ्यात पाणी असलं की स्वच्छ दिसत नाहीआमची चार दिवसांची ताटातूट आम्हांला बघायची नव्हती. 'विठल्लाती आणि तिच्या मैत्रणी येत आहेआता तू काळजी घे.'


पाठमोरी 'माझीदिंडीमनःपूर्वक नमस्कार केला आणि चालू लागलो

0/Post a Comment/Comments