साईखेळिया


 *सायखेळिया* - सायखेडा 


कोणत्याही भग्न वास्तूत जातांना माझं मन गलबलेलं असतंज्या पडलेल्या वास्तूत मी शिरत असतो ती वास्तू एके काळी किती'दिमाखातउभी असेल याची मी कल्पना करत असतोसीरिया आणि जॉर्डन येथील रोमन अँपी थिएटर बघतांना मी कल्पनेनं ग्रीकआणि रोमन नाटकं बघू शकतोत्या पायऱ्यांवर रोमन कसे बसले असतील हे मी बघतो तर नाट्यकर्मीने विंगेतून कधी प्रवेश केला असेलहे मी ताडतोमाझा मनःचक्षु फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतोमी चिंतनात तत्काळ गढून जातो


*आजही मी सायखेड्यात एका भग्न 'नाट्यगृहासमोरउभा होतोबाहेरून अवस्था न्याहाळत असतांना उल्का घाईघाईने बाहेर आलीआणि म्हणाली 'लवकर आत यापांढरं घुबड बसलं आहे'. प्राचीन ग्रीकांमध्येबुद्धीची देवीअथेनघुबडांच्या रूपात पृथ्वीवर आली असेम्हणतातभारतीय पौराणिक कथांमध्ये असेही सांगितले गेले आहे की घुबड म्हणजे श्रीमंतीची देवता लक्ष्मी यांचे वाहन आहेहिंदूसंस्कृतीत घुबड समृद्धी आणि संपत्ती आणते असे मानले जाते.*


मी आत जाईपर्यंत ते उडून गेलंयेथील लक्ष्मी आणि सरस्वती - दोघीही उडून गेल्याराहिलं काय तर - दारं अन खिडक्या धुळीचंसाम्राज्यया भग्नावस्तेत मी कठपुतळ्यांचा खेळ बघत होतोहे गाव त्या करीता प्रसिद्ध आहेलहान मुले पुढच्या 'हौदातबसलीअसतील तर पुरुष माणसं जरा उंचीवर बाजूलामहिला मात्र पहिल्या मजल्यावर असणारनाटक चालू असेल तेव्हां तेव्हां महिलांनाविंगेत काय चालले आहे ते सुद्धा दिसत असेल


*आणि होतिकिटाचं सांगायचं राहिलंतिकीट एक रुपया - फर्स्ट क्लास , पन्नास पैसे - अप्पर स्टॉल.*


मी व्याकुळ झालो होतोसमृद्धीचा ह्रास बघतांनापुढच्या आठ दहा वर्षात नाट्यगृह 'जमीनदोस्तझालेलं असेलयापुढील  टा हेरिटेजवॉक मध्ये 'हेस्थळ नसणारमी क्षणभर थांबलोवास्तूला श्रद्धांजली दिली आणि बाहेर पडलोसंस्कृतीचा ह्रास बघत आहेमी पूर्वीतमाशे बघितलेला माणूस आहेवणीच्या यात्रेतकिंवा 'जॅकसन गार्डन ( हल्लीचे शिवाजी उद्यानयेथेपूर्वी तेथे ओपन एअर थिएटरहोतेतमाशा ही एक जिवंत कला आहेरसिक फेटे कसे उडवतात हे पाहिलंयसगळं संपत चाललंय की संपलं


॥कालाय तस्मै नम: - माणसाच्या सुखाच्या स्मृती काळ दरवळून सोडतो अन्‌तोच काळ दुःखावर हळूच फुंकर घालण्याचेही काम करतोहे खरं आहे का ? 

0/Post a Comment/Comments