*लक्ष्मीच्या अंगणात सरस्वती*
सायखेडा वॉकच्या शेवटच्या टप्प्यात गावकर्यांनी आम्हांस लक्ष्मी नारायण मंदिरात नेले. प्राचीन मंदिर आहे असं बाहेरून दिसलं. आतमध्ये चित्रांचा खजिना आहे याची पूर्वसूचना बाहेरील 'डागडुजी ' वरून आली होती. मंदिराचे दोन भाग असतात. एक गाभारा तरदुसरा सभा मंडप. गाभाऱ्यात विशेष असं काही नव्हतं. फक्त सजवलेले देव - लक्षुमी नारायण होते. पण सभा मंडप मात्र 'सरस्वतीने' व्यापला होता. हो ! व्या प ला होता. चारही भिंतीवर आणि उंच आढ्यावर चित्रेच चित्रे होती. पुराणातील कथा 'सांडून' ठेवल्या होत्या. कोणत्यातरी सिन्नर येथील चित्रकाराने डाव्या हाताने पंचवीस रुपयात ही चित्रे काढलेली आहेत. अशी चित्रे आपल्याला पोथ्यांमध्येदिसतात. कलाकृतींचा दर्जा हा उत्तम होता. रंगाचा वापर अतिशय समर्पक होता. म्हणून म्हटलं, मंडपात 'सरस्वतीचं' अधिष्ठान आहे.
*गोदावरीची सायखेड्यावर नेहमीच (अव)कृपा झालेली आहे. पावसाळ्यात नदीला जेव्हां पूर येतो तेंव्हा गावात पाणी येतं. नदीकाठचीमंदिर पाण्यात जातात. या पुराचे फटके या मंदिराला सुद्धा पोहोचलेत. जी चित्रे भिंतीच्या खालच्या बाजूला होती ती बहुदा ओलाव्यामुळेखराब झाली. आता चित्रांचं 'संवर्धन' करण्याऐवजी गावकर्यांनी भितींना फरशी लावून टाकली आहे. यामुळे जेव्हढं आहे तेव्हढं तरी'जपलं' जाईल ही अपेक्षा. चित्रकार बाळ नगरकर यांनी छान माहिती दिली. तेही सायखेड्याचे.*
माझ्या एक लक्षात येऊ लागलंय की भारताचा खरा वारसा - heritage अशा छोट्या छोट्या गावातच आहे. संस्कृती तेथेच आपल्यालाबघायला आणि अनुभवायला मिळते. पण ....
*सरस्वतीच्या मंडपात एक तास कसा गेला हे कळलं नाही. चित्रातल्या देवांचे हावभाव नीट पाहिले. त्यांचे निरागस चेहरे भावले मला. सागाच्या लाकडातील खांब अन महिरपी गत काळातील वैभवाबद्दल बोलत होते. पिवळा रंग ताजा वाटत होता. चित्र पाहिल्यावर माझ्यामनी समाधान आणि आनंद दाटला होता.*
म टा आणि पडवळ सर यांचे पुनश्च आभार.
Post a Comment