वरणभात आणि तूप


*वरणभाततदनंतर 'तूप'*


वारीमधून 'मधूनचघरी परतलो तरी वारी माझा पिच्छा सोडत नव्हतीकिंचित पोकळी निर्माण झाली की काय असं वाटायचंघरीविश्रांती घेतांनासारखा तो दिंडी मार्गवारकऱ्यांचे लोंढे आणि ती मुव्हमेंट म्हणजे संक्रमणअव्याहत 'चालणं'. माझं विचारचक्र सुद्धा'movement' करत होतंमनात वेगळ्याप्रकाराचा आनंद नांदत होता हे मात्र नक्कीवरण म्हणजे 'वारीला जायलाच पाहिजेहा प्रगतविचार तर 'वरणभात म्हणजे दिंडीचा प्रत्त्यक्ष अनुभूती घेणंअसा उन्नत विचारदिंडीत कुठे तूप मिळणारत्या 'दररोजच्या घाई आणिगडबडीततुपाची आठवण सुद्धा येत नाही'. दिंडीत चालतांना 'आजूबाजूचं समर्पणबघितलं की मी 'मनाशी संवादकरीत असेपाचव्यादिवशी चालतांना मनात एक विचित्र विचार आला की 'दिंडी हेही एखाद्या कर्मकांडासारखा प्रकार आहे'. मी हा विचार ताबडतोपझटकलाअरुणाताईंचं वाक्य आठवलं 'वारकऱ्यांच्या समर्पण भावनेला तडा जाईल असं काही करू नका.' मी विचार माझ्यापाशीठेवला आणि सहाव्या दिवशी 'दिंडी त्यागकेलाशाररिक व्याधीमुळेपण मन मात्र तुपाच्या शोधात होतं


दोन एक महिन्यांपूर्वी डॉ आनंद नाडकर्णी यांचा 'आनंदाचे डोहीहा कार्यक्रम 'ऐकलाहोताप्रश्न आणि उत्तर असा फॉरमॅट होताडॉक्टर अडीच तास 'आनंदया भावनेबद्दल बोलत होतेएकेक पापुद्रा काढून दाखवत होतेअध्यात्म आणि मानसिक आरोग्य या विषयीत्यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे याची माहिती त्यांनी दिलीभारावलेल्या अवस्थेत मी 'मनमैत्रीच्या देशातहे ३७० पानांचं पुस्तकविकत घेऊन टाकलं


वारीवरून परत आल्यावर जेव्हां विश्रांती घेत होतो तेंव्हा रॅक मधलं हे पुस्तक खुणावू लागलंमी ते वाचायला घेतलं आणि झपाटलागेलोमी ज्या 'तुपाच्याशोधात होतो त्याची नदीच सापडलीअध्यात्म म्हणजे कायभारतीय संत आणि पाश्च्यात्य विचारवंत कायसांगत आहेआदिमप्रगत आणि उन्नत विचार म्हणजे कायमानसिक आरोग्य आणि अध्यात्म यांचा उहापोह ! वैगरे वैगरेदिंडीतचालत असतांना जे प्रश्न पडत होते त्यावर हे पुस्तक 'टिपण्णीकरत होतंमी भारावलेल्या अवस्थेत हे पुस्तक वाचत होतो ... तूपओरबाडत होतो


कालसुभाष शिंदे , १९७६ पासूनचा मित्र भेटलाइन्शुरन्स कंपनीत उच्चपदस्तअर्थात आम्हीं दिंडीवर गप्पा मारल्यातो मला सांगतहोता *'अरे मानकर तू जेंव्हा दिंडीत होता तेंव्हा जो ब्लॉग तू लिहिला तो मी बायकोस वाचून दाखवलातेंव्हा आम्ही नासिक-पुणे याप्रवासात होतोमध्ये एका धाब्यावर थांबलो होतोचहापानासतेवढ्यात एक पंधरा वीस लोकांची दिंडी तेथे येऊन बाजूच्या टपरीवरथांबलीमाझ्या मनात विचार आला - मानकरसारखं आपल्याला काही जमणार नाहीपण मी या वारकऱ्यांसाठी काय करू शकतोतेथून उठलोदिंडीचा चालक शोधला अन त्याला सांगितलं 'माउली ३००० रुपयांची पावती फाडाआजचं जेवण माझ्या कुटुंबातर्फे.' तुझा विश्वास नाही बसणार मानकर - आम्हीं सर्वबायको आणि मुलीअत्यानंदित झालो होतोसमाधानाने पुण्याकडे निघालोपुण्याचा विचार  करता'.*


विचार ! उन्नत विचार ! मला तर असं वाटायला लागलं की 'आपले विचार हाच आपला देव आहेत्या 'देवाकडेविचारांकडे नीट पहा' .... 


कुठेतरी कधीतरी समेवर येण्याची गरज आहेआयुष्य आणि त्यातील अनेक घटना एक प्रकारची आवर्तने आहेदिवस/रात्र घ्या किंवासंगीताची आवर्तने बघाचक्राकार लय बघादोन आवर्तनामधला अवकाश म्हणजे - समेवर येणंसम याचा अर्थ साम्यावस्थाविचारांच्या आवर्तनामध्ये हा जो क्षण येतो ... त्या कडे बघता आलं पाहिजे


एके ठिकाणी डॉक्टर लिहितात 'स्वधर्माचा म्हणजे श्रेयसच्या शोधाचा वारसा म्हणजे वारकर्यांचा वसापांडुरंगासाठी म्हणून निघायचेप्रवासाला आणि स्वतःमधल्या विठ्ठलालाच साद घालत जागे करायचे'.  मला तर असं वाटतं की स्वतःबरोबर चालणं म्हणजे दिंडीतचालणंतेथेही आपण एकटेच असतो - जरी गर्दीचा भाग असलो तरीसमर्पित होण्याचा प्रयत्न करणंआत्मभान आल्याशिवायआत्मभान विरघल्याशिवाय समर्पण नाहीसमर्पणाशिवाय आपल्याच आतल्या उच्चशक्तीचा अनुभव नाहीअवघड आहे हे सर्वपणसातत्य असेल तर 'उन्नत विचारजागृत होणार.  


आत्ताच पुस्तक संपवलंब्लॉग लिहिलापुस्तकातली एक छोटी गोष्ट सांगतो अन थांबतो. *मरणशय्येवर असलेल्या प्लेटोला मित्रविचारतो की त्याच्या जीवनदृष्टीचे सार कायविचार करून प्लेटो म्हणाले 'प्रॅक्टिस डाईंग'... मृत्यूचा सराव करास्मरण कराहे स्मरणराहिले तरच वाट्याला आलेल्या वेळेचे अमूल्यपण कळेल आणि आपण अधिक अर्थपूर्णशहाणपणाचे आणि सार्थकतेचे जीवन जगूशकू.*


मान्या (मानकरम्हणे ...

*किंचित दिंडी झाली आता

एक तरी ओवी म्हण आता.*


अरे कुठे आहे तो 'दासबोध'?  

0/Post a Comment/Comments