दिंडी : दिनक्रम


 *दिंडी : दिनक्रम*


आज नेहमीप्रमाणे मला साडे तीनला जाग आलीबाहेरचं जग शांत होतं पण गेले तीनचार दिवस जे आहत नाद ऐकू येत होते तेच नादआज 'अनाहतनाद झाले होतेते मनाच्या डोहातून येत होते. *बादल्यांचे आवाजनळावर पाण्यासाठी चाललेल्या बायकांच्या भांडणाचेआवाजमध्येच पुरुषी आवाज - 'अइ पोरीओ गप बसा कीलोकं झोपलं हायतेवडी बी अक्कल न्हाय का?' मग थोडावेळ शांतता कीपरत शांतता भंग.*


तुम्हीं म्हणाल 'भाऊवारी आणि भांडणवारी अन बाचाबाचीअसं कसं?'. सांगतोवारीतील प्रत्येक माउलीला ( महिला आणि पुरुष ) अंघोळ करूनच मुक्कामाच्या ठिकाणाहून प्रस्थान करायचं असतं. 'अंघोळहा त्यांचा अट्टाहास असतोपारोश्याने दिंडीत सामील होणंहे त्यांना पटत नाहीआमच्या २३४ नंबर दिंडीत ४१९ पैकी २४५ महिला होत्यापाण्याचा टँकर एकत्याला चार तोट्याएक बादलीभरायला दिड मिनिटएक अंघोळ करायला पाच मिनिटंफक्त बारा बादल्या आहेकमीत कमी तीनशे लोकांची इच्छा अंघोळ करायचीतुम्हीं डोकं लावा अन गणित करा 'किती लोक दोन तासात अंघोळ करतील?'. बरं तुमची अंघोळ होवो अथवा  होवोदिंडीचं प्रस्थानसहा वाजता होणार म्हणजे होणारअश्या परिस्थितीत कोणत्याही माऊलीचा तोल जाणार अन भांडण सदृश ... माझी झोप उडालीहोती तेव्हां आणि आतावारकर्यांचा दिनक्रम गमतीशीर असतोमाझा असा असायचा ....


*-३० सकाळ* - बायकांची भांडणं सुरु होतात अन त्यामुळे जाग येणंनीट झोप  लागल्याने जागही नीट येत नाहीतळमळत पडूनराहणं

*-३०* - अचानक 'उठा उठाअसा हाकारा सुरु होतोतो तंबूवाल्यांचा असतोत्यांना तंबू काढूनसगळं सामान यावरून ट्रक भरायचाअसतो आणि पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायचे असतेम्हणून ते घाई करतातअवघ्या तासात ते मैदान साफ करतातमग मीमाझी 'वळकुटीबांधतोतोंड हात पाय धुतोबॅग पॅक करतोवळकुटी आणि बॅग सामानाच्या ट्रक मध्ये साडे पाच ला फेकून देतो

*-३०* - कोणत्याही एका माउलींच्या कळपात घुसायचं अन अध्यात्मिक गप्पांचा आनंद (?) घ्यायचातोपर्यंत कोरा 'च्या' - चहाकोणीतरी आणतंकितीही प्यानंतर वर्तमान पत्राचे कागद समोर आले की समजायचं - पोहे येत आहेवाफ येणाऱ्या पोहे तोंडातटाकले की 'ब्रम्हानंदीटाळी लागतेअन तेवढ्यात टाळ मृदूंगाचा गजर सुरु होतोउरलेले पोहे 'कसेबसे गिळायचेअन ...

*-३०* - पायी चालायला सुरवातदिंडी फॉर्म होतेप्रथम चार झेंडे पताका धरी ; त्यानंतर चारजण टाळ वाजवणारे अन एक वीणाधारीतिसरी गॅंग - चार महिला डोक्यावर तुळस असलेल्यात्यानंतर भजन करणाऱ्या माऊलींची गर्दीमग सामान्य दिंडीकरी - वारकरीअतिशय संथ पणे वाटचाल सुरु

*-३० दुपार*- कुठल्यातरी एखाद्या खळ्यात मळ्यात अथवा मैदानात थांबायचंआपले वारकरी आचारी सुंदर स्वैयंपाक करून ठेवतातजेव्हढं चांगलं म्हणून देता येईल तेव्हढं देतातआम्हीं 'बोला पुंडलिक वरदा ..' अशी आरोळी संपली की वारकरी ताटावर तुटून पडतातदुपारच्या जेवणात एक गोड नक्की - लापशीबुंदीजिलेबी आणि गुलाबजामजेवणांनंतर थोडी विश्रांतीपुढे संथ वाटचाल

*-३० संध्याकाळ* - मुक्कामी पोहचणेकोरा चहा तयार असतोचतो घेणेस्वतःची शारीरिक स्वच्छता उरकणे

*-००* - कीर्तन भजन सुरुयाचं कारण बहुतेक वेळा आमचा तंबू सामानाचा ट्रक आमच्याआधी पोहचलेला नसेमग करा भजन

*-००* - तंबू ठोकून झाले की आम्हीं सर्व आडवे व्हायचोतंबू एकदम सुस्थितीतआजूबाजूला चार खणलेलेवरून ताडपत्रीकितीहीपाऊस असला तरी पाणी आत येणार नाहीया ट्रक च्या वर मोठा फ्लड लाईट असायचाछोटा जनसेट असतो बरोबरआम्हीं जरा कुठेविसावतो , तोच .....

*-३० रात्र* - एकच हाकारा ' चला जेवून घ्या'. मग जेवणं उरकली जायची

*१०-३० रात्र* - या वेळेला सर्वजण तंबूत पडायचेप्रत्येकजण आपला ट्रक सुरु करायचापण प्रत्येकाला दुसऱ्याचा ट्रक जास्त धूरसोडतोय असं वाटे


*अशा रीतीने दिवस संपलेला असायचासकाळच्या 'भांडणाच्या आवाजापासूनते 'रात्रीच्या घोरण्यापर्यंत'. त्या रम्य सूर्योदय सूर्यास्ताकडे कोणाचेही लक्ष नसतेदिंडीतील प्रवास 'सुखाचानसतोप्रचंड मोठ्या प्रमाणावर 'मानसिक आणि शाररिकपीडा निर्माण होतअसते - पावलागणिकमाणूस तावून सुलाखून निघत असतोचाळीस तापमानात चालणं आणि अचानक पाऊस सुरु होणं - आयुष्याच्या दोन बाजूचढ आणि उतार - दररोज.*


कोणी विचारलं 'कशी काय चालली आहे दिंडी?'. त्यावर हसायचं अन म्हणायचं 'आजचा दिवस चांगला गेला '. 

0/Post a Comment/Comments