दिंडी - सूक्ष्म


 *दिंडी : @सूक्ष्म - MICRO level ?!*


 • संपूर्ण दिंडीचं संक्रमण हे 'नशेतचालतेपहिली नशा विठ्ठलाची तर दुसरी नशा 'तंबाखूची'. नव्वद टक्के वारकरी सकाळीउठल्यापासून ते झोपेपर्यंत तंबाखूच्या नशेत पुढे चालत असतातकुठेही थुंकणं - हा त्यांचा हक्क आहे
 • दिंडीतील वारकरी केव्हांही 'दिंडी मार्गावरपाय ठेवतो तेंव्हा नतमस्तक होतोरस्त्यास स्पर्श करतोपाहिलं पाऊल टाकलं की'गिरकीमारतो अन मग पुढचं पाऊल टाकतो
 • दिंडी मध्ये स्वतःचं ताट वारकरी स्वतः धुतोताट धुतल्यावर त्याच ताटात पाणी घ्यायचं आणि प्यायचंदिंडीत ग्लास वापरतनाही.
 • प्रत्येक दिंडीत 'भजनी मंडळअसतेटाळकरीपखवाज वाजवणारा आणि भजन म्हणणारा महाराजहे तिघं चौघं दिंडीलासातत्याने ऊर्जा देत असतातयांना वगळलं तर ...... कल्पना करणं अशक्य
 • प्रत्येक पुरुष आणि महिला माऊलींची ' अंघोळकरणं ही मानसिक गरज आहेतो दिवसभर अस्वच्छतेच्या 'गर्क्यातअसतो .... कुठेही झोपतोकसाही झोपतो
 • दिंडी हा काहीजणांचा व्यवसाय आहेप्रत्येक दिंडीला मालक असतोतोच दिंडी 'चालवतो'. दिंडीचे 'नियोजनपाच महिनेचाललेले असतेदिंडी 'चालवणेहे प्रचंड जबाबदारीचे काम असते आणि त्याने दिलेल्या सेवेचा त्याला आर्थिक 'मोबदलामिळतो
 • वारकरी तसा शांत अन मनमिळाऊ असतोपण काही 'नव्हखेअसतात अन त्यांना बेसिक वर्तन कसे असावे याची जाण नसतेउदारात्री बारा एक पर्यंत मोठ्याने गप्पा मारणे
 • आमच्या दिंडीची रेटेड कॅपॅसिटी २५० लोकांची आहेपण दिंडीत राबता मात्र जवळपास ४०० लोकांचा असतो. 'आओ जाओ - घर तुम्हारा ' असं उदारमतवादी धोरण मालकाचंलोक येतातजेवतातझोपतातअन निघून जातातहे येणं अन जाणं बऱ्याचवेळा मालकाला माहित नसतंपण अन्न कधीही कमी पडत नाहीझोपायला मात्र गर्दी होतेमालक बळीराम मला म्हणायचा - जाऊद्याहो मानकरकाही कमी पडणार नाहीबऱ्याच वेळा दोन तीन दिवस राहणारे पैसेही देत नाहीत्यांना त्याचं काही वाटतहीनाही
 • दिंडी मध्ये कोणी कोणाला कंट्रोल करत नाहीतरीही सगळं वेळेवर पार पडत असतं सांगता लोक मदत करत असतातदिंडीमधील दहा बारा माऊल्या दररोज भाकऱ्या थापायच्यावाढणारे कमी दिसले की मी पात्र हातात घ्यायचो
 • बहुसंख्य लोक आर्थिक दृष्टया अत्यंत गरीब होतेतंबाखू व्यतिरिक्त एकही वस्तू ते विकत घेऊ शकत नव्हतेथोड्याश्या गप्पामारल्या की जखमा वाहू लागतातकोण कोणत्या मनस्थितीतून दिंडी करत आहे हे समजत नाही.
 • आणि बरंच काही ... सुखावणारंदुःखाचे चटके देणारं ....


*थोडक्यात पण अतिमहत्वाचं सांगतो - मी आणि इतर सर्व लोक एकच आहोतआमच्यातील मूळ भाव एकचपण व्यक्त अविष्कारअनेकगोरे काळे किंवा सामाजिक / आर्थिक असमानता ... ही भिन्नता निसर्गाने दिली आहेपण न्यूनता माणसाने निर्माण केली आहेश्रेष्ठ आणि कनिष्ट हे भेद आदिम भावनांनी केलेह्या संकुचित भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी मी दिंडीत प्रवेश केलाइतरांचा स्वीकारकरण्यासाठी - हे उस्मानाबादेवरून आलेले आहेत .... ईश्वरी अंश !*

0/Post a Comment/Comments