दिंडी : दोनच प्रश्न


 *दिंडी : दोनच प्रश्न*


माझ्यासारखा सोफेस्टीकेटेड (?!) माणूस दिंडीत सामील होतोय याचं बहुसंख्य लोकांना आश्चर्य वाटलंकाहींना काळजी वाटली कीयाचं 'कसंहोणार.


*प्रश्न पहिला*


नेमकं सांगायचं तर प्रश्न होता की 'हा दररोज कुठे आणि कसं करणार?'. काहींनी मला फोन केलेवरवर कौतुक केले - छानलै भारीतू सहज वारी पूर्ण करशीलकाळजी घे - असे उद्गार बाहेर पडले की 'खदखदणारा प्रश्न बाहेर येत असे'.


*'शी शु चं कसं रे ?'*

मी - शी शु करणार ना.

*'ते माहित आहे रेकुठे करणार ?'*

मी - अरे होल वावर इज अवरकुठेही बसायचंउरकून घ्यायचंशेतातरस्त्याच्या बाजूला - झुडुपात

*'धुण्याचं कसं?'*

मी - शी धुणार नामी नेहमी दीड दोन लिटर पाणी जवळ ठेवतोरस्त्यावर कायम रिफील करत राहायचंखूप टँकर असतात पाणीवाटपासाठीकाही लोक अंघोळी सुद्धा करतात

*'तुला हे सर्व अवघड नाही वाटतम्हणजे लाज ...?*

मी - अरे मी जगावेगळं काहीही करत नाहीप्राप्त परिस्थितीत इतर लोक जसं सामोरं जातात तसंच मी ही जातो अन विषय संपवतोआम्हीं जेव्हां हिमालयात ट्रेकिंग ला तेथेही असाच प्रकारआता 'लाज बद्दल'. अरे 'कार्यकरतांना कोणीही आपल्याकडे बघत नाही

*तुला बरं जमतं बाबा हे*

मी - तुला गंमत सांगतो जी मी इतर बॅकपॅकर कडून शिकली आहेसकाळी काही 'अडचणीअसतील तर आम्हीं मित्र प्रातर्विधी आणिसकाळची अंघोळ रात्री झोपण्याआधी उरकून घेतो. So we are actually ahead of time. 

*भारीलगे रहो भाई*


(वाचक मंडळी - एक सांगतोआम्हीं सर्व वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी जेव्हां पोहचतो तेव्हां शरीर धर्मासाठी महिलांना प्राधान्य दिलंजातंत्या स्वतःसाठी एक दिशा ठरवतात आणि कर्मे उरकतातमग पुरुष मंडळी विरुद्ध दिशेला कूच करतात बोलता सर्व होत असतंरात्री अपरात्री जायचं असेल तर एकमेकांना 'कंपनीदिली जाते.)

------------------------

*प्रश्न दुसरा*

घराबाहेर पडलं की बहुसंख्य सामान्य प्रवाश्याला 'जेवायचं काय अन कुठेअशी भ्रांत असते. 'जे मिळेल ते खायचं अन पुढे जायचंअशी तडजोडीची भूमिका आपण घेत नाही आणि संपूर्ण प्रवासात व्याधी ग्रस्त होतोमी दिंडीत जाणार हे ऐकल्यावर बऱ्याच जणांनीप्रश्न केला - जेवायचं कसं करणारमाझं उत्तर - मी जे अकराशे रुपये भरले आहे त्यात जेवणनाश्ता आणि राहणं आलंजे मिळेल तेखाणार आणि पुढे जाणार असा साधा हिशेब


मंडळी कोणत्याही दिंडीत खाण्याची अजिबात आबाळ होत नाहीदिंडीचा मालक जेव्हढं चांगलं देता येईल तेव्हढं देण्याचा प्रयत्नकरतातरोज एकदा तरी गोड मिळतंलापशीलाडूगुलाबजामजिलेबीआमच्या दिंडीतील ४१ जेवणांपैकी ४० जेवणं स्पॉन्सर होतीप्रत्येक दिंडीबरोबर जेवणाकरिता लागणारा शिधा असतो आणि उपकरणं असतातदिवसातून दोनदा आचारी जेवण तयार करतातदिंडीतील महिला मेंबर्स पोळ्या आणि भाकरीची करायची जबादारी घेतात तर वाढणं हा प्रकार पुरुष


दुपारचं जेवण हा मला आवडणारा सर्वात मोठा इव्हेंटएक तर भूक लागलेली असतेभुकेपोटी सर्व गोडमी जेवायला बसायच्या आधीस्वयंपाकाच्या ठिकाणी चक्कर मारतोसर्व वास नाकात भरतोआजच्या 'उदर भरणाचीकल्पना करतो. *मग कोणीतरी मला आवताणदेतं - माउली मानकर घ्या जेवून म्हंजी आम्हांला वाढायला यालआजचं जेवण बघा.* हे ऐकल्यावर इतकं बरं वाटतं की जेवणा अगोदरपोट भरतंक्षणासाठी भेटलेले लोक 'एकरूपहोतात


मालक बळीराम पंगतीतून चक्कर मारणार - म्हणणार - अय भाकरवडीइकडं येइथं वाढकिंवा  पोराभजी आणनंतर जो'अन्नदानकरतो त्याचा गौरव होतोतोही एक चक्कर मारतो अन आग्रह करतोएकंदरीत 'दुपारचं जेवणहाही मोठा उत्सव असतोदिंडीत कधीही अन्न कमी पडत नाही कारण पदार्थ संपत आला असं वाटलं की लगेच मोठं भांड चुलीवर


भुकेला अन्नाची आहूती देणे म्हणजे यज्ञकर्मपोटाची खळगी भरणे नव्हेजो अग्नी जठरात प्रज्वलीत झाला आहे त्याला अन्नाची आहुतीदेणेअन्न हे पूर्ण ब्रह्म आहेते पुढ्यात आल्यावर प्रार्थना करावी- ‘तुझी आहुती माझ्यातील अग्नीनारायणाला देत आहेहे ब्रह्मामी तुलानमस्कार करतोमला पूर्णत्व बहाल करया अन्नामुळे माझ्यात सकारात्मक ऊर्जा येऊ दे’…


जेवतांना समाधानी असणं फार गरजेचं आहेदिंडीत सर्वांबरोबर जेवतांना मजा येतेउगाच नाकं मुरुडू नयेचिकित्सा करू नयेउष्टं टाकूनये


*मित्रांनोमला प्रश्न पडतच नाहीभेटेल त्या मातीला थेंबाने रुजवायचेतिथेच रुजायचे आणि तेथेच विलीन व्हायचेउन्नत भावनांचारियाज चालू ठेवायचा.*


0/Post a Comment/Comments