उतार वयात


 *आजचे तरुण उद्याचे 'जेष्ठ'!*


मडंळी नाटकाच्या रचनेकडे नीट पहातिसऱ्या अंकातील 'शोकांतिकेतेचीसुरवात पहिल्या अंकातच सुरु होतेनाटक इतक्या झपाट्यानेपुढे जातं की 'धुंदीतलंतरुणपण संपून आपण शेवटच्या अंकात कधी येऊन पोहचतो हे कळत नाहीधुंदी उतरली की शेवटच्या अंकात'प्रचंड पोकळीनिर्माण होते अन .... कारण बऱ्याच वेळा 'नायकाकडेकाहींचं करायला नसते (जुन्या आठवणी उगाळण्या व्यतिरिक्त).


मी आयुष्याच्या तीन अंकी नाटकाबद्दल बोलत आहेपहिल्या अंकात 'नायकानेगुतंवणूक केली असती तर तिसऱ्या अंकातीलउदासीनता त्याच्या वाट्याला आली नसतीआपल्याला काय आवडते हे लहानपणी समजले आणि ते तेंव्हा केले तर 'उतार वयातगाडीघसरत नाहीसाठी उलटल्यावर माणूस आवडणाऱ्या 'गोष्टीकरू लागला की वेळ पुरत नाही हा स्वानुभव


म्हातार्यांनी म्हातारपणात स्वतःसाठी काय करावे यावर उदंड लिखाण आहेम्हणजे तिसऱ्या अंकातील होऊ घातलेली शोकांतिकासुखांतिका कशी होईल यावरचे 'उपचारसांगितले जातातपण मला असं वाटतं की 'तिसऱ्या अंकातीलनायिकांनी पहिल्या अंकातील'होऊ घातलेल्यानायकांसाठी काय करता येईल याचाही विचार करावामस्त टाइम पास होईलउदाहरण देतो


माझ्या नातीलाअनाहतालाचित्रकलेची आवड आहे हे आमच्या सर्वांच्या लक्षात कधीच आलंयत्यामुळे मुलाने तिला चित्रकला क्लास'लावलाआहेती त्याची जबाबदारी आहेमाझी जबाबदारी कायमी तिला पूर्वी चिमणी म्हणायचोहल्ली तिला हाक मारतांना'चित्रकार ' म्हणतोतिच्या डोळ्यातील चमक अनुभवतोमग ती तिची चित्रकलेची वही लगबगीने आणते  'टकळीसुरु करतेमीमाझा कान अखंडपणे तिला देत असतोमधेच तिच्या लाल रंगला मी गुलाबी म्हणतोत्यावर ती 'हा लाल आहेअसं ठासून सांगायलासुरवात करते आणि 'तुम्हांला काही समजत नाहीयावर थांबतेतिच्या वहीत मी काहीही 'रेखाटूशकत नाही कारण माझी 'गिचमिडतिला नको असतेबरं मी एखादं चित्र रंगवू का असं विचारलं तर म्हणते 'नकोसरांना लगेच कळेल'. हे 'ऍप्रिसिएशनचालू असतांनाआम्ही 'मेडिटेटिव्हअवस्थेत जगत असतोमला माझे लहानपण 'परत जिवंतझाल्यासारखे वाटतेमी मला 'तिच्यातबघत असतो - पुनरपि  जगणं ! माझी 'चित्रकला वहीनजरेसमोर फेर धरू लागतेजर तिने आत्ता हा छंद जोपासला तर तिच्या 'उतार वयाततिला'कंटाळायेणार नाहीपहिल्या अंकातील संस्कार तिसऱ्या अंकात 'रसाळ आणि गोमटी फळेदेतीलछंद हे 'कालनिरपेक्षअसतातनातू बॅडमिंटन आवडीने खेळतो पण त्याला कोणता 'छंदआहे हे आम्हांला उमजलेले नाहीखेळ खेळणं हा 'छंदनाही असं मला वाटतं


उल्का काय करते ते सांगतोबोलता बोलता नवीन मराठी शब्द नातवंडांशी बोलतांना वापरतेत्यांना अर्थ सांगतेकाहीतरी नवं गवसलंअशा अविर्भावात नातवंड ते नवे शब्द अचूकपणे पुढील आठवड्यात नेमके वापरतात हे आम्हीं बघतोशब्द नेमका वापरला की मज्जायेतेउल्का त्यांना इंग्रजी आणि इंग्रजी व्याकरण शिकवतेत्यांच्या ट्युशनच्या व्यतिरिक्त हे शिकवतांना मज्जा येतेशब्दांचा छंद जडलाकी तो अव्याहत त्यांच्या बरोबर राहणारहे फार सूक्ष्म 'संस्कार', पण ते जाणीव पूर्वक 'अति जेष्ठांनीकरावे - निरपेक्ष पद्धतीनेफायदाझालाच तर त्यांचातोटा नाहीच


*बऱ्याच वेळा - जेष्ठ लोक - म्हणतात की - 'आम्हांला आमचं जगू द्या', 'आता आम्हांला आमची स्पेस नको का', 'खूप केलं आम्हींमुलांकरिता'. हा सगळा 'दुराग्रहआहेमनात असलं तरी बोलू नये. 'अंतर वाढतं'.* जमेल तेव्हढे वृद्धांनी 'छंदाविषयीचेसंस्कारनातवंडांवर करावेचजेणेकरून त्यांचं 'म्हातारपणसुसह्य होईलशरीराचे वार्धक्य हा निसर्गनेम - मुलंबाळं सुद्धा लवकरच म्हातारीहोणार - आपण नाही झालो काआजचे तरुण उद्याचे जेष्ठ - त्यांना 'त्या आयुष्यात पोकळी नको जाणवायला - छंदा-अभावी'. 


*आज जेष्ठ नागरिक दिन आहेतुम्हांला तुमच्या नातवंडांसाठी कोणता 'कल्पवृक्षलावता येईल याचा विचार कराजेणेकरून - नातवंडत्यांच्या उतारवयात म्हणतील 'कल्पवृक्ष नातवंडांसाठी लाउनिया आजी आजोबा गेले'. येथे तुम्हीं मागे ठेऊन संपत्तीबद्दल मी बोलत नाहीसुज्ञ जेष्ठास अधिक सांगणे  लगेतुमचं आमचं रडगाणं कोणालाही आवडत नाहीम्हणून नातवंडांचं 'कौतुक गाणंलिहायला बसा - त्यात सर्जनशीलता असावीअहंकार नसावादुराग्रह नसावा. (आपल्या मुलांचं आणि नातवंडांचं आपल्यावाचून काहीही अडलेलं नाही हेलक्षात घ्या.) 'सरकार म्हातारपण वाईट असतंअसं ‘कोसळणारे नटसम्राट’ म्हणतात तेंव्हा वाईट वाटतं नामग 'सरकार म्हातारपणगोड असतंअसं म्हणण्यासाठी 'मला काय करता येईल?' याचा विचार व्हावा.*


'संध्याछाया भिवविती हृदयाअशी अवस्था येऊच नये म्हणून हा ब्लॉगप्रपंचएकाकीपणाचा 'वेढाटाळायचा असेल तर हा उपायनातवंडांचे छंद जोपासले तर नवी 'व्यवस्थानिर्माण होईल. *'पडदा पडण्याच्या आधी' - कुछ मिठा हो जाय ! अमिताभ मानकरउवाच.*



0/Post a Comment/Comments